मायबोलीवरच्या गप्पागोष्टी या सुप्रसिद्ध धाग्याच होणार होणार म्हणुन एप्रिलपासुन गाजत असलेल गटग अधिक आषाढ कृ.११ शके १९३६, रवीवार दि. १२.०७.२०१५ रोजी सकाळी ११ वाजता (एकदाच) झाल. सुरुवातीला सर्वानुमते मंजुर करण्यात आलेल्या तारखेला ठरलेल गटग केवळ एका सभासदाच्या अनुपस्थितीच्या आगाउ सुचनेने पुढे ढकलल गेल. (कित्ती कित्ती चांगले आहेत नै पंत) गटग संयोजक/आयोजक बाळाजीपंत यांनी सुरुवातीला सर्वानुमते ठरलेली तारीख, नंतर पुढे ढकलेली तारीख आणि गटगच्या तारखेची प्रेमळ आठवण (मराठीत जेंटल रिमाईंडर) पाठवले. या गटगचे आमंत्रण जुन्या, नव्या अशा सर्व सभासदांना गेले होते.
स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग -१
नुकत्याच घेतलेल्या स्मार्टफोनवर एक अॅप आढळले - स्केच नावाचे. त्याच्याशी खेळताना लक्षात आले की हे पाटी पेन्सिलसारखे आहे. सेलचा स्क्रीन ही पाटी आणि आपले बोट ही पेन्सिल - वेगवेगळे रंग, खोडरबर(इरेजर) अशा गोष्टी सापडल्यावर माझ्या मनातले मूल जागे न झाले तरच नवल...
लहान मुलांना प्राणी - पक्षी यात सर्वात जास्त इंटरेस्ट असल्याने हे उंदीर, ससा मी नेहमीच कुठल्याही कागदावर काढत असतो - तेच पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केला ...
या आधीचे उद्योग
''मोतीबाबू आहेत का?'' सुरेशबाबूंनी बाहेरूनच विचारले. आश्रमातील बंगल्याच्या व्हरांड्यात पायाशी शेगडी ठेवून, वेताच्या खुर्चीत आरामात वर्तमानपत्र वाचत बसलेल्या जयंतीबेन त्यांना पाहून जरा दचकल्याच!
''या, या सुरेशबाबू.... आज आमच्या बंगल्याची पायधूळ कशी काय झाडलीत? या ना, बसा, बसा. मोतीबाबू आत जप करत आहेत. येतीलच पाच-दहा मिनिटांत. काही काम होतं का?'' जयंतीबेन हातातील वर्तमानपत्र बाजूला सारत उद्गारल्या.
रोज सरळ सूत असलेली भांडी, उपकरणं अंगात आल्यासारखी भूत होतात का तुमच्यात?. का माझ्याच बाबतीत हे?
एकाच किंवा वेगवेगळ्या साईजच्या डब्यांचे सेट नेहमीच घेतो आपण. स्टीलच्या अशा डब्यांचं तर एक "इटालियन" भरगच्चं कुटुंब आहे माझ्याकडे. इटालियन अशासाठी की असे खूपच आहेत... एकाच मापाचे आणि एकात एक बसतील असेही.
ऑफिसात काम नाही, मा बो वर नवीन कथा नाहीत! (मोरपिसे पण संपलेली!!!)
अशावेळी काय करावं काही सुचत नव्हतं. म्हटलं जरा फ्रेश होऊन यावं, बॅग उघडली अन समोर माझं आयलायनर दिसलं! मग क्काय! माझ्यातला लपलेला कलाकार (??????) टुण्णकन उडी मारून बाहेर आला!!!
बघा कसं वाटतंय!
पहिल्यांदाच केलंय बरं!
(ते अर्थातच माझ्या कलेची 'क्वालिटी' बघितल्यावर जाणकारांच्या लक्षात येईलच म्हणा!!)
प्रचि १
प्रचि २
आपल्या मायबोलीवर काही अप्रतिम, एव्हरग्रीन आणि अशक्य विनोदी धागे आहेत. हे धागे म्हणजे डिप्रेशनवर रामबाण उपाय. जरा 'लो' वाटायला लागलं तर यापैकी कोणताही धागा उघडून सरळ वाचायला सुरुवात करा आणि आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करा. प्रतिसादात जे धागे सुचवले जातील त्यातील निवडक इथे एकत्र साठवून ठेवण्यात येतील.
कृपया धाग्याचे नाव, धागा काढणार्या आयडीचे नाव आणि धाग्याची लिंकही खालील फॉरमॅटमधे द्या.
* लहानपणीचे नसते उद्योग - योडी - http://www.maayboli.com/node/8242
* मला चुकीची ऐकू आलेली गाणी - परदेसाई - http://www.maayboli.com/node/2660
इतके दिवस गटग प्रकरण रोजच गाजत होतं, वाट पाहता पाहता महाचर्चेचा शेवट होऊन सन्माननीय अतिथी शा गं यांच्या उपस्थितीत नेहमीच्याच ठिकाणी 'पुणे गटग' संपन्न झाले. संयोजकांना उपस्थितीबद्दल वाटणारी शंका धुळीस मिळवत माबोकरांनी आपले माबो / गगोप्रेम सिद्ध केले.
पुणेकर वेळ पाळण्यास असमर्थ आहेत अशी जोरदार टीका करत मुंबईकर आणि पेणकरांनी गटग ला वर्णी लावली. १०.३० ची वेळ देवुनही पुणेकरांमुळे गटग चे १२ वाजले हे मत पुणेरी स्वाभिमान दुखावलेल्या
कृती किचकट आहे; बर्याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.
या आधीचे उद्योग