संध्याकाळच्या वेळी कधीकधी उदास, कातर, हुरहुर वाटणे वगैरे वगैरे होते असे म्हणतात. राहुल द्रविड निवृत्त झाल्याची बातमी पाहताना माझ्या मनात अशाच काहीतरी संमिश्र भावना होत्या. आता तो कधीतरी रिटायर होणारच होता, रन्स आटल्या होत्या, निवृत्तीचा निर्णय त्याने त्याच्या फटक्यांप्रमाणेच अचूक टायमिंगवर घेतला हे सर्व खरेच. पण तरीही हृदयात एक कळ मात्र नक्कीच उठली.
द्रविडचे रिटायर होणे माझ्यासाठी केवळ एका महान खेळाडूचे रिटायर होणे नव्हेच. घरात आपला एखादा मोठा भाऊ असतो; शांत, जबाबदार, कर्तबगार. त्याच्या जीवावर आपण उड्या मारतो, पंगे घेतो, काही घोळ झालाच तर तो संभाळून घेईल याची खात्रीच असते आपल्याला. तो अचानक नाहीसा झाला तर कसं वाटेल तसं काहीसं झालयं. मला माहीती आहे की हे सगळं फारच इमोशनल होते आहे पण त्याला माझा नाईलाज आहे. मला हे ही माहिती आहे की क्रिकेट हा शेवटी एक खेळ आहे आणि खेळ असा कोणा एकासाठी थांबत नसतो. पण तरीही काही वेळा या सर्व रॅशनल विचारांच्या पलीकडेही काही गोष्टी असतातच ना.....
द्रविडचे रिटायर होणे माझ्यासाठी केवळ एका महान खेळाडूचे रिटायर होणे नव्हेच. ते एका पिढीचे युग संपत आल्याची खूण आहे. ही प्रक्रिया गांगुली-कुंबळेच्या निवृत्तीबरोबरच सुरु झाली होती. या लोकांबरोबर मी वाढलो, मोठा झालो. त्यांच्या प्रत्येक यश-अपयशाचा मीही भागीदार होतो अशीच माझी भावना आहे. मॅचफिक्सिंगच्या अविश्वसनिय धक्क्यातून माझ्यासारख्या अनेकांना सावरुन, त्यांचा खेळ आणि संघ या दोन्हीवरील विश्वास परत निर्माण केला तो याच लोकांनी. आता तशी जवळीक, तशी बांधिलकी नव्या मंडळींबद्दल नाही. रैना-कोहलीत क्षमता आहे, पुजारा कदाचित द्रविडचा पर्याय ठरेलही; या सर्वांचा खेळ पाहताना आनंदही तितकाच होईल पण त्यात आधीची कमिटमेंट नसेल. 'कॉट द्रविड बोल्ड कुंबळे' नंतरचा माझा आणि त्यांचा आनंद; 'कॉट गंभीर बोल्ड मिश्रा/चावला' मधे असेलच याची खात्री नाही.
द्रविडचे रिटायर होणे माझ्यासाठी केवळ एका महान खेळाडूचे रिटायर होणे नव्हेच. ती अजून एक अटळ, अपरिहार्य घटना आणखी जवळ आल्याची सूचना आहे. आता सहा महिने, फारतर दीड वर्षे; पण मग 'साहेब'ही निवृत्त होणार. तो दिवस माझ्या दृष्टीने मी जुन्या पिढीचा सदस्य झाल्याचा असेल.....
खरय! द्रविड्बाबत- अगदी अगदी
खरय! द्रविड्बाबत- अगदी अगदी !
साहेबाना दिमाखात निवृत्त झालेले बघायला आवडेल! आत्ता जे चाल्लय, ते फार सुखाचे नाहिए
तो अचानक नाहीसा झाला तर कसं
तो अचानक नाहीसा झाला तर कसं वाटेल तसं काहीसं झालयं. मला माहीती आहे की हे सगळं फारच इमोशनल होते आहे पण त्याला माझा नाईलाज आहे. मला हे ही माहिती आहे की क्रिकेट हा शेवटी एक खेळ आहे आणि खेळ असा कोणा एकासाठी थांबत नसतो. पण तरीही काही वेळा या सर्व रॅशनल विचारांच्या पलीकडेही काही गोष्टी असतातच ना >>
खरं आहे. द्रविड वर लिहायचे लिहायचे असे ठरवून झाले. पहिला प्यारा झाला पण शब्दांचा ओघ आटला, लिहायचे म्हणले तर खूप पण शब्दच फुटत नाहीत अशी काही अवस्था झाली आहे. द्रविड रिटायर झाला म्हणजे माझ्यातिल कुठला तरी पार्ट निखळला, कुठला ते अजूनी ठरवता येत नाहीये. एका प्रतिक्रियेत संपवायचे नाही. मी वाट पाहतो आहे. शब्द उमटण्याची.
