कथा

चष्मा !

Submitted by कवठीचाफा on 30 September, 2008 - 12:38

आता हे सुध्दा तुम्ही चष्म्यासकट वाचत असाल तर माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे आहेत. गेले कित्येक दिवस या चष्म्याने मला नकोसे करुन टाकलेय. रात्री एकतर झोपच लागत नाही नाहीतर स्वप्नात चष्मा येउन मला जाग येते.

गुलमोहर: 

धक्का

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 September, 2008 - 06:09

तिला पाहताच मला तो दिवस आठवला.

भार्गवच्या क्युबीकलमध्ये मी शिरलो तेव्हा दिवाकर तिथेच बसले होते.
"इकडे कसे काय ?" मी आश्चर्याने विचारलं.
"सहजच." दिवाकर हसून बोलले.

गुलमोहर: 

नातं

Submitted by कौतुक शिरोडकर on 29 September, 2008 - 07:09

पार्लेश्वर नेहमीप्रमाणे आजही गजबजलेलं होतं. त्यातल्या त्यात मंगळवारी सायंकाळी सातची वेळ म्हणजे निव्वळ लगबगीची वेळ. ही गर्दी पार्लेकरांनाच काय, कोणत्याही जाणकार मुंबईकराला नवीन नाही.

गुलमोहर: 

`त्या'ची कथा !

Submitted by कवठीचाफा on 27 September, 2008 - 11:27

गेल्या आठवड्याभराच्या बातम्या पहाताना अचानक ही कल्पना डोक्यात गरगरली आणि म्हणुन टाईपली काही टेक्नीकल चुका असल्या तर समजुन घ्या !
*******************************************************

गुलमोहर: 

शक्य ..अशक्य

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 September, 2008 - 03:43

बर्‍याच दिवसांनी आज चालायची लहर आली म्हणून चालत निघालो. रमत गमत चौकात पोहचलो. तेवढ्यात बसस्टॉपच्या मागे जुन्या-पूराण्या पुस्तकांचा पसारा मांडून बसलेल्या काळ्या कभिन्न माणसाकडे नजर गेली.

गुलमोहर: 

चुक

Submitted by कौतुक शिरोडकर on 25 September, 2008 - 06:36

काल काळ भेटला.
मी म्हटलं,"काय रे इथे कसा ?''
"सहज" तो बोलला.
"आलासच आहेस तर सांग, माझ्या मरणाला कारणीभूत काय होईल ?" मी थोडा शहाणपणा केला.
"हार्ट अटॅक" तो शांतपणे बोलला.
"माझं हार्ट एकदम ओ.के. आहे" मी ठामपणे बोललो. तो हसलो.

गुलमोहर: 

माई

Submitted by पल्लवी on 20 September, 2008 - 02:53

नेहमी माईंना रघुरामाच्या मंदिरात आल्यावर फार निवांत आणि प्रसन्न वाटत असे. मंदिरातली ती धीरगंभीर शांतता नेहमी त्यांना उल्हासित करत असे. घंटेचा निनाद गाभार्‍याबरोबर रोमारोमातही भरुन राही आणि नंतर कित्येक वेळ त्याचा प्रतिध्वनी त्यांच्या अंतरात प्रतीत होई. पण आज काहीतरी बिनसले होते. आज त्या उद्विग्न होत्या. कित्येक वर्ष झाली माई नित्यनियमाने मंदिरात येताहेत. काळ्याचे पांढरे झाले पण नेम कधीही चुकला नाही. पण आजच्याप्रमाणे त्या कधीही आपल्या श्रीरामाकडे तक्रार करायला आल्या नव्हत्या.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा