प्रिय सचिन
तू एक प्रचंड मोठा आणि एकमेव फलंदाज आहेस कि ज्याने १०० शतके केली आहेत आहेत जो या क्रिकेट विश्वाचा एक अनमोल तारा आहे ..तुझा मी सच्चा भक्त आहे आणि जातिवंत पाठीराखा पण मी श्रद्धाळू आहे अंध् श्रद्धाळू नकीच नाही ..मी आणि तू एकाच वयाचे आहोत पण तुझे कार्य अतुलनीय आहे आणि मी एक सामान्य क्रिकेट चा भक्त ..क्रिकेट मी पण जाणतो पण तुझ्या एवढे माझे ज्ञान नाही आणि कामगिरी पण नाही ..पण जे काही होत आहे हल्ली तुझ्या मध्ये म्हणून मी पण हल्ली जरा दुखी आहे आणि म्हणून हे दोन शब्द तुझ्याकरिता ..
दोन-चार दिवसांपूर्वीच हे लिहिणार होतो पण इथे मायबोलीवर असे चर्चेचे विषय कुठे मांडायचे ते शोधूनही न सापडल्याने इथेच टाकतोय.
बहुधा चालत असावे, कारण विषय निवडताना त्यात क्रिडा, क्रिकेट अश्या कॅटेगरीही सापडल्या.
पण जर इथे चालत नसेल तर कुठे हे कोणीतरी मला प्रतिसादात सांगा.
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
यंदा १३ ऑक्टोंबर पासुन सुरु होणार्या चॅम्पिअन टी२० स्पर्धेसाठी धागा......
.
टी२० क्रिकेट खेळणार्या देशांमधे विविध क्लब स्पर्धेमधल्या विजेते व उपविजेते संघ या स्पर्धेत एकमेकांविरुध्द भिडतात
यंदा भारता तर्फे :-
आयपीएल विजेता :- कोलकता क्नाईट रायडर, उपविजेते:- चेन्नई सुपर किंग्स,
सेमीफायनलिस्ट :- दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गतविजेते मुंबई इंडीयन्स
साउथ आफ्रिका तर्फे :- टायटन्स, आणि हायव्हेल्ड लॉयन्स
ऑस्ट्रेलिया तर्फे :- पर्थ स्कॉर्चर्स, आणि सिडनी सिक्सर्स
न्युझीलंड तर्फे :- ऑकलंड एसेस
नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
आता मैदानावर पुन्हा मैफील नाही..
इडन गार्डनसारखं प्रतिष्ठेचं मैदान. समोर अतिरेकी क्रिकेटवेडे बंगाली प्रेक्षक आणि भारत डावाने पराभवाच्या छायेत ! सगळ्या आशा संपलेल्या. खाली गाळ राहीलेला. जिव्हारी लागेल असा पराभव समोर दिसत असतो. मन इतरत्र रमवायचे सगळे प्रयत्न विफल झालेले असतात. त्यातल्या त्यात एका बाजूला नांगर टाकून भिंत उभी राहील्याचं समाधान असतं.
पण दुस-या एण्डचं काय ?
ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
अभिनंदन .... माननिय नवनियुक्त खासदार सचिन रमेश तेंडुलकर
.
.
काल सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी "१० जनपथ" वर गेले होते. तिथे गेल्यावर सोनिया गांधींनी सचिन यांना काँग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार पद देउ केले. ते सचिन ने स्विकारले. सचिन बरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांना सुध्दा खासदार पद देउ केले.
आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
संध्याकाळच्या वेळी कधीकधी उदास, कातर, हुरहुर वाटणे वगैरे वगैरे होते असे म्हणतात. राहुल द्रविड निवृत्त झाल्याची बातमी पाहताना माझ्या मनात अशाच काहीतरी संमिश्र भावना होत्या. आता तो कधीतरी रिटायर होणारच होता, रन्स आटल्या होत्या, निवृत्तीचा निर्णय त्याने त्याच्या फटक्यांप्रमाणेच अचूक टायमिंगवर घेतला हे सर्व खरेच. पण तरीही हृदयात एक कळ मात्र नक्कीच उठली.
द्रविड द वॉल स्वतहून रिटायर झाला.पण फॉर्मात नसुनसुद्धा व्हिव्हिएस लक्ष्मण व तेंडूलकर रिटायर होत नाहीत.त्यांनी रिटायर होउन तरूण व होतकरू खेळाडूंना जागा रिकामी केली पाहिजे.अनेक चांगले तरूण खेळाडू त्यांच्यामुळे कुजले आहेत.हा त्यांच्यावर अन्याय आहे.