छान लिहीले आहे आगाऊ! मीही
छान लिहीले आहे आगाऊ! मीही लिहायचे ठरवले पण अजून जमलेच नाही. अजून लिहीन वेळ मिळाला की.
मॅचफिक्सिंगच्या अविश्वसनिय धक्क्यातून माझ्यासारख्या अनेकांना सावरुन, त्यांचा खेळ आणि संघ या दोन्हीवरील विश्वास परत निर्माण केला तो याच लोकांनी. आता तशी जवळीक, तशी बांधिलकी नव्या मंडळींबद्दल नाही.>>> अगदी सहमत.
अगदी अगदी केदार, मी जे लिहीले
अगदी अगदी केदार, मी जे लिहीले आहे त्यापलीकडेही खूप मनात आहे पण शब्द नाहीत.....
>>आता सहा महिने, फारतर दीड
>>आता सहा महिने, फारतर दीड वर्षे; पण मग 'साहेब'ही निवृत्त होणार. तो दिवस माझ्या दृष्टीने मी जुन्या पिढीचा सदस्य झाल्याचा असेल.....<<
१०० टक्के सहमत! पण साहेब निवृत्त होण्याचा निर्णय स्वत:च लवकारत लवकर घेवोत.
बाकी द्राविड बद्दल काय बोलणार? कर्णाचे जिवन त्याच्या वाट्याला आले इतकेच.
मस्त लिहिलंयस आगावा, अगदी
मस्त लिहिलंयस आगावा, अगदी मनातलं.
द्रविडच्या निवृत्तीची बातमी ऐकल्यावर पहिलं मनात काय आलं? तर - आता टेस्ट-म्याचमधे पहिल्या दिवशी १३/१ असा स्कोअर होईल तेव्हा आपण कुणाच्या तोंडाकडे बघायचं?
आजच्या लोकसत्तातल्या
आजच्या लोकसत्तातल्या यासंदर्भातल्या एका लेखाचं शीर्षक छान आहे - तशी गुणवत्ता पुन्हा सापडेल, पण निष्ठेचं काय? (लेख इतका खास नाहीये.)
बाकी द्राविड बद्दल काय
बाकी द्राविड बद्दल काय बोलणार? कर्णाचे जिवन त्याच्या वाट्याला आले इतकेच. > +१११११
मोठा भाऊ >>> अगदी अगदी
मोठा भाऊ >>> अगदी अगदी
राहुलचा खेळ त्याचा स्वभावा नुसार असे आणि म्हणूनच तो आवडीचा होता.
२००३च्या विश्वचषकात राहुल द्रविड आपल्या टिमचा कणा होता.
खूप सुंदर लेख आहे.
खूप सुंदर लेख आहे.
अरे वा!.... मला वाटल की मला
अरे वा!.... मला वाटल की मला एकट्यालाच अस काहितरी विचित्र होतयं..... माझ्यासारखे बरेच आहेत की!
खरच अगदी मनातल लिहलयस सगळं
>>रैना-कोहलीत क्षमता आहे, पुजारा कदाचित द्रविडचा पर्याय ठरेलही; या सर्वांचा खेळ पाहताना आनंदही तितकाच होईल पण त्यात आधीची कमिटमेंट नसेल. 'कॉट द्रविड बोल्ड कुंबळे' नंतरचा माझा आणि त्यांचा आनंद; 'कॉट गंभीर बोल्ड मिश्रा/चावला' मधे असेलच याची खात्री नाही
अगदी अगदी..... आता क्रिकेट बघताना तितका भक्तिभाव राहिल की नाही कुणास ठाउक!
विल मिस हिम फॉर श्युर पण
विल मिस हिम फॉर श्युर पण द्रविड खेळाशी संबंधित काम करत राहणारच की रे आगाऊ
मस्त लिहिलंय. त्याने आपल्या
मस्त लिहिलंय.
त्याने आपल्या खेळाप्रती (त्याच्या भाषेत त्याच्या कामाशी) कायम जपलेला प्रामाणिकपणा नेहमीसाठी लक्षात राहिल. तो जपायला काही जगावेगळं खेळावं लागत नाही की भारंभार शतकं आणि मॅन ऑफ दी मॅच मिळवाव्या लागत नाहीत. परिस्थितीशी दोन हात करून आपलं तंत्र कायम सुधारत ठेवणं बहूधा त्याच्याएवढं एखाद्या दुसर्यालाच जमलं असावं.
मला अजूनही ती मोठी गोल टोपी घालून खेळणारा आणि कायम रनआऊट होणारा सुरवातीचा द्रविड आठवतो. कॅलिसही अजून किती खेळेल माहित नाही, पण त्याचंही जाणं अशीच हूरहूर लाऊन जाईल.
सध्याच्या तरूण लोकात मला आमला आणि कूक द्रविड/कॅलिसचा वारसा चालवतील असं कायम वाटतं.
मायबोलीवरच एवढ्यातंच कोणीतरी बाफ ऊघडला 'द्रविड रिटायर्ड झाला, तेंडूलकर आणि लक्ष्मण कधी होणार?'
अरे ते काय वय झाल्याने रेसमध्ये धावण्यासाठी निकामी झालेले घोडे आहेत का? की ह्यांना बदलून नवे घ्या म्हणून ओरडायचं. त्यांच्या खेळाने त्यांनी कायम टिकणारे जे आनंदाचे क्षण दिले, अभिमानाने ऊर भरून यावा असा धडाडीचा खेळ केला आणि मुख्य म्हणजे क्रिकेट जगवलं, वाढवलं त्यांच्यासाठी अशी भाषा? बाफच्या विषयाबद्दल काही म्हणणं नाही पण भाषेसाठी जोरदार निषेध करावासा वाटला पण म्हंटलं राहू दे.
अगदी खरेय! Dravid, the
अगदी खरेय! Dravid, the Cricketer will be missed! Rahul will always be around!
द्रविडचे रिटायर होणे
द्रविडचे रिटायर होणे माझ्यासाठी केवळ एका महान खेळाडूचे रिटायर होणे नव्हेच. ती अजून एक अटळ, अपरिहार्य घटना आणखी जवळ आल्याची सूचना आहे. आता सहा महिने, फारतर दीड वर्षे; पण मग 'साहेब'ही निवृत्त होणार. तो दिवस माझ्या दृष्टीने मी जुन्या पिढीचा सदस्य झाल्याचा असेल....<<<<
+१
अगदी मनातल लिहिल आहेस. द्रविडच्या बायकोनी पण त्याच्यावर खूप मस्त लेख लिहिला आहे. फेसबूकवर कोणीतरी शेअर केला होता.
छान लिहिलय.
छान लिहिलय.
तो खेळत असताना त्याच्या
तो खेळत असताना त्याच्या संथगती बॅटींगला नावे ठेवणारेही बरेच होते. एड स्मिथ ने खूप सुंदर शब्दात द्रविडच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. http://www.espncricinfo.com/magazine/content/story/557122.html
खरंय. एका युगाचा अंत. आतून
खरंय.
एका युगाचा अंत.
आतून काहीतरी तुटल्यासारखे वाटते खरंच. 'कुण्याकाळचे पाणी डोळ्यात येते'.
द्रविडवर भाळण्यात आमचे तारुण्य गेले. तो वेडगळ प्रकार सिरीयसली घेतला नाही तरी त्याच्याकडुन शिकलो ती डिग्नीटी, एक शांत कणखरपणा. आयकॉन्सकडुन एवढे मिळाले तरी खूप असते.
आणि वेळच्यावेळी निवृत्त झालेले बरेच केव्हाही.
+१ मनातील भावना अत्यंत समर्पक
+१
मनातील भावना अत्यंत समर्पक शब्दात उतरवल्यात तरिहि अजुन अपुर्णच राहिल्या अस वाटणारा लेख.
_मून, एड स्मिथच्या त्या
_मून, एड स्मिथच्या त्या आर्टिकल मधली ही दोन वाक्ये प्रचंड पटली:
He is a man of substance, morally serious and intellectually curious.
In years to come, perhaps too late, we may realise what we have lost: the civility, craft and dignity that Dravid brought to every cricket match in which he played.
