प्रेम वेडं असतं
ह्या कथेचे शिर्षक किती वेळा घासलेलं, सारखं ऐकलेलं वाटतंय ना? पण ह्या तीन शब्दांचा प्रत्यय नेहमीच होत असतो आपल्याला. आता मला आलेला प्रत्यय म्हणजे माझ्या एका मित्राबरोबर घडलेली ही कथा .........
**********************************
ह्या कथेचे शिर्षक किती वेळा घासलेलं, सारखं ऐकलेलं वाटतंय ना? पण ह्या तीन शब्दांचा प्रत्यय नेहमीच होत असतो आपल्याला. आता मला आलेला प्रत्यय म्हणजे माझ्या एका मित्राबरोबर घडलेली ही कथा .........
**********************************
मी कुणी लेखक नाही किंवा समिक्षक नाही त्यामुळे ही कदाचीत कथा सुध्दा नाही पण माझ्या मित्रत्वाच्या प्रतिक्रीयेनंतर चाफ्फ्याचे लिखाण बंद झालेय असे वाटते आहे.
तिची बस आली. बस नं. २९९. खूप दिवस पावसानं ओढ दिल्यानंतर आज पुन्हा अंधारून आलं होतं. ती स्टॉपवर असतानाच पावसाची रिमझिम चालू झाली होती. आज तिचं नशीब जोरावर होतं, बसायला जागा मिळाली.
कालही रात्री मी दचकुन जागा झालो, गेल्या आठवड्याभरातला हा तिसरा अनुभव. स्वतःच असं निष्प्राण पडलेलं शरीर पहाताना कुणाची झोप उडणार नाही?
कथा - ग्रुप ३
आपला ग्रूप आठवतो का? विशू, अनू, दिप्या, गुरू, दिल्या आणि शिवाय दिल्याची मैत्रेयी आणि गुरूची विनी?
(ती गोष्टं वाचावी लागेल ह्यातले संदर्भ लागायला)
ग्रूप १ - http://www.maayboli.com/node/2023
झाडांना पाणी घालताना नीताला कोपर्यावर विशाखासारखी कोणीतरी मुलगी दिसली तशी ती हातातलं काम थांबवून बारकाईने पाहायला लागली. हल्ली एक बरं झालं होतं, समोरची सोसायटी पाडली होती त्यामुळे पार कोपर्यावरच्या सिग्नलपर्यंतचा रस्ता थेट दृष्टीक्षेपात येत होता. ती विशाखाच आहे ह्याची खात्री पटल्यावर नीता लगेचच किचनकडे वळली. सकाळी तशीच काही न खाता घाईघाईत निघाली असेल विशाखा आणि इथे आल्यावर भूक, भूक करेल... खरं म्हणजे पोळी भाजी तयार आहे पण विशाखाचे नखरेच भारी...
शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये.
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी ‘समाधानाची चव’ चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे.
टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं हं घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षीत घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतीक्रीया होती.