कथा

अंकूर.....

Submitted by kalpana_053 on 30 April, 2008 - 18:19

.....तशीच तिची पावलं चटचटा पुढं पडत होती. गुळ्गुळीत असणारी डांबरी सडक देखील जणू तिला पायाखाली जड तसेच रुतणार्‍या कढत वाळूसारखी भासत होती. हा रस्ता केंव्हा संपतोय असं तिला झालं होतं.

गुलमोहर: 

पुरनाची पोळी

Submitted by दिनेश. on 30 April, 2008 - 06:51

अमुश्या पोर्निमा जवळ या लागली कि कमळीचा जीवला निस्ता घोर लागुन र्‍हाई. आता कमळी म्हंजी कुनी येरीगबाळी न्हवं. शाण्णव कुळीची ल्येक अन पैलवानगड्याची बाईल. येळला वागाच्या नाकात वेसण बांदील अन शेरडं न्यावीत तशी वडुन नील.

गुलमोहर: 

भाटमळ वाडी- भाग ३ ( आठवणी आणि मंदिराचा जीर्णोद्धार)

Submitted by शब्दमेघ on 10 April, 2008 - 14:38

माझा वाडा .. आता भग्नावस्थेत पडलेल्या शिला पाहिल्या तरी मनातल्या स्मृती जाग्या होतात, मन हळूच मागच्या काळात जातं अन या निर्जीव वस्तूंनाही पुन्हा मनामध्ये संजीवनी मिळते.

गुलमोहर: 

आठवणींचा प्राजक्त

Submitted by मंजूडी on 10 April, 2008 - 08:30

शुक्रवारी ऑफिसमधून परस्पर इकडेच ये म्हणजे मग जोडून तीन चार दिवस तुला राहता येईल असा आईचा फोन आला तेव्हा कल्याणीचा नाईलाज झाला. शनिवार रविवार मध्ये अनिकेतच्या लग्नाची खरेदी करायची होती.

गुलमोहर: 

भाटमळ वाडी -भाग १ आणि भाग २

Submitted by शब्दमेघ on 2 April, 2008 - 05:08

भाटमळ वाडी -भाग १ ....

गाडी ने करकचून ब्रेक दाबला.. अन मी भानावर आले, गेले २ तास कसे गेले कळाले ही नाही लअगबगीने एस.टी बाहेर पडले .. अगदी चीटपाखरू पण दिसत नव्हते बाजूला.

गुलमोहर: 

एक होता कावळा

Submitted by सुरेश पाटील on 1 April, 2008 - 15:38

एक कावळा झाडाच्या शेंड्यावर शांत बसुन राहिला होता.
तिथे एक ससा आला, तो कावळ्याला म्हणाला- कावळेभाऊ मी पण तुमच्यासारखे शांत बसाव म्हणतो. कावळा म्हणतो बसकी.
ससा झाडाखालि शांत बसतो.

गुलमोहर: 

कॅमेरा !

Submitted by कवठीचाफा on 1 April, 2008 - 13:48

माझ्या भरगच्च संग्रालयाकडे पहाताना मला माझाच अभिमान वाटला. एक छंद म्हणुन चालु केलेल्या माझ्या संग्रहाने एक विराट रुप घेतले होते. पोष्टाची तिकीटं आणि नाणी जमवणारे कैक जण सापडतात, पैशाला पासरी.

गुलमोहर: 

पोटचा - भाग ३ (अंतिम)

Submitted by दाद on 31 March, 2008 - 23:25

भाग १ - http://www.maayboli.com/node/1558
भाग २ - http://www.maayboli.com/node/1566

........
आणि दरवाज्यात एक सुद्दृढ सावली पडली.... ओळखीची अधीर पावलं अन ’छोटी आई’ अशी त्याच्या अंतर्मनालाही साद घालणारी हाक ऐकू येऊनसुद्धा त्यांनी मान उचलली नाही. उलट असहाय्यपणे एकाबाजूला मान टाकून त्या, तोंडात चादरीचा बोळा घेऊन स्फुंदू लागल्या.

.... देवा, याक्षणी उचल, ह्यातून सोडव... ही विटंबना नको.... संजूबाबाने ह्यातलं काहीही करायला नकोय मला.... छे छे... विपरित आहे... अगदी लाजिरवाणं... नको नको....

..........
खोलीत आल्या आल्या संजयने प्रकार ओळखला.... तसाच धावत तो नर्मदाबाईंच्या बिछान्याशी गेला.

गुलमोहर: 

पोटचा - भाग २

Submitted by दाद on 31 March, 2008 - 00:49

नर्मदाबाईनी तितक्यात बाहेर चौकातून स्टेशनाकडे निघालेल्या वाड्याच्या धमणीचा आवाज ऐकला.

... संजूबाबाला आणायला गेली असेल धमणी स्टेशनाकडे.....

नर्मदाबाईना जुन्या नको असलेल्या आठवणींची उबळ आली.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा