.....चुकिला माफि नाही.
पुर्वी मानव अश्मयुगात होता .स्वतःच्या गरजेनुसार नवीन शोध लावत प्रगती करुन तो जेट युगापर्यंत पोहचला. मध्ययुगात वर्ण व्यवस्था होती. प्रत्येक जण स्वतःच्या मागच्या पिढिकडुन ज्ञान ,कुशलतेच शिक्षण व अनुभव घेऊन आपल्यापासुन समाजाला कसा फायदा व त्यांचे जीवन कसे सुखकारक होईल याचा प्रयत्न असे. त्याकाळात प्रत्येक जण स्वतःच्या घराण्याचे नावलौकिक कसे कायम व आणखी उंचावेल यासाठी त्यांचा कल असायचा. आणि मुख्य म्हणजे कुठले काम उच्च व कुठले हलके अशी कधीच कोणाची भावना नसायची. एखाद्या लोहार नेहमी स्वतः खुशीत असायचा कि त्याने बनविलेला भाला किंवा तलवार राज्याचा मुख्य सेनापती युध्दात जिकुन स्वतः त्याला भेटुन त्या तलवारीत व भाल्यात बदल सुचवायचा व पुन्हा जेव्हा नवीन तलवार किंवा भाला तयार झाल्यावर तालिम करताना त्या लोहाराला आमंत्रित करायचा व त्या शस्त्रांची मनासारखं परिक्षण झाले की त्या लोहाराचा यथोचित सन्मान करायचा. असा हा प्रकार संपुर्ण जगात चालला होता. तेव्हा जगात कुठेही शहरीकरण झाले नव्हते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगात कुठेच आणे, पैसे रुपये ,डाँलर ,पौंड किंवा इतर देशातील चलने हा प्रकारच नव्हता. तेव्हा जी व्यक्ती म्हणजे स्वतः धाडसी व पराक्रमी व समाजाबद्दल प्रेम व लोकांची मने जिकंणाराच राजा व्हायचा. एकदा तो राजा बनला की त्याला कायदे पंडित कायद्याचे शिक्षण, सगळ्या प्रकारचे युध्द शास्त्र शिकावे लागत असे. जर त्याला एखाद्या कलेची आवड असेल तर त्यात त्याला आणखी प्राविण्य कसे मिळेल याचे शिक्षण दिले जायचे. हे सगळे झाल्या वर त्याची त्याला जेवढे शिक्षण दिले त्याची अचानक परिक्षा घेतली जायची. ही परिक्षा पूर्वनियोजित नसायची. ह्या सगळ्या परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याचा राज्याभिषेकाचा दिवस ठरला जायचा. सगळेजण ( जन) गोळा व्हायचे. तो दिवस त्यांच्या साठी उत्सवा सारखा असायचा. सगळे जण आपल्या नवीन राजाच्या नावाची घोषणा करत यायचे. सगळे जण जमल्यावर राज्यातील धर्मगुरू आपल्या राज्याला नवीन राजाची का निवड करावी लागली ते नीट समजावुन सांगायचा व त्या नवीन राजाची सपुर्ण माहीती म्हणजे शरिराचे मोज मापे, त्याचे ज्ञान , त्याचे युध्द कौशल्य याचे वर्णन केले जायचे. हे सर्व झाले की नवीन राजा खरोखरच वर्णन केल्याप्रमाणे आहे की नाही याचे सगळ्या जमलेल्या लोकांना दाखविले जायचे . त्या जमलेल्या लोकांपैकी कुठल्याही स्तरावरील चार पाच व्यक्ती काहिही प्रश्न विचारचे .त्या सगळ्यांना योग्य समाधानकारक उत्तरे दिली की मग त्याची ताकद तपासली जायची. त्याच्या अगावर दहा किंवा भरपुर शस्त्रधारी द्वंद्व करायला सोडायचे तेव्हा हा नवीन राजा बिन हत्यारी त्यांच्या बरोबर लढाई करून जिकायचा. हे सगळे झाल्यावर तो नवीन राजा पुन्हा सर्वांना येऊन दंडवत करुन पुन्हा एकदा जमलेल्या लोकांमध्ये कोणाला माझ्याशी युध्द करायचे का म्हणुन मोठ्या आवाजात आव्हान करायचा. जर कोणीच पुढे आले नाहीतर सगळी कडे मोठे ढोल, ताशे, तुतारी व इतर पारंपारिक वाद्यांच्या आवाजात नवीन राजाचा राज्याभिषेक व्हायचा. सगळी जनता आपल्याला चांगला राजा मिळाला या आनंदात कमीत कमी आठवडाभर तरी उत्सव साजरा करायची.
वर मी सांगितलेली पध्दत क्षत्रिय राजासाठी होती. तसेच इतर वर्णासाठी ईतर परिक्षा असायच्या .उदा. मुदकखान्यात एखाद्या आचारी असायचा त्याला एक खाद्यपदार्थ खायला द्यायचे. खाऊन झाल्यावर त्या एका कागदावर म्हणजे त्या काळात जे काही लिहिण्यास वापरले जायचे त्या पत्रावर त्या खाद्यपदार्थामध्ये कुठले जिन्नस व किती प्रमाण वापरले ते लिहिण्यास सांगायचे. शिल्पकार असेल तर त्याच्यासमोर एखाद्या साधा कुठलातरी दगड आणुन ठेवायचे व तो आपल्या राज्यातील कुठल्या प्रांतांतील आहे ते विचारले जायचे.व त्यानंतर या दगडात तु कसेले शिल्प करणार त्याचे एक चित्र काढुन घ्यायचे व नंतर त्या चित्रानुसार शिल्प तयार करावे लागत असे. विशेष म्हणजे ह्या सगळ्या परिक्षा घेणारे स्वतः त्या कलेत किंवा त्या शास्त्रात परिपूर्ण व निष्ठावंत होते.
तो काळच असा होता की चलन व पैसा प्रकार नसल्यामुळे प्रत्येक जण स्वतःचे कौशल्य किंवा बुध्दी व ज्ञान कसे वाढेल यासाठी सतत प्रयत्नशील असायचा. प्रत्येकावर स्वतःच्या परिवारातच समाजातील सगळ्यांशी कसे मिळुन मिसळून राहायचे याचे उत्तम संस्कार झालेले असायचे. तेव्हा व्यक्ती पुजा, मुर्ती पुजा हा प्रकार नसायचा तेव्हाची एक जीवन शैली ठरलेली असायची त्याचे योग्य पालन केले जायचे. जर कधी राजाला वाटले की जंगलात जाऊन शिकार करायची तर तो स्वतः बरोबर एक प्राणी शास्त्रज्ञ घ्यायचा त्यामुळे एखाद्या प्राण्याचा पाठलाग करताना त्या प्राण्याचा आवाजावरून तो शास्त्रज्ञ अचुक सांगायचा की पळणारी शिकार मादी असुन दोन तिन महिन्याची गाभण आहे. जर हे जर त्याने न सांगता शिकार केल्यावर ती मादी असुन गाभण निघाली तर त्या शास्त्रज्ञाला म्रुत्यु दंडास सामोरे जावे लागत असे.
.....चुकिला माफि नाही.
वि.सु.
आपण सर्वजण मला म्हणाल आपल्याला हे सर्व कुठे कळले व कुठे वाचले ?
एकदा मी कंपनीच्या कामासाठी कोईंबतुरला गेलो होतो .एकटाच होतो.संध्याकाळी काम संपल्यावर मला कंठाळा यायचा म्हणून तिकडे जुनी मंदिरे पहायचो त्यावरील नक्षीकाम पहायचो. तेव्हा माझ्याकडे कँमेरा नव्हता .एकदा एका मंदिरात असाच एकटाच बसलो होतो तेव्हा मला एक व्यक्ती साधूसारखेच भरपुर केस ठेवलेला होता. त्याने माझ्या कडे पाहुन स्मित हास्य केले.मला त्यादिवशीच्या कामामुळे भरपुर थकव्यामुळे त्याचे मला हास्याने बरं वाटले. तो जवळ येऊन बसला.मला विचारले बाहेरगावातुन आलास का? मी त्याला सांगितले की मुंबईहुन लार्सन अँड टुब्रो मधुन ईकडे आम्ही एका साँफ्टवेअर कंपनीला काम दिले त्या प्रोजेक्ट ची अँसिड टेस्ट करायला आलो. तेव्हा मला विचारले की अँसिड टेस्ट म्हणजे काय? तेव्हा मी सांगितले की आम्ही ते डिझाईन साँफ्टवेअर सगळ्या प्रकारे परिक्षण करतो व शेवटी Approved करतो . हे ऐकुन तो आनंदी झाला व त्याने पुर्वी निती, जीवनशैली कशी होती ते मला भरपुर ज्ञान दिले. नंतर मी हाँटेलवर परत जाताना माझ्या कँबने मधेच त्याच्या निवासस्थानी सोडले .तो विभाग एकदम गरीब व बकाल होता. पाठमोरा चालत तो त्या काळोखात नाहिसा झाला.
रत्नाकर दिगंबर येनजी
बांगुर नगर
गोरेगाव
मुबंई