मी लेलेंना शोधतोय.
त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहातात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकार्यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठतरी राहातात, एव्हढच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजार्याला...
... त्या लेलेंची- आपण त्यांना लेले म्हणू- गोष्ट मला अरूणनं - माझ्या सहकार्यानं - सांगितली, त्याला आता पाचसहा वर्षं उल्टून गेलीत... पण तेव्हापासून ते माझ्या मनात घर करून राहिलेत... मला त्यांना भेटायचंय... सिद्धिविनायकाचा हा शेजारी, मलाही बघायचायचाय...
मी लेलेंना शोधतोय...
मी आणि अरूण- माझा समव्यवसायी- आणि शेजारी- नेहेमीप्रमाणे ट्रेनमधे खिडक्या पकडून समोरासमोर बसलो, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... नेहेमीप्रमाणेच... आज कुणाची प्रेस कॊन्फरन्स, मंत्रालयात कुठे काय, राजकारण कुठे चाललंय, जगात कुठे काय आणि अरूणचा अभ्यासाचा विषय... संरक्षण खातं- त्यावर त्यानं नुकतीच डॉक्टरेट मिळवलेली... मी त्याचा हक्काचा आणि मन लावून ऐकणारा श्रोता... जॊर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते, आणि शवपेट्यांचा वाद देशभर गाजत होता... बोलताबोलता गप्पांचा ओघ `माणुसकी'वर येऊन थांबला, नेमके तेव्हाच आमच्यासमोर एक दीनवाणा भिकारी, पाठीवरचं ओझं सांभाळत उभा होता... त्याच्या पाठीवर एक जर्जर, खंगलेला, म्हातारा अर्धमेल्या डोळ्यांची क्षीण उघडझाप करत केविलवाणेपणानं गाडीतल्या गर्दीकडे पाहात होता. कुणाचाही हात खिशात जावा, असंच द्रुश्य होतं... मी आणि अरूणनंही तेच केलं, आणि गप्पा लेलेंच्यापर्यंत आल्या...
असंच कधीतरी अरूण त्या लेलेंना प्रत्यक्ष भेटलेला... त्यांची कथा त्यानं ज्याच्याकडून ऐकली, त्याला घेऊनच अरूण लेलेंकडे गेलेला.
--------- -------------- -------------
सकाळचे साडेआठ-नऊ वाजलेले... अरूण आणि तो- दोघं सिद्धिविनायकाच्या शेजारच्या इमारतीतल्या एका फ्लटसमोर उभे राहिले, आणि त्यानं अरूणला खूण केली... अरूणनं दरवाज्यावरची बेल वाजवली, तेव्हा त्याचा ताणून धरलेला सगळा अधीरपणा त्या बेलच्या बटणातून आतल्या घरात घुमला होता... दरवाजा उघडण्यासाठी लागलेला मिनिटभराचा वेळदेखील अरूणला सोसवत नव्हता. म्हणजे, मला ते सांगतानाचा अरूणचा सूरच तसा होता... मी तेव्हाची त्याची मानसिकता समजू शकत होतो... अरूण बोलत होता, आणि तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जिवंत होत होता...
- दरवाजा उघडला, तेव्हा, बाहेर जायच्या तयारीत असलेला एक मध्यमवयीन माणूस आत उभा होता... बाहेरच्या दोघाही अनोळखींना पाहून त्यानं नमस्कार केला, आणि कोण, कुठले, वगैरे कोणतीही चौकशी न करता त्यांना आत यायची खूण केली... हातातली पिशवी बाजूच्या टेबलावर ठेवून तेही टेबलजवळ्च्या खुर्चीत बसले, आणि अरूणनं व्हिजिटिग कार्ड त्यांच्यासमोर धरलं...
‘प्रेसवाल्यांशी बोलण्यासारखं माझ्याकडं काही नाही... काही काम असलं, तर सांगा...’ झटकून आणि काहीसं फटकूनच बोलत लांबूनच ते कार्ड त्यांनी पाहिलं, आणि अरुण अवघडला...
`मला तुमच्यावर लिहायचंय'... अडखळत तो म्हणाला, आणि त्या माणसानं- लेलेंनी- टेबलावरची पिशवी उचलून उठत नमस्कार करून पायात चपला अडकवल्या...
`जाऊ दे... नाही लिहित... पण आपण गप्पा तर मारू या'... आगांतुकासारखा त्यांच्या घरात घुसूनही, अरूण त्यांना सोडायला तयार नव्हता...
`ठीक आहे.. पण मला जास्त वेळ नाही’- मनगटावरल्या घड्याळाकडे पाहात ते पुन्हा खुर्चीत बसले.
`नाही, सहज इकडे आलो होतो सिद्धिविनायकाला, तर तुम्हाला भेटावसं वाटलं, आणि न विचारताच आलो'... अरूण त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करत होता. आणि ते -लेले- निर्विकारपणे अरूणकडे पाहत होते.
‘मला समजलं, तुम्ही व्हीआरएस घेतली म्हणून...’ अरूणनं आणखी एक खडा टाकला.
‘हो.. अलीकडेच...’ लेले तुटकपणानं का होईना, बोलले.
`हे बघा, मी काहीही छापणार नाही. फक्त मला ऐकायचंय... तुमचा टर्निंग पॉईंट’... अरूणनं पुन्हा दामटलं.
`नाही हो, कुणी काही छापावं, माझं कौतुक करावं, असं मी काही करत नाही... मी जे करतो, ते माझ्या समाधानासाठी... मला रात्री घरी आल्यावर शांत झोप लागते... बस्स... मी खूप समाधानी आहे'... लेले म्हणाले...
‘पण कधीपासून?'- अरूण म्हणाला, आणि लेलेही जरासे सैलावले.
अरूणशी बोलायला, गप्पा मरायला काही हरकत नाही, असा त्यांना विश्वास वाटला असावा...
‘त्या दिवशी शनिवार होता... बैंक अर्धा दिवस होती, म्हणून मी आणि माझा सहकारी दुपारीच बाहेर पडलो... कोपर्यावरच्या टपरीवर चहा घेताना माझा तो सहकारी मला म्हणाला, लेल्या, येतोस माझ्याबरोबर? वाटेतच जरा हॊस्पिटलमध्ये जाऊन येऊ... आमचे शेजारचे काका, त्यांना अडमिट केलंय.. जरा भेटून येऊ’
`हॉस्पिटलचा वाससुद्धा मला सहन होत नव्हता तेव्हा... पण ‘लगेच निघायचं' असं ठरवून आम्ही ट्क्सीत बसलो, आणि केईएमला पोहोचलो...
त्या वॊर्डात माझा सहकारी काकांशी बोलत होता, तेव्हा मी सहज आजूबाजूला पाहत होतो... सरकारी हॊस्पिटलात मी तोपर्यंत कधी गेलोच नव्हतो’... लेले सांगत होते... ‘बाजूच्याच बेडवर एक काकांसारखाच म्हातारा, एकटाच भिंतीकडे नजर लावून बसला होता... काकांशी बोलणाया माझ्या सहकार्याकडे कौतुकानं पाहात होता... अचानक त्यानं एक लांब सुस्कार सोडला, आणि पुन्हा त्याची नजर छताकडे वळली... मी त्याच्याकडेच पाहात होतो... त्याचे, म्हातारे, खोलगट डोळे पाण्यानं भरलेले मला दिसले... एकदम त्यानं माझ्याकडं बघितलं, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले... मला कसंतरीच वाटत होतं...’
लेले बोलत होते.
‘न राहवून मी त्याच्या जवळ गेलो, आणि नकळत त्याचा बेडवर बसलो... पाण्यानं भरलेले म्हातारे डोळे न पुसता तो माझ्याकडे बघत होता.... अविश्वासाच्या नजरेनं... मी त्याच्या पायांवर थोपटल्यासारखं केलं, आणि तुम्हाला सांगतो, त्याचा बांध फुटला... ’
.... बोलताबोलता लेलेंच्या डोळ्यातही पाणी जमा झालं होतं...
‘त्याच्या मुलानं ते आजारी पडताच इथे आणून अडमिट केलं होतं, आणि मग घरच्या सगळ्यांनीच जणू पाठच फिरवली होती... तेव्हापासून, शेजारच्या बेडवरच्या एखाद्या पेशंटला पाहायला कुणी आलं, प्रेमानं कुणी पेशंटची विचारपूस करताना दिसलं, की त्यांचा भावनावेग अनावर व्हायचा...
‘कधीपासून डॊक्टरांनी औषधं लिहून दिली होती, पण आणायला सांगायलाच कुणी नाही’, तो म्हतारा थरथरत म्हणाला, आणि मी पुढे झालो... माझा सहकारी निघायच्या तयारीत होता.
`तू पुढे हो, मी आलोच, असं सांगून मी प्रिस्क्रिप्शन्चा कागद घेतला, आणि खाली उतरलो... ’
`तुम्हाला सांगतो, खालचं ते द्रुष्य मी केधीच पाहीलं नव्हतं... माणसाची इतकी केविलवाणी अवस्था होते, यावर माझा त्याआधी विश्वासच नव्हता’... लेले म्हणाले.
