माझ्या पहिल्या कथेला आपण दिलेला प्रतिसाद पाहून आणखी कथा लिहायला हुरुप आला. कशी वाटते ते नक्की कळवा.
सुचनांचे स्वागत आहे.
************************
धडा
************************
"काय वं.. कामावर जायच नाही का...पार नउ वाजून गेले तरी लोळत पडलाय?"
संभाने विडीचा शेवटचा कश मारला आणि उद्विग्न मन:स्थितीत विडी चुरगाळून फेकून दिली. काय करावे त्याला अगदी सुचेनासे झाले. आकाशात ढग दाटून आले होते. मुसळधार पावसाची चिन्हे दिसत होती.
मायबोली वर ही माझी पहीलीच कथा. वाचा आणि काय वाटलं ते जरुर कळवा.
*****************************************************
१.
नमस्कार मंडळी,
मायबोलीवर प्रथमच लिखाण टाकत आहे. आणि कथा लिहिण्याचा ही हा पहिलाच प्रयत्न. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. सुचनांचे स्वागत आहे.
**********************
झाले मोकळे आकाश
**********************
खिडकीत डोकावणारा लाल उठावदार गुलमोहोर किती बहराला आलाय!
गेल्या चार दिवसात हे तिसर्यांदा घडत होतं... गॅसवरून दूध ऊतू जातंय, ऋजुता जवळच उभी कुठेतरी तंद्री लावून आणि डोळे अगदी काठोकाठ भरलेले... काय बिनसलं होतं तिचं कोण जाणे. चहा पितानाही अशीच कप हातात घेऊन कुठेतरी हरवल्यासारखी बसली होती.
त्या आधीच्या ग्रूप कथेचा शेवट मी सुखांत केला... तसा अजून एक शेवट केला... वास्तवाला जास्तं जवळचा. पण इथ पोस्टताना, पहिलाच पोस्टला... मला आवडतो असा... सुखांन्त.
’मी एकदाच काय, पण हज्जारदा परत परत हेच करेन... तुझं ज्यात कल्याण आहे असं माझ्या सत्सदविवेक बुद्धीला वाटतं ना, तेच मी करेन... तुझी मैत्रिण म्हणून माझं तेच कर्तव्य आहे... लहान मुलासारखा हट्टं करतोयस. म्हणे बोलू नकोस माझ्याशी....
'हॅलो...हॅलो....प्लीज...!'
'हॅलो, कोण बोलतंय्...लाईन स्पष्ट नाहीये. मोठ्यान बोला....'
'हॅलो, समीर्...राजा मी बोलतेय रे. ऐक ना जरा....देवा....'
'हॅलो, कोणीच बोलत नाहीये...कोण आहे?'
मिरजगावकर म्हणुन मला पहिली ते चवथीत एक छान बाई होत्या. मोनालिसासारखं त्यांच्या चेहर्यावर गूढ हास्य असायचं...कानात सोन्याच्या मोठ्या रिंगा आणि कपाळावर मोठ्ठी टीकली. काय गोड दिसत त्या...माझ्यावर त्यांचा खुप जीव होता.