माहेर .. एक आठवण..
माहेर .. एक आठवण..
आता कोणीच नाहीये तेथे
हा.. आहे तो पडका वाडा
अन ती ओसाड चावडी
माझी शेजारची मैत्रीण
माहेराला जाते तेंव्हा
ओल मन माझ
जात त्या गावाला .. माझ्या माहेराला
त्यास मग पडका वाडा नाही दिसत
की नाही दिसत ओसाड चावडी
माहेर .. एक आठवण..
आता कोणीच नाहीये तेथे
हा.. आहे तो पडका वाडा
अन ती ओसाड चावडी
माझी शेजारची मैत्रीण
माहेराला जाते तेंव्हा
ओल मन माझ
जात त्या गावाला .. माझ्या माहेराला
त्यास मग पडका वाडा नाही दिसत
की नाही दिसत ओसाड चावडी
किती दिवस झालेत एकसंध असल्याला..?
अनुभवाच्या आघातांनी कितीतरी तुकडे केलेत
एकही तुकडा आपली छटा सोडणार नाहीये
हा तुकडा म्हणजे मी! ...नव्हे तो,
तो तिकडचा वेगळा दिसतोय ना..? मग तीच मी..!
नाहीतर पलिकडचा, छे....! अवघड आहे.
असेच जरा मागे वळून बघताना संकोच वाटला की
दोन-चार तेच क्षण आता संपत चालले आहेत.
त्यासम नवीनही येतीलच पण कुणास ठाऊक
संथ वाहणारा वारा, रिकामाच रस्ता, परत वळलेली पाऊले
त्यात भर म्हणून अस्वस्थ करावी अशी एखादी शीळ,
तुझ्या गीताचे मी कीती सुर प्राशिले
तरी शब्द उभा ओठावरी तहानलेला
तुजसाठीच रचलेला मी खेळ सावल्यांचा
सावलीने सावळा तव श्रुंगार केला
गाव तुझेही सखे क्षीतीजापल्याडचे
तुझ्यासाठी प्रवास मी हळुवार केला
नको अशी मागे मागे
वळूनिया पाहू
तुझ्या पुढे काळजाचे
ठोके जाती धावू
निथळती केश गाठ
मानेवर आंदोळत
तिच्यासंगे झुलतो ग
नजरेचा राऊ
एक तीळ अलवार
अधराच्या कडेवर
त्याला चाखण्याची, गोड
खोड नको दावू
कमरेस गोल घट
डचमळे काठोकाठ
पुन्हा एकदा आलंच!
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं,
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान,
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात;
खांब उखडून पडलेत
("अजूनही बरीच नासधूस झालीये")
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतंय
सिमेंट्ची पक्की भिंत बांधून घ्यावी!
आणि हो, वरती फुट्क्या बाट्ल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकवायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
("आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना" )
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय!...
माझी तू त्याची होताना
सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना
मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?
एकाच वाटेचे पक्शी आपण
मी म्हणे झोपेतच हसलो.
खुप केला प्रयत्न.
झोप आठवली.
स्टेशन बदलत बदलत जागही आठवली.
मगर, झोपेतच हसायची ती वजह नाही आठवली.
कुणी म्हणालं 'स्वप्न पडलं'
कुणी, 'पोरगं प्रेमात पडलं'
आजी तर ग्रेटच,
म्हणते कशी, 'बाळकोबा मनी कोण जडलं!'
लालबुंद अंग तयाचे
पंख लाभले केशराचे
बघता मनात भरते
फुलणे गुलमोहराचे
आकाश अवनी त्रस्त
ग्रिष्माच्या असह्य दाहाने
कोमेजती वॄक्ष वेली
वायुच्या तप्त प्रवाहाने
जरी जग त्राग्यात सारे
स्वारी मात्र हसरी दिसते
कशाला हवाय अट्टाहास
एका सहीनी सुरू होऊन,
दुसर्या सहीनी संपणार्या नात्याचा ?
त्याच्या दृष्टीनी काय फक्त सही असते ..
सुरू होताना असो की संपताना !
तिच्या मनात मात्र दाटलेली हुरहुर,
मेंदीचा रंग, हिरवा चुडा,