Submitted by चाऊ on 19 July, 2012 - 11:15
हवामान खात्याची संकेतस्थळं
धुंडाळतोय माझा माऊस
आता कधी येईल पाऊस
उकाडा, जीव घामेजलेला
घन सावळा, न बरसलेला
आषाढा, कोरडा नको जाऊस
आता कधी येईल पाऊस
ज्वर वसुंधरेचा वाढला
प्रगती (?) चा उत्पात सगळा
मानवा अंत नको पाहूस
आता कधी येईल पाऊस
अधिकारानं सांगतात, होईल
कमी-अधीक बरसात, कुठे कुठे
वाट पहा! घाबरुन नको जाऊस!
आता कधी येईल पाऊस
सही केली, हजेरी पुरती
तशी सर, सरसरते
थोडा चिखल थोडा अंधार
एवढ्यात सारे संपते
कुणी तरी करा
ह्या मोसमाची विचारपूस
आता कधी येईल पाऊस
गुलमोहर:
शेअर करा
खर आहे आता तर श्रावण पण
खर आहे आता तर श्रावण पण सूरू झाला
अरबी समुद्रात कमी दाबाचा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे,लवकरच पाउस पडेल.
कुडमुड्या जोतीषी.(हवामान खाते नव्हे)
""अरबी समुद्रात कमी दाबाचा
""अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे,लवकरच पाउस पडेल.
कुडमुड्या जोतीषी.(हवामान खाते नव्हे)""
तसच होवो!
धन्यवाद,