पाऊस आवडतो का ?
पाऊस आवडतो का ?
मध्यरात्री पावसात ...
टप-टप गळणार्या झोपडीत...
आपल्या पाखरांवर टोप धरून..
बसलेल्या आई-बाबांना आपण..
विचारूच कस शकतो...
पाऊस आवडतो का ?
हातावर पोट असणार्या...
अंग झाकायला कपडे घेतानाही...
ज्याला विचार करायला लागतो..
असा माणूस जेंव्हा पावसात ..
छत्री नाही म्हणून भिजत असतो..
त्याला विचारूच कस शकतो..
पाऊस आवडतो का ?
घरात पावसाच पाणी शिरल..
म्हणून उरलसुरलेल्या सामानासह ...
खाटेवर संसार थाटणार्या आईला...
आपण विचारूच कस शकतो
पाऊस आवडतो का ?
पावसात रत्याने चालताना..
खड्यात पाय अडकून पडणार्या...