छान लिहिलय. एक खेळाडू म्हणून
छान लिहिलय. एक खेळाडू म्हणून त्याची ओऴख खुप आधीपासून होती. पण राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर त्याच्या पत्नीने लिहिलेला लेख वाचला आणि ''माणूस'' म्हणून तो किती चांगला होता हे अधोरेखित झालं. त्या लेखातल्या काही ओळी :
त्या इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारताल पराभव पत्करावा लागला. त्यावेळी शांत स्वभावाच्या राहुलला मी प्रथमच चिडताना बघितलं. तो म्हणाला होता, '' मी चुकलो. मी चिडलो, रागावलो. मी तसं करायला नको होतं.मला माझ्या क्रोधावर ताबा मिळवता आला नाही.'' या गोष्टीबद्दल दोन महिन्यांनी मला वीरूने सांगितलं , की इंग्लंड विरोधी सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने राहुल चिडला होता, आणि त्याने ड्रेसिंग रूममध्ये असलेली खुर्ची भिरकावून लावली होती.
अशी वॉल पुन्हा होणे नाही.
अरे वा! क्रिडाविषयक बीबीवर
अरे वा! क्रिडाविषयक बीबीवर रैनातैंचा प्रतिसाद !!
हॅलो जॅमी, तुझ्या दैदिप्यमान
हॅलो जॅमी,
तुझ्या दैदिप्यमान कारकिर्दीबरोबरच योग्य वेळी घेतलेल्या या योग्य निर्णयालाही मानाचा मुजरा रे भावा !
ज्याच्या त्याच्या तोंडी एकच गोष्ट ऐकायला मिळतेय.... तूझी निवृत्ती ! कुणी म्हणतेय राहूल क्रिकेटच्या राजकारणाचा बळी ठरला. कुणी म्हणतेय महेंद्रसिंग धोनीच्या डावपेचांचा बळी ठरला. पण एक गोष्ट तूही कबुल करशील मित्रा, गेल्या इंग्लंडच्या दौर्याबरोबरच ऑस्ट्रेलियातही राहूल नावाच्या अभेद्य वॉलच्या बचावाला वारंवार तडे जाताना दिसत होते. मिस्टर डिपेंडेबलच्या अभेद्य भिंतीला कळत्-नकळत कसर लागायला लागली होती. तुझ्यातल्या सच्च्या खेळाडुने ते ओळखलं नसेल असं कसं होइल? बहुतेक त्यामुळेच तू निवृत्तीच्या निर्णयाप्रत आला असावास. कारणे काहीही असोत राहूलभौ, पण एक गोष्ट मात्र मी आज अगदी आनंदाने आणि ताठ मानेने सांगू शकतो. आजपर्यंत तुझ्याबद्दल आदर, प्रेम होतेच पण आज मात्र तुझ्याबद्दल मनस्वी अभिमानही वाटतोय. तुझ्यासारखा कुठलाही समर्पित क्रिकेटपटू निवॄत्त होणं आमच्यासारख्या वेड्या चाहत्यांच्या कधीच पचनी पडत नाही. आम्हाला तो त्या खेळाडुवर अन्यायच वाटत राहतो. तुझ्या बाबतीतही काही वेगळी भावना नाहीये.
पण प्रामाणिकपणे सांगू राहूल, तू तुझ्या वक्तशीरपणाबद्दल, तुझ्या टायमींगबद्दल विख्यात आहेस. आणि त्या अनुभवावरून सांगतो तुझं हे निवृत्तीचं टायमिंगही अगदी अचुक आहे. यावेळचा कॉलही तू बिनचुकपणे घेतला आहेस आणि निभावला आहेस. म्हणून तर तुला आम्ही मिस्टर डिपेंडेबल म्हणतो ना!
