कुणी हा रंगाचा असा बाजार केला?

Submitted by sachinkakade on 23 February, 2008 - 05:33

तुझ्या गीताचे मी कीती सुर प्राशिले
तरी शब्द उभा ओठावरी तहानलेला
तुजसाठीच रचलेला मी खेळ सावल्यांचा
सावलीने सावळा तव श्रुंगार केला

गाव तुझेही सखे क्षीतीजापल्याडचे
तुझ्यासाठी प्रवास मी हळुवार केला
मज नव्हती तमा तेव्हाही उन्हाची
अन तु सावलीतही हाहाकार केला

मी न मागितला तुला कधी उजाळा?
तु दिलेस शब्द मी गीतांचा झंकार केला
पेटल्या जरी स्वरांच्या वक्षी दिपमाळा
तरी स्वप्नदेश माझा सखे अंधारलेला

चिरंतर दुख:चा मी बंदीवान झालो
गजाआड आसवाला मी यार केला
भय न आता मज नव्या वेदनांचे
मी जुन्या जखमांचा सत्कार केला

राग ना मला या हस-या मैफ़ीलीचा
हसुन आज पाहतो हातातलाच प्याला
दिवसामाजी बदलतो रंग प्याल्याचा
कुणी हा रंगाचा असा बाजार केला?

--सचिन काकडे [फ़ेब्रुवारी १,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"

गुलमोहर: 

सचिन मस्त कविता आहे खुप