माहेर .. एक आठवण..

Submitted by शब्दमेघ on 26 February, 2008 - 01:32

माहेर .. एक आठवण..
आता कोणीच नाहीये तेथे
हा.. आहे तो पडका वाडा
अन ती ओसाड चावडी

माझी शेजारची मैत्रीण
माहेराला जाते तेंव्हा
ओल मन माझ
जात त्या गावाला .. माझ्या माहेराला
त्यास मग पडका वाडा नाही दिसत
की नाही दिसत ओसाड चावडी
त्यास दिसते ते बालपण...त्या वाड्यातील,
मजेशीर गप्पा आणि तो पत्त्यांचा डाव ..त्या चावडीवरील

दिसते नववारीतील आई
गोठ्यातून दुधाची कळशी घेवून येताना
अन दिसते ती बकुळी गाई अन
तीची ती, माझ्या आवडीची चंद्रीका

अन अडखळते माझ मन ही
मी ही अडखळायची तसेच
अप्पांच्या खोलीत जाताना
तोच तो धुंद सुहास अन
अन प्रार्थनेचा आर्त सूर

दिसते मनाला माझ्या
ते अंगण अन माझ्या जिवलग मैत्रीणी
अन त्या सोबत ते चींचेचे झाड
अन त्या खालील आमचा भातुकलीचा डाव

दिसते ती शाळा छोटीशी
अन ते पाटिल गुरुजी
अन दिसते मधल्या सुट्टीत
फ़ळ्यावर ओभड चित्र रेखाटणारी मी...

ओभड चित्र (?) .. मन थार्यावर आल
माहेरच चित्र माझ्या पुन्हा
ओल ते मन नकळत फ़िरुन आल
अन आठवणींना माझ्याच भिजवून गेल

-------- गणेशा

गुलमोहर: 

सगळ्यांच्या आठवणीत एक चिंचेचं झाड असतं नाही......मी एकदम माहेरी जाउन आले.

गणेशा, माहेर छान रेखाटलं आहेस.
शुद्धलेखनाकडे पण लक्ष दे.