खरं सांगायचं तर तुझा खेळ मला नेहमीच एखाद्या मुरब्बी, ठाय लयीत गाणार्या दर्दी गायकासारखा वाटत आलाय. अगदी शांतपणे खेळपट्टीचा अंदाज घेत, प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीची शक्तिस्थाने ओळखत, त्यांच्या क्षेत्ररक्षणाचे व्युह भेदत आपल्या खेळाचा स्वर हळु हळू करत थेट तारसप्तकात नेवून ठेवणे हे तुझ्या खेळाचं वैशिष्ठ्य. मला वाटतं भारताचा भारताबाहेर सर्वाधिक यशस्वी ठरलेला एकमेव खेळाडू असशील तू. जगातल्या क्रिकेट खेळणार्या प्रत्येक देशाच्या संघाविरुद्ध प्रत्येक देशात खंडीभर धावा करणारा तू एकटाच असशील. परिस्थिती जेवढी प्रतिकुल तेवढा तुझा सुर जास्त चांगला लागायचा. आपल्या प्रत्येक खेळातून स्वतःच्याच चुका शोधत त्या सुधारत राहणे हा तुझा मुलभुत गुण. त्याच्या जोरावरच तर तू इथपर्यंत येवून पोहोचलास. आजही कसोटीत सर्वाधिक धावा करणार्या खेळाडुंच्या रांगेत जगात दुसर्या क्रमांकावर आहेस तू. तुझ्या पुढे असण्याची ताकद फक्त सचीनमध्येच होती. कसोटीमध्ये १३,२८८ धावा (त्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतके) तर एक दिवसीय सामन्यांमध्ये १२ शतके आणि ८३ अर्धशतके (एकुण १०,८८९ धावा) सोपं नाहीये रे हे.
खरं सांगू का जॅमी, तशी आकडेवारी सगळी जिभेवर आहे रे. पण तुझं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी, या... या असल्या आकडेवारीची मुळी गरजच नाहीये रे. तुझी संपुर्ण कारकिर्दच एवढी देखणी आहे ना की या असल्या आकडेवार्या, संख्याशास्त्रे, हे विक्रमांची नोंद ठेवणे याची गरजच भासत नाही आम्हाला. या सगळ्याची गरज फक्त रेकॉर्ड किपर्सना. आम्हा तुझ्या पंख्यांना त्याची गरज नाही.
आमच्यासाठी फक्त राहुल आमचा आवडता खेळाडु आहे हे पुरेसे आहे. नसेल तो तेंडुलकरएवढा आक्रमक, पण त्याच्या टायमिंगची सर इतर कुठल्या खेळाडुच्या बॅटला आहे? भारतीय टीम खरोखर अतिशय उत्तम टीम आहे. प्रत्येक खेळाडुच्या भात्यात एक ना एक ब्रह्मास्त्र आहेच आहे. पण जॅमी, ही सगळी ब्रह्मास्त्रे एकहाती आणि सहजपणे वापरू शकणारे टीममध्ये जे बोटावर मोजता येणारे खेळाडु आहेत त्यात तू खुप वरच्या क्रमावर आहेस. तुझ्या भात्यात असलेल्या विविध फटक्यांबरोबर संयम, प्रसंगावधान, विनम्रता, टायमिंग आणि सहनशीलता ही तुझी अस्त्रे अजुन कुणाजवळ आहेत? तुझ्या या अस्त्रांमुळे जगातल्या प्रत्येक (समकालीन) उत्कृष्ट अशा खेळाडुलाही कधी ना कधी आपलीच नखं कुरतडायला, आपला संयम सोडायला भाग पाडलेलं आहे. मुजरा स्विकार भावा !
तुझी उणीव जाणवेल हे तर नक्कीच. आम्ही तुला कधीच विसरु शकणार नाही हि काळ्या पाषाणावरची रेघ आहे मित्रा !
अलविदा.......
तुझ्या असंख्य चाहत्यांपैकी एक.... !
मस्त लिहिलय विकू
मस्त लिहिलय विकू
मस्त रे विशाल! सुंदर लिहीले
मस्त रे विशाल! सुंदर लिहीले आहे.
बीसीसीआयने कदाचित त्याला 'फेअरवेल सिरीज' बद्दल विचारलेही असेल. पण राहुल त्याबाबतीत थोडा ऑस्ट्रेलियन्स सारखा आहे.
मस्त लिहीलेय विशाल! मून, एड
मस्त लिहीलेय विशाल!
मून, एड स्मिथच्या लिंकबद्दल धन्यवाद.
हो ना ललिता. मलाच बाफ
हो ना ललिता. मलाच बाफ चुकल्यासारखे वाटतेय.
मस्तच विशाल.
आगाऊ, उत्तम लिहिलंत अगदी
आगाऊ,
उत्तम लिहिलंत अगदी
असा स्कोअरबोर्ड आता पुन्हा
असा स्कोअरबोर्ड आता पुन्हा पाहायला मिळेल का कधी?
कसला कल्ला स्कोअरबोर्ड आहे!
कसला कल्ला स्कोअरबोर्ड आहे! ही कुठली टेस्ट?
Pages