संभ्रम

Submitted by gajanan moreshw... on 21 July, 2012 - 13:44

ती तूंच होतीस क ?
आताही तूंच का
आहेस ती?
इतकी जवळ होतीस
इतकी जवळ होतीस की
पोटातील गुपित सुद्धा
प्रथम ओठात यायाचे
ते माझ्या कानाशी
इतकी जवळ होतीस
इतकी जवळ होतीस की
मोजायला अंतरच
उरायच नाही
मात्र आता का असतेस
दूर ..... दूर ....
मी जवळ आलो तरी सुद्धा
खरंच काही कळत नाही
ती -तू
का ही - तू

गुलमोहर: