क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी ,
SuperSelector च नाव Cricinfo नी बदललय .

http://espncricinfo.fantasyleague.com/ इथे जाऊन (जर तुमचे Cricinfo account नसेल तर ) रजिस्टर करून तुमची टीम बनवा . टीम बनवायचे नियम तिथे लिहिले आहेत . एकदा तुमची मनासारखी टीम बनली की वर दिलेल्या लीग मधे सामील करा . काही Problem वाटला तर इथे लिहा .

हुश्श केली तयार टिम. सध्याचा form, SLPL नि लंकेमधे आहे एव्हढाच criteria वापरला. चक्क गेलला घेण्याचा पर्याय असूनही सोडून दिला Happy

सहीच असामी .पण गेल ला बाहेर ठेवण जरा जास्तीच मोठी रिस्क आहे Happy
प्लीज वर लिहिलेली लीग ही जॉईन करता का ?

केली जॉईन. आधी जॉइन क्लिक नव्हते केले लीग शोधल्यावर. तुझी टीम पाहिली नि राहूनच गेले.

गेलला घेण्यामधे बॉलींगची वाट लागत होती.

असामी , छान आहे टीम . एकही फालतू टीमचा खेळाडू न घेता मॅनेज केलय . Happy
मला गणित बसवण्यासाठी अफगाणिस्तानचा मंगल घ्यावा लागला Sad

मस्त आहे हे. जमलं तर नाव नोंदवेन. इथे ऑफिस मध्ये बास्केटबॉल, फूटबॉलचे लिग चालतात तेव्हा खुपच वाळीत टाकल्या सारखं वाटतं.
मला गणित बसवण्यासाठी अफगाणिस्तानचा मंगल घ्यावा लागला>>>> Lol नेमका अर्थ माहित असून सुद्धा वाक्य बघून हसायला आलं.

केदार तुझ्या टिममधे कोहली आहे, गेल आहे Happy किपर adjust करून मंगलयोग टाळता येतो का बघ.

वॉटसनला सोडून गेल घ्यायला लागायची वेळ न येवो. फिन हा जुगार आहे Wink आफ्रिदी आवडला असता बॉलर म्हणून मला पण ते त्याला All rounder म्हणून घ्यायला लावताहेत तेंव्हा त्याची गच्छंती. नरेन बद्दल काय वाटते ?

नरेन माझ्या मते या स्पर्धेचा सगळ्यात मोठा स्टार असणार आहे .
याच एक कारण हे ही आहे की त्याच्या प्राथमिक गटात ऑसीज आणी आयर्लंड आहेत आणी सुपर ८ मध्ये न्यूझिलंड , इंग्लंड आणी लंका आहेत . यातली लंका सोडली तर कुणी त्याला खेळू शकेल अस वाटत नाही Happy

जॉईन केली, "MaayboliT20 - ( PIN: 5303 )" तिघांचा अ‍ॅक्सेस पेंडींग दाखवत आहे. अ‍ॅड करा केदारराव...

रुल्स पाहिले, ह्या २ लिंक वर पेस्टा हँडी आसाव्यात म्हणुन,
नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

रच्याकने वन-डे वर्ल्डकपच्या वेळेस लीग मध्ये पहिल्यांदाच भाग घेतलेला आणि योगायोगाने भारताने कप जिंकला होता. यावेळी बघु काय होतंय Wink

धन्यवाद, १८ सप्टेंबरपर्यंत अनलिमिटेड चेंज करता येतील सो प्रॅक्टीस मॅचमधला खेळ पाहुन कॅप्टन आणि ईतर खेळाडु ठरवेन. मॅन ऑफ मॅच ला डबल (+ / -) स्कोर तसच तोच कॅप्टन असेल तर अजुन फायदा.

तसच बॅट्समनपेक्षा बोलरने चांगले प्रर्दशन केले तर बरेच गुण मिळतात...

जबरीच रे केदार.. फक्त किती फॉलो करता येईल ते माहिती नाहीये.. त्यामुळे टीम तयार करावी की नाही ह्या संभ्रमात आहे...

हिम्सकूल ,
अ‍ॅड केलीय टीम .
फॉलो करायची काळजी नको , रोजच्या रोज प्रत्येकाच आपल्या आणी Overall लीग मधल रॅंकींग इथे लिहू आपण Happy
रच्याकने आपली Thought Process एकदमच Opposite दिसतेय . २च खेळाडू common आहेत आपल्यात , तेही विराट आणी नरेन Happy

स्वरूप ,
तुमच्या टीम पेज च्या खाली ENTER NEW LEAGUE असेल , त्यावर क्लिक करा .
तिथे Joining An Existing League दिसेल . त्यात खालचा पिन भरा .
League PIN: 5303

केदार Lol

बहुतेक कोणाबरोबरही माझ्या टीम चे दोन पेक्षा जास्त खेळाडू मॅच होत नसावेत.. आणि टीम कम्पोझिशन सुद्धा.. बहुतेकांनी चारच बॅट्समेन घेतले आहेत..

मित्रानो ,
आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही

कसा नाही पडत, पडतो की. या मॅचचे गुण तुम्हास मिळायचे नाहीत! २४ सब्स्टिट्युशन्स आहे लीग स्टेजला. त्याचा पुरेपूर वापर करणे हीच किल्ली आहे! Happy

पण समजा असे केले आणि खेळाडू बदलला तर त्याचे गुण जात नाहीत का? थोडक्यात एकदा एका खेळाडूमुळे मिळालेले गुण त्याला बदलले तरी टीमसाठी तसेच रहातात का? मला पूर्वीचे काही आठवत नाहीये...

हिम्सकूल , माझ्या माहितीप्रमाणे त्याचे आतापर्यंतचे गुण तसेच राहतात .

Pages