प्रिय सचिन
तू एक प्रचंड मोठा आणि एकमेव फलंदाज आहेस कि ज्याने १०० शतके केली आहेत आहेत जो या क्रिकेट विश्वाचा एक अनमोल तारा आहे ..तुझा मी सच्चा भक्त आहे आणि जातिवंत पाठीराखा पण मी श्रद्धाळू आहे अंध् श्रद्धाळू नकीच नाही ..मी आणि तू एकाच वयाचे आहोत पण तुझे कार्य अतुलनीय आहे आणि मी एक सामान्य क्रिकेट चा भक्त ..क्रिकेट मी पण जाणतो पण तुझ्या एवढे माझे ज्ञान नाही आणि कामगिरी पण नाही ..पण जे काही होत आहे हल्ली तुझ्या मध्ये म्हणून मी पण हल्ली जरा दुखी आहे आणि म्हणून हे दोन शब्द तुझ्याकरिता ..
१९८६ मध्ये पाकिस्तान मध्ये तू कसोटी मध्ये पदार्पण केले आणि जगाला दाखवून दिले तू काय चीज आहेस ती .त्या वेळी अब्दुल कादिर च्या गोलंदाजीवर तुझे ते दोन उत्तुंग षटकार पाहून समोर उभा असेलला कपिल देव ला पण दरदरून घाम आला आणि हेच सांगून गेला हि हा आता सगळ्यांचा घाम काढणार आहे ..एक दिवस सामने आणि ते हि पहिल्या १५ ओवर्स मध्ये कसे खेळायचे हे तू न्यू झीलंड च्या दौऱ्यात पहिल्या क्रमांकावर फलंदाजी ला येऊन दाखवून दिले आणि अख्या जगाने तोंडात बोटे घातली आणि साक्षात bradman ने पण तुला तेव्हाच आपलेसे केले.तू त्या नंतर मागे वळून नाही पाहिले ,सचिन म्हणजे अक्खा भारतीय संघ असे आम्ही बघत राहिलो आणि तू बाद होतास टी वी बंद करून काम करू लागलो .इंग्लंड मध्ये trent bridge च्या कसोटी मध्ये शतक ठोकून कठीण काळी फलंदाजी कशी करावयाची याचे ज्ञान दिले ..पर्थ च्या सळो कि पळो करणाऱ्या खेळपट्टीवर उत्तम पददालीत्य दाखवून aus च्या तोफखान्याला चोख उत्तर दिले ..प्रत्येक वर्षी तुझ्या फलंदाजी मध्ये एक वेगळा आवेश येत गेला आणि सबंध भारतीय तुझ्या प्रेमात पडलो ..तू फलंदाजी ला येतास बाजार ओस पडू लागले ,लोक कामे बंद करून तुझा खेळ पाहू लागले ,आई स्वताचा पोरगा खेळत आहे हे समझून तुझा खेळ बघू लागल्या आणि घराघरात सचिनच जन्माला येईल या करिता देवाला साकडे घालू लागल्या .
१९९८ तर कोण विसरणार नाही .तुझे महत्व अजून अधोरेखित झाले ,मला आठवत आहे कि ऑस्ट्रेलिया भारतात आली होती आणि त्यांचा पहिला सर्व सामना ब्रेबोर्न वर मुंबई विरुद्ध होता आणि तू तेव्हा दणदणीत द्विशतक ठोकून त्यांना घाम फोडला होता .वार्न ची गोलंदाजी तू डाव्या यष्टी बाहेर स्टान्स घेऊन धोपटून काढली आणि तत्याच्या स्वप्नात पण तू जाऊन त्याला उध्वस्त केलेस .त्याच वर्षी शारजा येथे तू त्यांच्याच विरुद्ध जी दोन शतके ठोकली आणि या जगाचा अनिभिषिक्त सम्राट झालास .कप्तान झालास पण तुझे नशीब खोटे कि संघात फक्त एक सचिन होता आणि बाकीचे त्याच्यामागचे वराड होते असो ..तुझी सरासरी वाढत गेली आणि त्या बरोबर तुझे विरोधक पण ..
आफ्रिकेमध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत अंतिम सामना खेळला पण तू लवकर बाद झालास ह्यामुळे आपण हरलो हे ज्यांनी आयुष्यात चेंडू कधी पकडला नाही आणि ब्याट कधी वापरली नाही अश्यांनी बोंबा मारत सांगितले .त्या वेळी उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तू अख्तर च्या गोलंदाजीवर डीप पोईंट च्या वर मारलेला उत्तुंग सत्कार अजून हि माझ्या डोळ्यापुढे आहे .त्या सर्व सामन्यामध्ये तूच एकटा खेळत होतास आणि कप मध्ये सर्वात जास्त धावा काढल्या म्हणून बक्षीस तुलाच मिळाले पण सर्व जाणकार हे विसरले ..असो त्यांचा RAM हा कमी आहे म्हणून ते असे वागत आहेत .
तुझी खेळत होतास आणि आपण जिंकत होतो हि सरासरी जवळ ६० % आहे तरीही लोक बोलत राहतात कारण क्रिकेट हा खेळ आहे हे न समझून न घेता त्याचा धर्म करून ठेवला .आज तू २३ वर्ष खेळत आहे प्रत्येक देश विरुद्ध तुझी कामगिरी आहे ,तुझे योगदान आहे तुला भारतरत्न नको म्हणून इथे टाहो फोडला गेला आणि तू आधीच भारतचे एक अनमोल रत्न आहेस त्यामुळे हा पुरस्कार नको आहे ..पहिले एक दिवसीय द्वीशतक तूच मारले आफ्रिके च्या विरुद्ध आणि ज्याला तू कप्तान केलास त्याने ते शतक न होण्याकरिता घेतेलेले परिश्रम आम्ही बघीतले ,आता मागून तो पण आता बोलू लागला पण तू गप्प आहेस आणि मी इथे अस्वस्थ आहे
तुझ्या गोलंदाजी वर पण आपण सामना जिंकलो आहोत ,मला आठवत आहे टायटन कप ची फायनल होती आणि समोर वेस्ट ईंडीझ चा रिची रिचर्डसन आपली पीस काढत होता आणि कुंबळे ला पण त्याने झोडून काढले पण अंतिम षटक तू टाकून ती हरलेली match आपण जिंकलो तरी हि तू ह्यांच्याकरिता काही हि नाही आहेस याचे दुक्ख जास्त आहे मला .
आज तू परत बाद झालास आणि सचिन संपला या वर परत चर्चा सुरु झाल्या .आता पर्यंत चार वेळा तू बोल्ड झाला आहेस हे बघवत नाही मला आणि पुढे काय बोलू हे सुचत नाही मला ...............................................................
प्रिय सचिन-एक अनावृत्त पत्र
Submitted by रमेश भिडे on 23 November, 2012 - 10:19
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो इतके लिहिण्यापेक्षा एक
अहो इतके लिहिण्यापेक्षा एक वाक्यात लिहा बाबा रे आता दुकान बंद कर आणि जागा दुसर्याला दे. बस झाले. अजून १०० शतके केलीस तरी तुझ्या महानातेमध्ये फार काही फरक पडणार नाहीये पण त्याला जितका वेळ लागेल तितके लोक कंटाळतील.
जानेवारी २०११ नन्तर सचिनचे
जानेवारी २०११ नन्तर सचिनचे कसोटी मधे शतक झालेले नाही आणी अर्धशतक होउन ९ कसोटी झालेत.
खरंच अति झाले आता त्याला सहन करणे.
अरे वयाच्या ४२ शी नंतरही
अरे वयाच्या ४२ शी नंतरही तुफान फटकेबाजी मारणारा एक खेळाडू आम्ही पाहिला आहे. ते पाहता सचिनचा प्राईम काळ आजून दोन चार वर्षे तर नक्कीच उरला आहे. गरज आहे आपण सगळ्यानी जरा संयम दाखवायची.
As a Sachin Admirer for years
As a Sachin Admirer for years , I am not sure about how to react to his current form and calls for his retirement . Although I firmly believe in "Class is Permanent" and there is lot of Cricket still left in him and I keep having arguments with peopled who have forgot/like to forget "Endulkar Era" and the way he came back from it (and the desert storms) , I myself keep wondering what he will achieve even if he comes back .
He has got everything to lose , nothing to gain
Imagine he had scored a double hundred , people would have whined that he scored in India against England on wickets suiting him . Now they will say he can't even play Monty on first day pitch .
Sad