.
डबल पोस्ट ! डिलिट करा प्लीज.. अॅडमिन साहेब !!! १० शब्द
डबल पोस्ट ! डिलिट करा प्लीज.. अॅडमिन साहेब !!! १० शब्द
काहि महिन्यांपुर्वी आकाशात असे रंग बदलत गेलेले दिसले आणि मुख्य म्हणजे कॅमेरा आणे पर्यंत रंग शिल्लक होते. पण थोड्याच वेळात नाहिसे झाले.
२०१२च्या ऑटम सीझन मध्ये फॉल कलर बघायला कुठे जायच, हा खरच मोठा प्रश्न होता. बराच कीस पाडला यावर कारण
- बरेच पर्याय होते फॉल कलर बघायचे (त्यात मला सगळेच बघावेसे वाटत होते )
- बॉस सुट्टी देतोय का नाही.
- आणि बदलणारं फॉल कॅलेंडर (एक-दोन दिवस मागे- पुढे झाले तर झाडांचे खराटे बघायला मिळणार याची भीती)
रान भाबडे रडु लागले,
देत आठवणींचे हुंदके,
हिरवीगार काया सरली
रुक्ष या समया आगे ..
काळचक्रे फिरली अशी की,
अगतिक झाले पाखरु,
असुनही माता जवळी,
रडू लागले गोंडल वासरु .!
हिरवे पातेही नाही रानी,
हतबल झाला बळीराजा,
दुष्काळ समयी नमले सगळे,
"काय देव आणि काय ख्वाजा?"
जनावरांच्या दिमतीला नाही ,
कोवळा पिवळा चारा,
निसर्गाचे अमानुष तांडव,
आहे आपुलाच दोष सारा .!
रान म्हणाले,"हे दुष्काळा
काय केलीस आमुची थट्टा?"
तो निर्दयी म्हणतो असा की,
"खेळा 'जीवन' मरणाचा सट्टा...!"
गेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला! आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो! सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला.
करवंदी आकाशाला
तुझ्या तेजाचा पहिला किरण स्पर्शतो,
तो पाहण्यासाठी सारी रात्र मी जागीच असते !
जणू त्या स्पर्शाने स्वतःच उजळून जाण्यासाठी......
ते तेज बोटांवर माखून
वाटतं तुझं हे रूप
आपल्या चित्रात,
आपल्या शब्दात
तेजाळून जावं !
.........रंग संपतात
शाई संपत संपत सुकून जाते
कागद समोर पसरलेले
मातकट .......
पुन्हा फाडते त्यांना
पुन्हा जागते सारी रात्र
पुन्हा करवंदी आकाशाला
तुझ्या तेजाचा पहिला किरण स्पर्शतो !!!
दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397
एक व्हॅम्पायर मारला बघा मी.
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.
गेल्या ४-५ वर्षांपासून माथेरान डोंगररांगेत असलेल्या चंदेरी माथ्याचा ट्रेक मला करायचा होता. बर्याच जणांना मी विचारलंही होतं, पण सगळे चंदेरीच्या खालच्या गुहेपर्यंत जाऊन येणार म्हटल्यावर माझी नकारघंटाच वाजत असे. नियमितपणे ट्रेक्स करणार्यांकडूनदेखील दुर्लक्षित असलेल्या या चंदेरीच्या प्रेमात पडण्याचं कारण म्हणजे कुठेतरी चंदेरीच्या वाटेचं वाचलेलं वर्णन.. गांवापासून ते गुहेपर्यंत कुठेही पाणी नाही. वर गुहेजवळील टाक्याचे पाणीही घाणेरडे, त्यामुळे पाण्याचं रेशनिंग करणार्यांनाच हा अंगावर घेणार!..