पावसाचे थेंब
पावसाची नुकतीच सुरवात होती. शाळा सुरु व्हायला अजून अवकाश होता. ढगां आडून सुर्य किरणांनी डोके थोडे वर काढले म्हणून आस्था आणि तिची आई नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारायला निघाली. अवघ्या दहा वर्षाच्या कोवळ्या वयात आस्थाची प्रश्न मालिका काही केल्या संपत नव्हती. तिचा प्रत्येक प्रश्न तिला समाधान आणि आईला संयम शिकवत होता. अचानक आभाळ दाटून आले. गार वा-याची प्रत्येक झुळूक मनाला नवी उभारी देत होती. आस्थाने आईचा हात घट्ट धरला होता. एक थेंब माथ्यावर पडला आणि आईने छत्रीला लगेच हात घातला. छत्रीची मूठ उघडेपर्यंत थेंबानी सरींचं रुप धारण केलं. आस्था प्रत्येक थेंबाचा आनंद घेत होती. काही थेंब डोक्यावर पडत होते, काही गालावर, काही हातांवर. आस्थाला पावसाची फार गंमत वाटत होती. एक हात आईच्या हातात आणि दुसरा छत्रीवरून ओघळणार पाणी स्वतः च्या गालावर उडवण्यात रमून गेला होता. तिला स्वतःला त्या पावसात चिंब भिजायचं होतं. पण छत्री अडथळा ठरत होती. त्यात एक हात आईनच्या हातात होता आणि तिने तो घट्ट धरला होता. आस्थाने एक प्रश विचारला, आईने आस्थाकडे थोडं हसून प्रेमाने पाहिलं आणि हात सोडून तिला भिजण्यासाठी मोकळा केलं, " आई, आयुष्य म्हणजे काय गं ?" हा प्रश्न विचारून आस्था आभाळातून पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत होती आणि आईच्या मनात उत्तराची जुळवा-जुळव सुरु होती. घरी आल्यावर आईने टॉवेलने तिचे केस कोरडे केले. तिच्या हातात गरम दुधाचा ग्लास देत आई तिला म्हणाली, "आयुष्य ... हे या पावसा सारखं असतं, काही थेंब छत्रीवर पडतात , काही अंगावर तर काही जमिनीवर. याच थेंबांसारख्या अनेक संधी आपल्या समोर येतंच असतात. आपण आलेल्या संधीचा सुयोग्य वापर करून स्वतःला सिद्ध करायचं, एखादी संधी हुलकावणी देऊन गेली तर वाईट वाटून घ्यायचं नसतं. आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आपलं आयुष्य आकार घेत असतं. संधी येते, संधी जाते आलेल्या संधीला जपायचं असतं, गेलेल्या संधीला कधीच आठवायचं नसतं. आयुष्य असं जगायचं असतं." आस्था मनाचे कान करून ऐकत होती, तिला आईचे विचार पटले, "आई, कित्ती छान समजावून सांगतेस गं तू. " असं म्हणत ती आईच्या गळ्यात पडली आणि आईला घट्ट मिठी मारली.
पावसाचे थेंब
Submitted by salgaonkar.anup on 16 January, 2020 - 04:53
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच लिहिता तुम्ही..
छानच लिहिता तुम्ही..
ओह माय गॉड!! काय सुरेख लिहीता
ओह माय गॉड!! काय सुरेख लिहीता तुम्ही. फार आवडले.
https://shabdbramh.wordpress
https://shabdbramh.wordpress.com/2020/05/25/4/