आमचा एंजल
५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.
तर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.
सर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.