कविता

कविता

Submitted by vinayakg on 20 February, 2008 - 01:39

किती प्रयास घ्यावे लागतात

यशाचं शिखर चढण्यासाठी

पण, जरासा गर्व पुरा पडतो

वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण

नवसाला न पावण्यासाठी

कितींदा जिगर दाखवतो आपण

इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

गुलमोहर: 

जीवन.......

Submitted by vinayakg on 20 February, 2008 - 01:36

जीवन हा एक प्रवास आणि
आपण प्रवासी त्या वाटेवरचे
कधी सुखाचा उतार
तर कधी दु:खाची चढण
थोडी कमी जास्त
पण प्रत्येकाच्या वाट्याला येणारी
अगदी न चुकता,
हा प्रवास कधीही न संपणारा
संपतो फक्त मृत्यूच्या दारात,
मग हा खटाटोप कशासाठी

गुलमोहर: 

पाऊस - (जुनीच)

Submitted by दाद on 19 February, 2008 - 16:49

मनिषाची 'सहज' वाचली अन माझी एक जुनी कविता परत एकदा टाकायचा मोह टाळता आला नाही.... (admin, वाटली तर खुशाल उडवून टाका इथून)

पाऊस

आपल्या आत आत एक
पडत असतो पाऊस
कोणी पुसलं की
दडत असतो पाऊस

मनाच्या शिवारात
सयींच्या मोसमात

गुलमोहर: 

आकशातील मी घन काळा

Submitted by शब्दमेघ on 19 February, 2008 - 07:10

आकाशातील मी घन काळा
रोज शृंगारीत होतो मी
लेऊन रंग शलाका

नाही सीमा नाही बंधन
नभात स्वैर फिरणारा
मी मेघ-राजा

पण लोभ असा मज जडला
प्रवास संपून गार हवेच्या
प्रेमात जीव अडखळला

प्रीतीत तिच्या मी
जग विसरून गेलो

गुलमोहर: 

तू

Submitted by गणेश भुते on 19 February, 2008 - 06:45

जवळ असताना अन् नसतानाही
माझ्या मनात असतेस तू
बहरातल्या मोहोरात भिजुनी
लाजुन गालात हसतेस तू

आसुसलेल्या प्रत्येक भेटीत
रोज नवी कळतेस तू
नाजुकशा वळणावर
मला सावरत वळतेस तू

सहवासातुनी प्राजक्ताचा
अखंड वर्षाव करतेस तू

गुलमोहर: 

तुला चन्द्र बघताना

Submitted by गणेश भुते on 19 February, 2008 - 03:26

तुला चन्द्र बघताना
माझे गीत आठवले
भावहळव्या ह्रुदयी तू
प्रेम किती साठवले?

गुलमोहर: 

कवडसे

Submitted by मीन्वा on 18 February, 2008 - 06:19

तुझ्या येण्यानी विस्कटलीत,
वर्तमानाच्या छप्पराची काही कौलं !
मग त्यातूनच कधी तरी डोकावतात,
भूतकाळातील आठवणींचे खट्याळ कवडसे.
दिवस दिवस जातात,
कवडसे पकडण्याचा,
निरर्थक खेळ खेळण्यात ..
रात्र होताच,
तुझ्या आठवणींचे कवडसे,

गुलमोहर: 

तू

Submitted by vasant_20 on 18 February, 2008 - 02:46

तू

दरवर्षी थंडी पडते,
या वर्षी जरा जास्तच आहे,
स्वेटर,जर्कीन्,कानटोपी घालुनही ती जाणवतेय,
विचार केल्यावर कळल,
थंडी पूर्वीप्रमाणेच आहे,
फक्त तू जवळ नाही म्हणून ती सतावतेय !,

गुलमोहर: 

शेवटचं पान कोरं

Submitted by girishmusic on 16 February, 2008 - 02:46

शेवटचं पान कोरं

शेवटचं पान कोरं
प्रत्येक वहीच्या अंती
मी हळूच दुमडुन घेतो
आतच अपुल्या खंती

किति दूर कुठे फुलते ती
ती नील किनारी कलिका
द्रुष्टी पण माझी नाही
नाही पोचत तिथवर का?

या दुष्ट मनाच्या काठी
मी असेन हतबल बसला

गुलमोहर: 

पुन्हा पाऊस

Submitted by मीन्वा on 15 February, 2008 - 09:08

पुन्हा एकदा दगा दिला
अवेळीच पाऊस आला

भिजणं तर ठरलेलंच..
खरं म्हणजे अपरीहार्य,
आत्ता कुठे वाटंत होतं..
येतंय, येतंय थोडं स्थैर्य.
पुन्हा एकदा दगा दिला
अवेळीच..

भिजणं, फसणं
फसणं, भिजणं
सारं काही ठरलेलं.
बांधुन पाहीलं घरही,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता