"उद्याला संजूबाबा येईल..... उद्या कुठचा... आजच येतोय. त्याच्या हाती सोपवलं सगळं की सुटल्ये.... कसा संभाळला हा डोलारा आपण....", नर्मदाबाईंनी पडल्या जागेवरून नजर जाईल तितकं घर बघून घेतलं. जवळ जवळ महिन्यानंतर बघत होत्या आपलं घर. त्यांचा ल्युकेमिया कुणाला कळलाच नाही. एव्हढ्या थोरल्या वाड्यात, एकट्याच रहात होत्या. घरचं कुणीच नही, दारचीच जास्तं. आजूबाजूला माणसं होती खूप... पण नाही लक्षात आलं कुणाच्या. एकदिवस कोसळल्या.... शुद्ध आली तेव्हा कमरेखालचं लुळं पडलेलं शरीर बघून असहाय्यपणे रडल्या... असं अजून काही आठवडेच जगतिल हे कळल्यावर मात्रं समाधान वाटलं त्यांना.
ज्ञानदा विद्या मंदिर..... एक नांवाप्रमाणेच ज्ञानाचे दान करणारी शाळा.... शाळेची घंटा झाली..... मुले राष्ट्रगीतासाठी अत्यंत शिस्तीमध्ये लाईन करून उभी राहीली.
सकाळपासून अभ्यास करून अश्विन अगदी कंटाळून गेला होता. बारावीचा फक्त उद्याचा एकच पेपर राहिला होता. पण त्या शेवटच्या गणिताच्या पेपरला बोर्डाने चार दिवस सुट्टी दिली होती.
'आमची(ही) पिकनीक' फ़ारशी वाचनीय झाली ( म्हणजे वाचल्या गेली नसली ) तरी मला मात्र ती लिहीताना आणि वाचताना खुप मजा वाटली कारण ते सगळे प्रसंग अनुभवायचे भाग्य मला मिळालेय ना !
आला दिवस घालवायचा कसा आणि कशासाठी; या रोजच्या रडगाण्यावर इसाबेलला इंटरनेटवर चॅटिंग आणि सर्फींगचा मार्ग सापडला होता.
मुंबईच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आयुष्याला मी आता कुठे सरावत होतो.
ती.
जणू राजकुमारी.
स्वप्नं पाहणारी.
आजपर्यंत तिला कोणत्याच संकटाची कधी झळ लागली नव्ह्ती.
आपल्या बाबांच्या सुरक्षित छायेत जगणारी.
हसरी, सुंदर, जणू फुलपाखरू.
एक दिवस ती तिच्या बाबांपासून दूर जाते.
"आयुष्य हा तद्दन जुगार आहे आणि मी इरी-शिरीने खेळीवर खेळी खेळणारा अस्सल जुगारी आहे;" हे त्याचं ब्रीदवाक्य होतं. वेळोवेळी या वाक्याचा उल्लेख तो मोठ्या अभिमानाने करायचा. खरोखरंच त्याचा जन्म हा एक जुगारंच असावा.
ये... छोटु एक कटींग दे रे.. !!
का? रे.... तुष्या आज ऑफ़िसावरुन लवकर....
आणि इथे कट्ट्यावर आम्हाल कसं काय दर्शन दिलत..
शि-याने कट्ट्यावर बसत विचारलं...
नाही रे हाल्फ़ डे घेतला मुड नव्हता आज....
का रे काय झालं?
आज्जी ऽऽ मीनल आत येतच गोड सुरात बोलली. आज्जी आई नाही का आली अजून कामावरून ? पण मी म्हणते काय गरज आहे ओव्हरटाइम करण्याची जेवढे आहे त्यात सुखी आहोत न आपण.