‘मी औषधं घेतली, आणि वर येउन त्या म्हातार्या पेशंटच्या उशाशी ठेवून कशी घ्यायची ते सांगून तिथून निघालो... पण त्या रात्री मला झोप लागली नाही... ’
‘मधे एक आठवडा गेला, आणि पुन्हा शनिवारी ऒफिसातून सुटल्यावर मी अगदी नकळत तिथे पोहोचलो... मला पाहाताच त्या म्हातार्या रुग्णानं अंथरुणातूनच हात उंचावला, आणि त्याच्या सुरकुतलेल्या चेहेर्यावर हलकंसं हासू उमटलं... तो क्षण माझं आयुष्य बदलणारा होता...’ बोलताबोलता लेलेंच्या नजरेत वेगळीच चमक दिसत होती.
‘त्यांच्याजवळ थोडा वेळ बसून मी निघालो, तेव्हा माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते... असे कितीजण वेगवेगळ्या इस्पितळांमधे असतील, त्यांना मदतीची, मायेची गरज असेल... कदाचीत त्यांच्या मायेची माणसं असतीलही, पण वेळ नसेल... कुणी असाच एकाकीपणे आजारपणाच्या यातना सोसत असेल''
... `आणि मी ठरवलं...’ लेले म्हणाले, ‘ यापुढं शनिवार-रविवारच्या सुट्टीत, जमेल तशी, अशा लोकांना मदत करायची... मग सगळे शनिवार-रविवार वेगवेगळ्या हॉस्पिटलांत चकरा सुरु केल्या... तेव्हा जाणवलं, एकाच हॊस्पिटलात तो एकच म्हातारा नाही... असे अनेक उपेक्षित, दुर्लक्षित रुग्ण मायेचा हात पाठीवरून फिरावा, म्हणून आसुसलेले आहेत.. कुणाला विचारपूस करणारंच कुणी नसतं, तर कुणाचं विचारपूस करायला कुणी फिरकतच नसतं... उपचाराचा खर्च परवडत नाही, म्हणून कुणी नंतर रुग्णाकडे फिरकत नाहीत, तर कुणी घरात ब्याद नको, म्हणून इथे आणून टाकलेला असतो'...
अशा सगळ्यांना भेटण सुरू झालं... कधी कुणाला औषधं आणून दे, कधी कुणाशी गप्पा मार, कुणाशी चेस खेळ, असं करत रविवारचा दिवस पुरेनासा झाला... मग घेतली व्हीआरएस...’
...लेले सहजपणे बोलून गेले, आणि घद्याळाकडे पाहात उठलेदेखील...
--------- -------- ------------
‘तुमचं नाव सांगा ना... भारावल्या अवस्थेत मी लेलेंना म्हणालो, आणि लेलेंनी धारदार डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं...’
...अरूण बोलत होता, तेव्हा आपण लेलेंच्या समोरच उभे आहोत, आणि स्वत: लेलेंना ‘अनुभवतो आहोत, असं मला वाटत होतं...
मी पटकन सावरलो, आणि अरूणकडे बघितलं...
सह्जपणे तो बोलतच होता, तरी त्याचा आवाजही मला भारावल्यासारखा वाटला.
‘हे छापण्यासाठी नाही, हे आपलं आधीच ठरलंय’ लेलेंनी आठवण करून दिली, आणि ते उठलेच.
`मीदेखील जोरजोरात मान हलवून हो म्हटलं, आणि पाठोपाठ उठलो'... अरूण म्हणाला.
‘सिद्धिविनायकाचा शेजारी म्हणा मला हवं तर’... लेलेंनी बाहेर पडतापडता मागे न बघताच सांगितलं, आणि ते झपाझप चालू लागले...
`त्यांचं नाव लेलेच असावं’ अरूण म्हणाला.
`आपण जाऊ या एकदा त्यांच्याकडे'... न राहवून मी अरूणला म्हणालो, आणि त्यानं होकारर्थी मान हलवली....
काही दिवसांनी मी दुसरीकडे रहायला गेलो... माझा आणि अरूणचा सोबतचा प्रवास संपला...
ते लेले मात्र तेव्हापासून मनात घर करून र्हायलेत...
कधी एखाद्या प्रेस कॊन्फरन्सला अरूण भेटला, की मी त्याला आठवण करतो, लेलेंना भेटायची...
तोही हो म्हणतो, पण अजून जमलं नाहीये...
म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो...
--------------------------
सहीच गोदेय
सहीच
गोदेय
खुप
खुप छान..
साधना
सुंदर!
सुंदर!
खुप छान..
खुप छान.. व्हीआरएस नंतर काही लोक असाही विचार करतात हे ऐकुन माहीत होते, पण अशा कारणासाठी व्हीआरएस घेणे......
साधना
साधनाला
साधनाला अनुमोदक.
असा विचार करणे म्हणजे केवळ देवाघरचीच लोकं असायची ही. माझेही नमस्कार ह्या लेल्यांना.
झुलेलाल, शब
झुलेलाल,
शब्दातीत....
आणि हो....लिहीण्याची शैली डिट्टो "वपुं"सारखी !!!
वा खरच छान
वा खरच छान लिहिलयस. लेल्यांना सलाम
असे जर अनेक लेले एकत्र आले तर आपण खूप काही करू शकतो
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
छान!
छान! लेल्यांबद्दल कुतुहल निर्माण केलत...
छान लिहलय,
छान लिहलय, एकदम आवडलं.
लिहीण्याच
लिहीण्याची शैली डिट्टो "वपुं"सारखी !!! सहीच... मी विचारच करत होते ह्या गोष्टी चा की, ही शैली खुप ओळखीची आहे
ते लेले
ते लेले खरे नाहीत बहुदा कारण हे ललित नाही तर कथा आहे. त्यामुळे हे लेले कोणीही असु शकतात, अगदी आपल्यातही एखादा लेले असेल तो सापडावा, यामुळे दरवेळी ललीत लिहीनार्या झुलेलाल यांनी ही कथा लिहीली आहे असे मला वाटते.
झुलेलाल या कथेत वपुंची आठवन केलीत. एकदम सही. विचार करायला लावनारी.
छान लिहीलय
छान लिहीलय झुलेलाल.
केदार ही कथा जरी असली तरी मागे मला लोकप्रभा किंवा सा. सकाळ मध्ये कोणाबद्दल तरी असाच लेख वाचल्याच आठवतय, त्यात ते गृहस्थपण रिटायर झाल्यापासुन रोज नियमीत दवाखान्यात जावुन सगळ्यांना भेट देत, मदत करत. थोडक्यात अश्या प्रकारचे 'लेले' अस्तित्वात आहेत म्हणायचे.
सत्य कि
सत्य कि असत्य यापेक्षा सामजिक गरज आहे ही आणि ती फारच प्रभावी रितीने मान्डली गेलीय या कथेत्!!मस्तच!!
मस्तच
मस्तच झुलेलाल. सत्यघटनेवर आहे का कथा? असो. नुसते लेलेंना भेटण्यापेक्षा स्वःताचे लेले झालेले आवडेल मला.
खुप सुन्दर
खुप सुन्दर आहे! मला माहित आहेत एक काका कि जे रोज पुन्यातल्या खुप hospitals मधे जाउन लोकाना मदत करतात. त्यानि पन व्हि.र.एस. घेतली आहे.& honestly He is a GREAT man. Always SMILING.
फॅन्टॅस्ट
फॅन्टॅस्टिक. व्हीआरएस घेऊन नको तिथे पैसे अन वेळ उडविणार्यांना चपराकच आहे ही.
झुलेलाल,
झुलेलाल, हे नेहमीसारखंच... आतून हलवणारं! तुमचं आवर्जून वाचते. छान लिहिता हे सांगायला नकोच.
खूपच छान !!
खूपच छान !! हेलावुन टाकणारं लिहिलंत!
२६ जुलै
२६ जुलै २००६ च्या लोकमत (मुंबई आवृत्ती) मध्ये संपादकीय पानावर दिनेश गुणे यांचा `प्रासंगिक' सदरात यावर आधारित लेख प्रसिद्ध झाला होता.
जबरद्स्त च
जबरद्स्त च
समतोल
समतोल फाउन्देशन सनपर्क 02224184808 samatolfoundation@yahoo.com
छानच पन
छानच पन असे आनेक जन या समाजात आहेत त्यान्चि ओल् ख ते आशिच लपवुन थेवतात
झुलेलाल,
झुलेलाल, छान लिहिल आहे. निवॄत्ती नंतर आयुष्य रडत कढत घालवायच की समाज उपयोगी किंवा इतर आंनन्ददायी गोष्टि करत याच चांगल ऊदाहरण दिलत कथेत.
सुंदर!!! अनघ
सुंदर!!!
अनघा
झुलेलाल,
झुलेलाल, अशा लोकांची आठवण आपण ठेवलीत आणि ती प्रसिद्ध केलीत म्हणुन आपले आधी आभार!!!!
बाकी कथा एकदम ओघवती आणि टापटिप आहे!!!!!
योगेश
======
खुपच छान
खुपच छान आहे कथा , मनाला स्पर्श करुन गेली.
काय सुरेख
काय सुरेख लिहिलय. मीही अशा २ लेल्याना भेटलीये. फक्त ते सिद्धिविनायक च्या तीथ रहात नाहीत एवढच.:)
छान
छान लिहिलंय... फार फाफटपसारा नाही पण मनाला भिडणारं
~~~
हम 'मत'वाले...
आवडले. हृदयस्पर्शी लिहीलेले
आवडले. हृदयस्पर्शी लिहीलेले आहे.
खूपच छान !! हेलावुन टाकणारं
खूपच छान !! हेलावुन टाकणारं लिहिलंत! >>>> +९९९९९
____/\____
Pages