रणरणत्या उन्हामुळे कोरडे वाटणारे रस्ते, झाडं, तसं म्हणलं तर सगळी सृष्टीच तापलेल्या तव्यासारखी कोरडी झालेली.काल आभाळ भरून आलेलं. आकाशात काळ्या ढगांची लगबग दिसायला लागली. अगदी चातक वगरे नाही पण बऱ्यापैकी सगळे पावसाची वाट बघायला लागले होते सध्या. आणि तो आलाच. तसं मला फार काही पाऊस वगरे आवडत नाही.
मेघ मेघ बरसू दे
पान पान बहरू दे
मृद्गंध हा आसमंती
श्वास श्वास भरून घे
धुंद धुंद दाही दिशा
भान हरपला वारा
कुंद कुंद हा नजारा
नसानसात भरून घे
ढगाआड लपंडाव
सूर्य पहा खेळतसे
सकाळ की ही सांज
प्रश्न मना हा पडे
धुवाधार येशी कधी
कधी शांत शांत सरी
अनंत ही तुझी रूपे
सारीच मोहवून घे
बीज बीज रुजून ये
कोंब कोंब उमलू दे
पेरीले ते उगवीते
सृजनाचा विश्वास दे
बेधुंद वारा
संतत जलधारा
भिजूनी चिंब
न्याहळी प्रतिबिंब
सुखद हा गारवा
हातात तुझा हात हवा
झुगारून सारी बंधने
उमगती अबोल स्पंदने
झिरपता केसातून ओहोळ
उठवती आठवणींचे मोहोळ
थेंब थेंब अलगद झेलता
विसरवी साऱ्या जगाला
खरच पावसा किती ही तुझी हुकूमत
स्वप्नांनी फुलवी रित्या मनाचा आसमंत
खूप काही अनाउन्समेंट कानावर पडतायत...
त्यात फेरीवाल्यांचे आवाज वेगळेच...
ट्रेनचा डबा तसा फारसा भरला नाहीये पण नजरेला कोणी भावत नाहीये ...खिडकीतून पाऊस दिसतोय .. ofcourse मला विंडो सिट यासाठी तर आवडते ...खूप दिवसांनी गावाला जातेय ..एक्साईटमेंट होती ..पण आता कमी होत चालली आहे कारण ट्रेन अर्धा तास झाला आहे तिथेच आहे ....
स्टेशन फारसं ओळखीचं नाहीये म्हणून खिडकीतून जमेल तेवढा जमेल तसा पाऊस जमा करतेय मग तो ओंजळीतून निसटताना चा असो की डोळ्यात भरून घेतानाचा ....
घडी बघून बघून डोळे थकले होते .. त्याचे काटे पुढे सरकत होते पण माझी ट्रेन नाही...
तेवढ्यात....
"अरे बाहेर आभाळ आलं आहे दाटून, shoes का घालतो आहेस?" मुकेश नी पेपर चाळत विचारलं
"weather अँप वर बघितलं मी , फक्त ३०% चांसेस आहेत पाऊस पडायचे, हे काही आपल्या कडच्या सारखा हवामान खातं नाही , परफेक्ट असतो अंदाज इथला, अमेरिका आहे मित्रा " राहूल नी शु लेस बांधत शेरा मारला.
"आता परत तुझ कंपॅरिसन सुरु करू नकोस , तू काहीही म्हणाला तरी माझा निर्णय पक्का आहे. " मुकेश नी पेपर बाजूला ठेवून सांगितलं.
"जाना परत इंडिया ला , मी नाही अडवत तुला फक्त जाऊन रडू नको काय ही ट्रॅफिक, काय हे पोल्यूशन" राहूल वैतागून म्हणाला.
एक पाऊस खुशमिजास
बिनधास्त बरसणारा
वह्या पुस्तकं पाटी दप्तर
सारं काही भिजवून चिंब
घरी येऊन ओरडा खाऊनही
आरशात हसणारं प्रतिबिंब
एक पाऊस लाजरा बुजरा
हलके हलके रिमझिम रिमझिम
कळेल न कळेलंस गुणगुणणारी
सोबत हिरव्या वार्याची बासरी
मला करून मुग्ध बावरी
बरसत राहिल्या श्रावण सरी
एक पाऊस बेधडक
मुसळधार बेपर्वा
त्याच्या सोबत प्रेमाचे मेघदूत
काळ्या मेघांना चंदेरी किनार
चोरट्या त्या भेटींचा
तो पाऊस साक्षीदार
एक पाऊस भलताच अवेळी
अनाठायी रिपरिप रिपरिप
तर यंदा मी ही पावसावर लिहिलंय. आजच्या लोकमतच्या मंथनमधे ते थोडे काटछाट करून छापूनही आलेय. त्याच ललिताचे अनकट व्हर्जन इथे देते आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कॅलेण्डरमध्ये पावसाचा महिना लागला आणि तुझी वाट बघणे सुरू झाले.
'बदललंय हं चित्र आजूबाजूचं!, थोडा झगझगीतपणा कमी झालाय!, एक ग्रे वॉश चढायला लागलाय सगळ्यावर!' तुझ्या येण्याची वर्दी येऊन पोचली.
आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज थोडी तशी चिडलेलीच होती मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते.
हातात वाफाळलेला चहा आणि डोक्यात धूसर विचार. घरातील खिडकीच्या ऐका कोपऱ्यात उभा राहून चहाचा एक एक घोट घेत पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या त्या चिमुकल्या मुलांना बघत असताना नकळतच त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य रेखाटले. कधी त्या मुलांना तो निरखत होता तर कधी आकाशाकडे बघत होता. जमिनीवर अचानक पडलेल्या गुळाला जश्या मुंग्यांनी घेरा घालावा तसं आकाशात ढगांनी दाटी केली. काही क्षणापूर्वी पांढरं शुभ्र वाटणारा आकाश आता काळकूट दिसू लागलं . खिडकीतूनच त्याची नजर बस स्टॊपवर उभ्या असलेल्या त्या मुलीवर गेली. तिने बहुदा छत्री विसरली असावी.