सगळी कामं आटोपून नेहा निवांत सोफ्यावर बसली. मनात विचार येत होते की आता आपले इथले मोजकेच दिवस राहिले. तब्बल सहा वर्ष राहिलो आपण इथे. स्वतःच्या स्वभावाच्या आणि प्रकृतीच्या अगदी विरुद्ध अशा गृहिणीच्या भूमिकेत. पण तस छानच निभावलं नाही आपण.
नाही म्हणलं तरी पहिलं वर्ष जरा जडच गेलं. काय करायचं घरी बसून. घरातली कामं करून करून करणार तरी किती? स्वभाव तर असायला हवा ना तसा. आजूबाजूच्या जवळजवळ सर्वच बायका गृहिणी. काय करत असतील या दिवसभर नेहाला प्रश्न् च पडे.
हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आहे,त्यातून स्फूर्ती घेऊन किंवा ज्याला स्वैर अनुवाद पण म्हणता येईल अशी एक कविता :
मनाच्या आभाळात आठवणींचे पक्षी उडायला लागतात
तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ......
भूत काळात जातो तेंव्हा काही मैत्रिणी अन मित्रांबरोबर
बरोबर व्यतीतीत केलेल्या काळाच्या रेशमी गुंड्या लहरत उघडतात..
आता काय माहित कुठे ,मस्त मजेत असतीलच सगळे जण
मी रात्री जागतो कधी ,तेंव्हा काही मित्र मैत्रिणी आठवतात ........
काही गोष्टी होत्या फुलांसारख्या कोमल
तर काही होत्या केशराच्या गंधासारख्या ...
एकटाच फिरतो रस्त्यांच्या मोठ्या वळणावर...
मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी
मिटलेपणात ही
ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते
उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू नको
मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही
ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात
विक्रांत