नवरा नाही काही कामाचा

Submitted by भरत कुलकर्णी on 9 June, 2012 - 20:36

माझा नवरा नाही काही कामाचा
माझा नवरा आहे बिनकामाचा

सकाळी सकाळी पिवून येतो
संध्याकाळी झोकून घेतो
बिनघोर पडतो रात्रीचा

दारू प्यायला मागतो पैसे
पैसे मी आणावे कुठून कसे
त्यासाठी कायम करतो घोशा

फाटक्या संसारात पडला पाय
तुम्हीच सांगा मी करावं काय
त्याला पायपोस लागेना कशाचा

दुसर्‍या बायांकडे बघते जेव्हा
आनंद होतो मनात तेव्हा
संसार तसा होवो माझा सुखाचा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दुसर्‍या बायांकडे बघतो मेला
चपला खाऊन थोबडा सुजला
संसाराचा विचका झाला
देवा ऊठव लवकर याला.