माफी
माफीच घेत आहे
प्रेम हवे असणाऱ्या एकाला कालपर्यंत प्रेम मिळत नाही, त्यात त्याचे प्रयत्न त्यालाच अगदी चुकीचे वाटू लागतात, आणि आजपासून तो ठरवतो की त्या प्रेमाची वाट तो आयुष्यभर बघेल.
काल
त्या डोळ्यात मी स्वतःला
पाहून घेत होतो
तो गंधित श्वास जवळी
राहून घेत होतो
चुकुनी पुन्हा पुन्हा मी
समजून घेत होतो
माझेच विश्व सारे मी
मागून घेत होतो
आता
अक्षम्य त्या गुंह्यांची
माफीचं घेत आहे
पूर्णावळीस मागे अन
आधीच घेत आहे
तुकडा अश्या मनाचा
भंगून देत आहे
हा चेहरा खरा खरा मी
रंगून घेत आहे
'संसार'
आघात आज आला, आधार आज आला
प्रेमात ना कधीही, हा भार आज आला
मी शोधले शब्दात अन वेळीच ना मिळाले
बंधात बांधलेला मग सार आज आला
गहिरे मनात होते जे सांगून ना कळाले
भरदाव भावनांचा सैवार आज आला
येतो अजूनही तो मंजुळ नाद कानी
बेभान अंतराचा व्यवहार आज आला
तू बोलून टाक सारे, माफी नकोस मागू
मागेच माफ झाले, दरबार आज आला
बांधून पाहिली मी प्रत्येक गाठ येथे
तुटले कधीच सारे, संसार आज आला.
- जोतिराम