Submitted by सुधाकर.. on 11 July, 2012 - 11:34
मन
---
अव्याहत वाहणारा काळ
असतो बंदिस्त इथे.
इथेच होतात स्फ़ोट,
भ्रम आणि विभ्रमांचे
उध्वस्त होतात स्वप्नातली गावं इथे.
गाडली जातात अगाध,
सुख दु:खाची पर्वं
याच स्मृतींच्या सांद्र दरीत.
इथेच उठतात पिशाच्च होऊन
मेलेले दिवस, काळोखाच्या खाईत
आणि आयुष्याशी पुन्हा
खेळु लागतात डाव.
गिळू पहातात सत्व सारं
मनाला मनाचाच लागत नाही ठाव.
.... ऑर्फ़िअस (११-जुलै-२०१२)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा