Submitted by सदा_भाऊ on 1 May, 2019 - 17:20
एक तरी ओळ आज तू गावीस
त्यात माझी आठवण दिसावी
फिरूनी तुझी कळी खुलावी
अधिक मागणी ती काय असावी
वैताग चिडचिड मुळी नसावी
गोड सुरांसह घडी बसावी
बेसूरी तरी माझी साथ असावी
अशीच जोडी शोभून दिसावी
तुझ्या विना जीव वेडा असे गं
नको दूर जाऊ वेड लागे गं
जीवन मरण तुझ्याच सवे गं
हात हातात असाच राहू दे गं
दोन आपुल्या लेकराना
बळ आपले मिळू दे
उंच भरारी घेताना
स्मरण आपुले रादू दे
तुझ्या माझ्या संसाराला
नजर कोणाची लागू नये
माझ्या प्रत्येक कर्तव्याला
साथ तुझी लाभू दे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरेख. जमलीय..छान
सुरेख. जमलीय..छान
चांगली कविता म्हणणार नाही.
चांगली कविता म्हणणार नाही. कारण तुम्ही तिकडं भुजबळांच्या स्वेटरचं बऱ्याच जणांनी मनाला लावून घेतलंय असे म्हणाला होतात.
वाह मस्तच
वाह मस्तच
सुंदर
सुंदर
धन्यवाद मंडळी _/\_
धन्यवाद मंडळी _/\_
@शक्ती... आपल्या शक्ती प्रदर्शना बद्दल धन्यवाद
प्रतिसाद देणारे देवो भव असतात
प्रतिसाद देणारे देवो भव असतात, त्यांना हिणवू नये. चांगला प्रतिसाद म्हणायचे आहे मला.
_/\_
_/\_