(नुकत्याच झालेल्या आषाढ अमावस्येला ("गटारी" ला) लाखो मुक्या प्राण्यांच्या हत्येच्या बातम्या वर्तमानपत्रातून चवीने छापून आल्या होत्या. त्या वेळी त्या हकनाक मरणार्या प्राण्यांविषयी माझ्या मनात आलेले हे विचार)
का मारता आम्हाला ?
का असं करता ?
जिव घेऊन आमचा
का तुम्ही पोट भरता ?
का एका कोंबडीच्या नशिबी
असं मरण येतं ?
जिवंतपणी लोकांसाठी
तिला कापलं जातं
पिल्लालाही तिच्या तुम्ही
लांब का करता ?
अंड्यातून जिव बाहेर येण्याआधीच
त्याला ठार मारता
काय वाटतं तिला
पोटचं पोर असं जातं
आई आणि बाळाचं कुणी
तोडतं का असं नातं ?
'गटारी' जवळ आली की
बकरी सुध्दा घाबरते
कधीही मरण येईल आपल्याला
अशी भिती तिला वाटते
आम्हा मुक्या प्राण्यांना मारताना
किती तुम्हाला मजा येते
आमचा सुद्धा विचार करा ना
किती तळमळ आमची होते
थांबवा आता हे सगळं
आम्हालाही जगू द्या
मोकळं करा आम्हाला
स्वस्थपणे मरू द्या
- मृण्मयी शैलेंद्र
प्राण्यांवर दया चांगली
प्राण्यांवर दया चांगली गोष्ट,आपले विचार चांगले,काही सुधारणा केल्यास ऊत्तम.
का एका कोंबडीच्या नशिबी
असं मरण येतं ?
जिवंतपणी लोकांसाठी
तिला कापलं जातं>>>आम्हाला कापलं जातं
पिल्लालाही तिच्या तुम्ही>>>>पिल्लालाही आमच्या तुम्ही
लांब का करता ?
अंड्यातून जिव बाहेर येण्याआधीच>>अंड्यातून बाहेर येण्याआधीच
त्याला ठार मारता.
काय वाटतं तिला>>काय वाटतं असेल आम्हाला.
पोटचं पोर असं जातं
आई आणि बाळाचं कुणी
तोडतं का असं नातं ?