स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग - ३
आता या अॅपबद्दल अजून अजून कळू लागले आहे. अर्थातच ज्याने कोणी हे बनवले आहे त्याला चित्रकलेची आणि रेषा, विविध आकारांची जी जाण आहे त्याला मानावेच लागेल. या अॅपमधील ब्रश, पेन्सिल, इरेजर इ. जी साधने दिलेली आहेत ती पहाता या छोट्याशा स्क्रीनवर काय काय गमती जमती करता येतील हे पूर्णपणे आपल्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारेच आहे.
जसजशी आपण ही साधने व विविध रंग वापरत जाऊ तेवढी त्यातील गंमत समजत जाऊन या अॅपमधे अगदी लहान मुलासारखे रमायला होते...
मला स्वतःला पाने-फुले इ.चे रंग, आकार यांचे आकर्षण असल्याने ते काढायचा प्रयत्न केला आहे.
१]
स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग -२
स्केच अॅप वापरताना खूपच मर्यादा (लिमिटेशन्स) येतात हे लक्षात आले होतेच.
यातील मुख्य अडथळे म्हणजे -
१] बोट नेमके कुठे टेकले आहे हे कळत नाही.
२] रेघ/ रेषा मारताना एका बाजूला जरा जाड येते तर दुसर्या बाजूला जरा बारीक
३] रंगांचे मिश्रण करता येत नाही.
४] एकाच रंगाच्या विविध शेड्स निर्माण करता येत नाहीत.
५] एकसारख्या रेषा कधी नीट येतात तर कधी पार गंडतात
तरीही हे अॅप इतके चॅलेन्जिंग वाटते की बस्स..
या अॅपची निर्मिती ज्याने केली त्याच्या मनात नेमके काय असेल असे राहून राहून वाटते ...
स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ...
भाग -१
नुकत्याच घेतलेल्या स्मार्टफोनवर एक अॅप आढळले - स्केच नावाचे. त्याच्याशी खेळताना लक्षात आले की हे पाटी पेन्सिलसारखे आहे. सेलचा स्क्रीन ही पाटी आणि आपले बोट ही पेन्सिल - वेगवेगळे रंग, खोडरबर(इरेजर) अशा गोष्टी सापडल्यावर माझ्या मनातले मूल जागे न झाले तरच नवल...
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लहान मुलांना प्राणी - पक्षी यात सर्वात जास्त इंटरेस्ट असल्याने हे उंदीर, ससा मी नेहमीच कुठल्याही कागदावर काढत असतो - तेच पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केला ...
![rabbit1.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31466/rabbit1.JPG)