रंग
बरं झालं सगळं ओसाडच राहिलं
सर्वत्र शीळ घालत बरोबर धुराळा घेऊन
फिरणारा वारा आणि
पिवळ्या रखरखीत रंगाचं ऊन.
माझ्यातच उमलेला आणि करपलेला
एक अंकूर
आता या रंगांमध्ये अगदी सहज लपुन जाईल.
'कुणालाच तो दिसणार नाही!'
'मग आधाराचे हात?'
बरं झालं सगळं ओसाडच राहिलं
सर्वत्र शीळ घालत बरोबर धुराळा घेऊन
फिरणारा वारा आणि
पिवळ्या रखरखीत रंगाचं ऊन.
माझ्यातच उमलेला आणि करपलेला
एक अंकूर
आता या रंगांमध्ये अगदी सहज लपुन जाईल.
'कुणालाच तो दिसणार नाही!'
'मग आधाराचे हात?'
ही खोड तुझी जुनीच आहे
पण-परंतुच्या शब्दापल्याड
वाक्य तोडायची
नि बोलता बोलता मुद्दा सोडून
विषय बदलायची,
ही खोड तुझी जुनीच आहे
तुझ्यामुळे माझ्या विचारांना
दिशा मिळाली असं म्हणण्याची
नि कळतनकळत मला सतावत
सखे,आताशा मी माझ्यावर प्रेम करण सोडून दिलय
कारण माझ्यातला मीच आता मला सापडनेसा झालाय
पण एवढं मात्र ख्ररं की मी आता आरशावर प्रेम करू लागलोय
कारण प्रतिमेत तुझा चेहरा माझ्याकडे पाहून हसू लागलाय
पंढरीच्या वारकर्यांच्या रसात गुंगून न्हाताना ---- देव दिसतो
नि मला तु दिसतेस
गोजीरवाण्या बाळाच्या निरागस सुंदर हसण्यात----देव दिसतो
नि मला तु दिसतेस
तुम्ही लिहीलेली कविता मंगेश पाडगावकरांची आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/3011.html?1069043804
गुलमोहोर या सदरात फक्त स्वत:चच साहित्य अपेक्षीत आहे.
- Moderator
उधळला मी डाव का? ते आठवे फिरुनी मला,
निश्चयाची ती उतारी मज कळे चुकली पुन्हा
दोन आले चार गेले , हात हाती मोजता,
मिळ्वण्यातिल ती गुलामी घातकी ठरली आता
हाय ! झाला आज एक्का , हुकुम असुनी एकटा,
तू जाताना...
मातलेला चंद्र आहे चांदणे विझवून जा
चेतल्या स्वप्नांस माझ्या तू जरा निजवून जा
भांडते आकाश सारे त्या जरा रिझवून जा
रातीच्या गर्भात उद्याचा तेजपूंज उजवून जा
गोंदल्या क्षणांस पुन्हा एकदा गिरवुन जा
तुझ्यासवे घालवलेले दिवस आठवतात अजून,
अजून आठवतात रात्री काढलेल्या जागून,
मग नकळत,अचानक पानी येत दाटून.
शीडात शिरलेला उनाड वारा
कातर वेळेला भाऊक होता होता
सजल होऊन अश्रू ढाळतो //
शीळ घालत नादातच घुमणारा शामसुंदर
नितळ कांतीच्या राधेला पहाता पहाता
निर्बल होऊन वेडापिसा होतो //
शीघ्रतेला साथ देणारा उद्वीग्न सागर