अट्टाहास

Submitted by मीन्वा on 20 February, 2008 - 01:50

कशाला हवाय अट्टाहास
एका सहीनी सुरू होऊन,
दुसर्‍या सहीनी संपणार्‍या नात्याचा ?

त्याच्या दृष्टीनी काय फक्त सही असते ..
सुरू होताना असो की संपताना !

तिच्या मनात मात्र दाटलेली हुरहुर,
मेंदीचा रंग, हिरवा चुडा,
सजलेल्या घराची स्वप्न,
दूर कुठेतरी चिमण्यांचा कोलाहल,
सुरू होताना ...

त्याचं वागणं, त्याचं हसणं,
त्याचं बोलणं, त्याचं चिडणं,
त्याची आवड, त्याची निवड ..
छे ! सगळं सगळं त्याचंच संपताना ..
म्हणून म्हणते कशाला हवाय अट्टाहास,
एका सहीनी सुरू होऊन ......

गुलमोहर: 

भावना छान मांडल्या आहेत

सुंदर लिहिल आहेस... भाव सुंदर उतरवले आहेस मोजक्या शब्दात

ओळखीचा आहे तरी गंमत खरी, त्याचे उत्तर मात्र सापडत नाही!

कविता आवडली.

तिच्या मनात मात्र दाटलेली हुरहुर,
मेंदीचा रंग, हिरवा चुडा,
सजलेल्या घराची स्वप्न,
दूर कुठेतरी चिमण्यांचा कोलाहल,
सुरू होताना ...

खुपच छान!