कविता
ऋणानुबंधाची हळवीशी सवे आठवण नेऊ..
काय खरे अन काय असावे खोटे कळतच नाही
दिसते सारे डोळ्यांनी पण काही पटतच नाही
सुखात मी अन सुखात तूही तरी पुरे ना वाटे
कधी कधी ह्या हसण्यामागे 'हसणे' असतच नाही
मनास माझ्या समजावुन मी नवीन स्वप्ने देतो
एक उराशी, एक उशाशी, एक कुशीला घेतो
तरी पुन्हा का निवांत वेळी भरून काही येते ?
स्वप्नपाखरांच्या सोबत मी तुझ्याच गावी येतो..
पुरे जाहले नवीन स्वप्ने रोज पाहणे आता
पुरे जाहले वैशाखाच्या झळा सोसणे आता
पुन्हा एकदा श्रावण होउन रिमझिम तू बरसावे
पुरे जाहले स्वत: स्वत:ला व्यर्थ भिजवणे आता
जरी वाटले बंधनांस मी साऱ्या उधळुन द्यावे..
तरी शक्य नाही आता हे तुला तुझेही ठावे
संभ्रम
ती तूंच होतीस क ?
आताही तूंच का
आहेस ती?
इतकी जवळ होतीस
इतकी जवळ होतीस की
पोटातील गुपित सुद्धा
प्रथम ओठात यायाचे
ते माझ्या कानाशी
इतकी जवळ होतीस
इतकी जवळ होतीस की
अता वाकून ये आभाळा
अता वाकून ये आभाळा
जराशी होईन मी निळा
पहातोय वाट तुझी मी
बनुनी अहिल्येची शीळा
झुंजताना मी तनकटाशी
इथे मोडला रे विळा
गेली सारी सुकून राने
भरु दे चांदण्याने मळा
गेला संपून हा प्रवास
आता उघडावे दार तिळा.
हुदयाच्या ही कैक कळा
तुला सांगेन मी आभाळा
पाहू तरी तुझ्यात आता
खरा आहे किती जिव्हाळा
आठवतंय ...................
आठवतंय सगळं आठवतंय
लहानपणी माझ्या तोंडातली
ती बोबडी भाषा आणि
त्यावरून घरात पिकणारा हशा
तुम्ही बाहेर जाताना
मला नाही म्हणण
पण थोडा रडल्यावर मात्र
मला घेऊनच बाहेर पडणं
दिवाळीच्या दिवसात
माझं फटक्यांना घाबरणं
आणि मग तुमचं
इतरांवर ओरडणं
कोणी नसताना तुमचं
माझ्या बरोबर खेळणं
संध्याकाळी माझ्यासाठी
बागेत येऊन बागडणं
पण , एकदिवस तुम्ही
आमच्यातून गेलात निघून
तुम्हाला शोधता शोधता
मी मात्र गेलो पार थकून
आई म्हणाली आता तुम्ही
कधीच नाही येणार
मीही म्हणालो माझे आजोबा
मला कधीच नाही सोडणार
आजही मला प्रत्येक
क्षण स्पष्ट आठवतोय
तुमच्या त्या चादरीची
शोध
जगण्याच्या या दाट धुक्यात
मी शोधतो आहे काहीतरी
हे धुकं खूप रम्य आहे
पण
सतत काहीतरी
माझ्या समोर असून
दिसत नसल्याची खंत
बोचत राहते मनाला
मग मी तिथे जाऊन पोचतो
थोडाफार थांबतो
मग कळून चुकत
की हे ठिकाण आपलं नाही
मग पुन्हा सुरु होतो
एक नवा प्रवास
वाटेत मला
माझीसुद्धा ठिकाणं सापडतात
पण तरी
नव्या ठिकाणांच कुतूहल
मला खुणावत राहत
साद घालत राहत
बरीच ठिकाण फिरल्यावर
आता जाणवतंय
की मी
स्वतःलाच शोधतो आहे
.
कदाचित
-तुटता तारा
तंबाखू
ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही
तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?
भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली
दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा
आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा
रस्ता वेगवेगळा असला तरी
वाट आमची एक आहे
त्यांचा अंड्याचा.....तर
का मारता आम्हाला ?
(नुकत्याच झालेल्या आषाढ अमावस्येला ("गटारी" ला) लाखो मुक्या प्राण्यांच्या हत्येच्या बातम्या वर्तमानपत्रातून चवीने छापून आल्या होत्या. त्या वेळी त्या हकनाक मरणार्या प्राण्यांविषयी माझ्या मनात आलेले हे विचार)
का मारता आम्हाला ?
का असं करता ?
जिव घेऊन आमचा
का तुम्ही पोट भरता ?
का एका कोंबडीच्या नशिबी
असं मरण येतं ?
जिवंतपणी लोकांसाठी
तिला कापलं जातं
पिल्लालाही तिच्या तुम्ही
लांब का करता ?
अंड्यातून जिव बाहेर येण्याआधीच
त्याला ठार मारता
काय वाटतं तिला
पोटचं पोर असं जातं
आई आणि बाळाचं कुणी
तोडतं का असं नातं ?
'गटारी' जवळ आली की
बकरी सुध्दा घाबरते
मोसम ( पाऊस )
हवामान खात्याची संकेतस्थळं
धुंडाळतोय माझा माऊस
आता कधी येईल पाऊस
उकाडा, जीव घामेजलेला
घन सावळा, न बरसलेला
आषाढा, कोरडा नको जाऊस
आता कधी येईल पाऊस
ज्वर वसुंधरेचा वाढला
प्रगती (?) चा उत्पात सगळा
मानवा अंत नको पाहूस
आता कधी येईल पाऊस
अधिकारानं सांगतात, होईल
कमी-अधीक बरसात, कुठे कुठे
वाट पहा! घाबरुन नको जाऊस!
आता कधी येईल पाऊस
सही केली, हजेरी पुरती
तशी सर, सरसरते
थोडा चिखल थोडा अंधार
एवढ्यात सारे संपते
कुणी तरी करा
ह्या मोसमाची विचारपूस
आता कधी येईल पाऊस
*ति...*
..
.......जेव्हा माझा निरोप घेते ती संध्याकाळी ....
.....ओठाने म्हणते .मला ती .."बाय ..बाय '...!!
....माझ्या मात्र काळजात ...
.होत असत ....हाय ..!!.....हाय ..!!
.रस्त्याच्या ..त्या ..कडेपर्यंत ..
..मी तिची ऐटबाज "चाल "..निरखत राहतो !
"..आता भेटेल उद्या ती पुन्हा .."...
असे .."नाराज " मनाला समजावत ..रहातो ..!!
..फिरून .पुन्हा एकदा ..ती "एक नजर "..माझ्यावर टाकते ..
..तिला माहित असते ..कि "माझी नजर '..तिलाच पहात असते ..!!
..वळणावर ..वळताना ..मात्र ..ती "एक मोहक "..हास्याचा तुकडा ..