Submitted by nikhilmkhaire on 20 February, 2008 - 05:56
मी म्हणे झोपेतच हसलो.
खुप केला प्रयत्न.
झोप आठवली.
स्टेशन बदलत बदलत जागही आठवली.
मगर, झोपेतच हसायची ती वजह नाही आठवली.
कुणी म्हणालं 'स्वप्न पडलं'
कुणी, 'पोरगं प्रेमात पडलं'
आजी तर ग्रेटच,
म्हणते कशी, 'बाळकोबा मनी कोण जडलं!'
मग तर मी चक्क लाजून वगैरे पण घेतलं.
आज इथे दूरवरचं क्षितिज पाहताना,
माझे वेडे विनोद ऐकताना,
एवढंच काय पण हे सगळं वाचताना
तू मंदमंदशी हसतीयेस.
एक कोडं सुटलं.
मी झोपेत का हसलो.
सगळं कसं लख्ख आठवलं.
स्टेशन बदलत बदलत जागही आठवली.
और झोपेतच हसायची ही सुंदर वजह पण आठवली.
निखिल.
गुलमोहर:
शेअर करा
!!!
!!!