संसार

!!संसार!!

Submitted by चंद्रमा on 14 July, 2020 - 17:45

"कधी-कधी तुझ्याकडे बघून,
जागविली खूप सारी स्वप्नं!
असेल छानसं घरकुल आपलं;
अन् खळाळलेल्या चेहऱ्यावर तुझं हसणं!!

या छानश्या गोजिरवाण्या घरात,
असेल प्रेम हे आराध्यदैवत!
सुख नांदेल चहूबांजूंनी;
जर मिळाली तुझी सोबत!!

आले जरी दुःख वाटेमध्ये,
करावा लागला संकटाचा सामना!
यश पडेल मार्गामध्ये;
करुन भगवंताची कामना!!

करावी लागली जरी,
चाकरी नोकरी!
छोटं-मोठं काम हाताशी घेत;
मिळविल मी सुखाची भाकरी!!

रेशीमगाठी

Submitted by एविता on 27 June, 2020 - 12:23

रेशम कि डोरी।

मी आता आई होणार हे कळलं तेंव्हा काही काळानंतर मी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि मग घरी राहू लागले. ऋषिन मात्र ऑफिस मधून दर दीड दोन तासांनी फोन करायचा आणि मी कशी आहे याची विचारपूस करायचा. मी आणि ऋषीन एकाच ठिकाणी एकाच प्रोजेक्ट वरती काम करायचो. कधी तरी त्याला काही अडलं तर मला विचारायचा. तो भावनिक होता आणि समजूतदार ही होता. एकदा असंच त्यानं मला काहीतरी विचारलं आणि मी चिडले आणि फोन आपटला. माझ्या आताच्या स्थितीत मी जरा जास्तच चिडचिड करत होते.

शब्दखुणा: 

एक तरी ओळ

Submitted by सदा_भाऊ on 1 May, 2019 - 17:20

एक तरी ओळ आज तू गावीस
त्यात माझी आठवण दिसावी
फिरूनी तुझी कळी खुलावी
अधिक मागणी ती काय असावी

वैताग चिडचिड मुळी नसावी
गोड सुरांसह घडी बसावी
बेसूरी तरी माझी साथ असावी
अशीच जोडी शोभून दिसावी

तुझ्या विना जीव वेडा असे गं
नको दूर जाऊ वेड लागे गं
जीवन मरण तुझ्याच सवे गं
हात हातात असाच राहू दे गं

दोन आपुल्या लेकराना
बळ आपले मिळू दे
उंच भरारी घेताना
स्मरण आपुले रादू दे

तुझ्या माझ्या संसाराला
नजर कोणाची लागू नये
माझ्या प्रत्येक कर्तव्याला
साथ तुझी लाभू दे

शब्दखुणा: 

'संसार'

Submitted by जोतिराम on 2 August, 2018 - 12:42

आघात आज आला, आधार आज आला
प्रेमात ना कधीही, हा भार आज आला

मी शोधले शब्दात अन वेळीच ना मिळाले
बंधात बांधलेला मग सार आज आला

गहिरे मनात होते जे सांगून ना कळाले
भरदाव भावनांचा सैवार आज आला

येतो अजूनही तो मंजुळ नाद कानी
बेभान अंतराचा व्यवहार आज आला

तू बोलून टाक सारे, माफी नकोस मागू
मागेच माफ झाले, दरबार आज आला

बांधून पाहिली मी प्रत्येक गाठ येथे
तुटले कधीच सारे, संसार आज आला.

- जोतिराम

गरिबी एक शाप

Submitted by विजय मयु on 19 November, 2013 - 23:08

पारू आणि शंकर यांचा संसार म्हणजे गावाच्या वेशीवर छोटीशी झोपडी, त्यामध्ये गरजेपुरते थोडीशी भांडीकुंडी. भातुकलीच्या खेळातील संसारापेक्षाही छोटाशा संसार. शंकर गावच्या पाटलाच्या शेतावर दरसाल १५ हजार रुपयांवर सालगडी म्हणून कामाला. पारू गावातील इतर बायकांबरोबर शेतमजुरीला जाऊन घराला थोडाफार हातभार लावत होती. नऊ-दहा वर्ष उपवास- तापास नवस केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर कृष्णा हे नाजूक उमलेले फुल.

शब्दखुणा: 

नवरा नाही काही कामाचा

Submitted by भरत कुलकर्णी on 9 June, 2012 - 20:36

माझा नवरा नाही काही कामाचा
माझा नवरा आहे बिनकामाचा

सकाळी सकाळी पिवून येतो
संध्याकाळी झोकून घेतो
बिनघोर पडतो रात्रीचा

दारू प्यायला मागतो पैसे
पैसे मी आणावे कुठून कसे
त्यासाठी कायम करतो घोशा

फाटक्या संसारात पडला पाय
तुम्हीच सांगा मी करावं काय
त्याला पायपोस लागेना कशाचा

दुसर्‍या बायांकडे बघते जेव्हा
आनंद होतो मनात तेव्हा
संसार तसा होवो माझा सुखाचा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आस

Submitted by चाऊ on 4 February, 2011 - 09:13

मन आलेलं भरुन
अन रितेची हात
जसं उभं एक रोप
जणू उन्हा-पावसात

किती गेले दिस वर्ष
पाय उगाच चालत
नाही दिशा नाही वाट
काही आस नाही आत

आता अडखळे श्वास
आणी गिळवेना घास
सावळसंध्या डोळ्यामधी
दिसे अथांग ती रात

काय केले कुणासाठी
काय गेले की राहुन
सारं आयुष्य जगलो
पाणी जावं जणू वाहून

कधी वाटलं थांबावं
फुला-मुलांत रमावं
सख्या-सोयर्‍यांच्या संग
आपणही हसावं

पण संसाराचा भार
सदा उद्याचा विचार
सय पायांना चालीची
पुढे जाण्याचा आधार

गुलमोहर: 
Subscribe to RSS - संसार