अपार शिष्य भक्त अनावर
त्या दारावर खाल्ल्या खस्त्ता
कुठे जयजयकार ऐकला थोर
खिसा खाली पार झाला तिथे
जागृत समाधी जाता स्थानावर
पहिला बाजार जणू लूटमार
कुठे अशी भक्ती संप्रदाय सक्ती
मेंढरांचे चालती जणू कळप
काही विचारिता बसतात थपड़ा
आपुल्या झापड़ा काढाया मना
तीच तुणतुण विरक्तीचे गुण
उपभोगी सजुन ऐकायची
कुठे राजकारण चाले संवर्धन
फौज उभारण धर्मिकांची
अथवा पैश्याची देउनी नशा
भोगाची आशा शिष्यगणा
निवडून सधन उच्यपद जन
चाले तत्वज्ञान यश वृद्धिचे
असा हा प्रवास चाले रात्रंदिस
झाडाखालच्या फळ्यावरच्या
उभ्या आडव्या रेषा
जमिनीवर उमटल्यात
ओस पडलेली शाळा
माळावरची रणरण
कुठे वैरण कुठे वणवण
चिमुकल्यांच्या हातातले दुभते कासे
आणि पायाखाली चटकती खाटीकवाट
किती ओढ देशील ?
कोळ्याची जळमटं
कपाळावर चढलीत
डोळ्यातल्या भेगा रुंदावल्यात इतक्या
कि टिप्पूससुद्धा एखादा ठरत नाही थेंबाचा !
आलाच नाहीस तर विझतोय .. फडफडता दिवा
आलास तर बुडवशील.. माझ्या गावा
एक भिंत डोंगरात उभी राहील
आणि
स्वप्नांची समाधी खोल खोल जाईल
तेव्हां
बाहेर आणि डोळ्यातही कोसळसरी असतील
मात्र.. उताराउतारावर झगमगणा-या
लाखो दिव्यांसाठी तरी..
आवंढा गिळून विचारतोय... या दुश्मनदोस्ताला
आला आला पावसाळा
आल्या कवितांच्या सरी
रसिकांनो चिंब व्हावे
घ्याव्या भरून घागरी
*
नाचे ग्रीष्माच्या उन्हात
माझ्या शब्दांची मयूरी
उष्मा कितीही भासला
माझे काव्य थंड करी
*
कन्या निघाली सासरी
कवीराज त्वरा करी
शब्दभांडार संपले
थांबा खोलतो तिजोरी
*
प्रियकर खूप झाले
प्रिया कमी पडतात?
भिऊ मुळीच नका हो
बाण असंख्य भात्यात
*
मित्रा सांग काय वाटे
खावेसे रे तुला तरी
देतो शब्दांचे पराठे
आणि कवितांची करी
*
घसा कोरडा पडला
कशी तहान भागेल?
कोण जिव्हाळ ओढीने
कुठे हा मेघ धावतो?
वेथेत पिंज पिंजूनी
निरव थेंब सांडतो.
शितचंद्र ओल ती
धरेत खोल साचते
एकलेच कोण ते
बनात फूल वेचते?
स्मृतीत आज चांदणें
मंद मंद हासते
उर्मिलेस का तरी,
सुने सुने भासते?
काय दाटले उरी
धुंद धावते पदी
कंप पावते जळी
सैर बावरी नदी.
* * *
पडू द्या सरिवर सरी
(चालीसाठी शिर्षकावर क्लिक करा.)
वीज कन्यका तळपत पाहुनी,
मेघ गर्जना करी ।
पडू द्या सरिवर सरी हो सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥धृ॥
आकाशाशी नाते जोडी धरतीशी हो सरी,
पर्जन्याच्या सरी ।
पर्जन्याचे तांडव मांडी कृष्णमेघ अंबरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥१॥
घेऊनी तांडा मेघांचा हो आला शिरावरी,
भरुनी पाण्याच्या घागरी
सह्याद्रीचा कृष्ण अडवितो, धो धो पडती सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥२॥
मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी
मिटलेपणात ही
ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते
उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू नको
मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही
ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात
विक्रांत
एक कळी फूलली अन् उमलली
वा-याचे गाणे पाकळ्यात भरून झूलली
नव्हते तीला भान काळाच्या मण्यांचे
सरकत चालली माळ पोकळ क्षणांची
वा-याच्या करांनी तीला हळूवार गोंजारले
तीने ओढली लकीर त्याच्या वक्षा वर गंधाची
सूटून जाईन मी हलकेच धरतीवर
पूनश्च माती होईन पण पून्हा याच झाडावर
हीच कळी होईन!!!
लाभले तुला अपूर्व रूप मेनकेसमान
दोष काय जर तुला बघून डोलले इमान?
ऊरभेट वस्त्रगाळ शांतवील का तहान?
चंद्र पाहु दे निरभ्र, फेड लाज, देहभान
का उगाच संस्कृतीस ओढतेस आपल्यात?
प्रेमिकांत का कधी अधरसुधा अपेयपान?
नाहतेस चांदण्यात, नाहतेस तू जळात
आज अमृतात प्रीतिच्या करू अचैल स्नान
"गोड गोड बोलण्यास धूप मी न घालणार
माळ घातल्याविना न द्यायची मरंददान"
पावसाचे महिने
कवितांचा पूर
सरी, बरसतात
मेघ, दाटतात
डोळे, भरतात
पालवी, कोंब, फुटतात
नवचैतन्य, संचारते
आसंमंत, धुंद
पाणी, रोंरावते
शहर, ठप्प
स्पिरीट स्पिरीट
हृदय, द्रवते
इत्यादी
मागे-पुढे-पुढे-मागे-वर-खाली-खाली-वर
भावना नुसत्या चिंब चिंब
टपक टपक
कविता टिपटिप
जागतिक कंटाळा
स्वस्त, गुळगुळीत, भडक पावसाचे अस्तित्व
खर्या पावसात विरघळून नाहीसे होते.
मनाला स्वच्छ, बरे वाटते
-नी
वोह जब याद आयें बहुत याद आयें..
आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..
दु:खाच्या घनगर्द तमी जळते-विझते प्रीतज्योती
चाहुलीने त्या रस्ते हसले अंतर्यामी
काहूर उरातील जरा शांतवत उठलो मी
घेरते जिवाला कितीदा भासांची सृष्टी
..ती येते दूरून अधोवदन झुकवून दृष्टी
आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..
जळत्या हृदयावर अश्रूंची वाहे धारा
लोकांची कुजबुज क्षोभ मनाचा तो सारा
उमटते स्मित पण भिजलेल्या गालांवरती
- स्वप्नात येऊनी मंदमधुरसे हसते ती
आठवते तेव्हा खूप खूप आठवते ती..
ती गेली सरले जगणे उरलेले श्वसणे
ज्योतीने निरंतर प्रकाशाविना हे जळणे