Submitted by जोतिराम on 11 June, 2019 - 17:58
प्रेम हवे असणाऱ्या एकाला कालपर्यंत प्रेम मिळत नाही, त्यात त्याचे प्रयत्न त्यालाच अगदी चुकीचे वाटू लागतात, आणि आजपासून तो ठरवतो की त्या प्रेमाची वाट तो आयुष्यभर बघेल.
काल
त्या डोळ्यात मी स्वतःला
पाहून घेत होतो
तो गंधित श्वास जवळी
राहून घेत होतो
चुकुनी पुन्हा पुन्हा मी
समजून घेत होतो
माझेच विश्व सारे मी
मागून घेत होतो
आता
अक्षम्य त्या गुंह्यांची
माफीचं घेत आहे
पूर्णावळीस मागे अन
आधीच घेत आहे
तुकडा अश्या मनाचा
भंगून देत आहे
हा चेहरा खरा खरा मी
रंगून घेत आहे
पाहीन वाट इतकी की
आयुष्य देत आहे
अन ठेऊन हात खाली
आयुध देत आहे
ना मागेन मी पुन्हा ते
सोडून देत आहे
मी मागेन फक्त माफी
अन माफीच घेत आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खुप आवडली. पु.का.प्र!
खुप आवडली. पु.का.प्र!