सध्या मी 'शिक्षण कोणत्या माध्यमात घ्यावे' ह्या विषयावरचे काही लेख आणि चर्चा पाहिल्या. त्यासोबत 'प्रमाण भाषा कुठली असावी / असावी का?' असेही प्रश्न उद्भवलेले पाहिले. ह्या प्रश्नांवरती अजून माझे मत काही एक असे बनलेले नाही, परंतू ज्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल जरा सर्वांसमोर मांडावे ह्या उद्देशाने हा लेख लिहितो आहे. ह्या सर्व चर्चा ऐकताना/ वाचताना असे जाणवले की अनेकांना संशोधन नक्की कसे चालते ह्याची नीट कल्पना नसते. शिवाय 'अमुक एक भाषा ही ५ वर्षात ज्ञानभाषा होऊ शकेल' वगैरे बाता करताना इतर ज्ञानभाषांनी काय काय सोसले/ जिंकले आहे ह्याची देखील माहिती त्यांना नसते.
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...

ह्या ग्रूपचे नाव 'संशोधन पूर्ण झालेले मायबोलीकर' असे नसून 'संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर' असे आहे. त्यामुळेच येथे लिहिण्याची जुर्रत करतो. {ग्रूप निर्मात्याचे/ निर्मातीचे आभार मानून.
} मी अमूर्त गणितात सध्या पीएचडी करत आहे. आज जरा गणिताविषयी लिहीन. पुढे कधीतरी मी स्वतः काय करतो याबद्दल माहिती देईन.
टीप : येथून पुढे मी 'अमूर्त गणित' आणि 'गणित' हे शब्द बहुतांशी समान अर्थाने वापरेन.
गणित म्हणजे काय?
इटलीत असताना स्कॉटलंडच्या एडीनबरा इथल्या एका रसायनशास्त्राच्या ग्रुपबरोबर आमचं कोलॅबोरेशन होतं. हे रसायनवाले लोकं म्हणजे आमच्या दृष्टीने हॅरी पॉटरमधला पोशन मास्टर - स्नेप. त्यांच्या गुहेत जाऊन तासनतास प्रक्रिया करून एखादं जादुई पोशन घेऊन येतात. या ग्रुपचा लीडर आहे डेव्ह ली. हा लौकिकार्थाने जादुगार आहेच, रसायनशास्त्रात त्याने बरेच काम केलं आहे, पण तो खराही जादुगार आहे.
हल्ली मला हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. "तू काय करतोयस?" लोक ओळखीचे असतील तर 'य' असतो, पहिल्यांदा भेटत असतील तर नसतो. 
आपल्या रोजच्या आयुष्यात डोळ्यांना फार महत्त्व आहे. जे आपण प्रत्यक्ष पाहिले ते खरे अशी आपली पक्की समजूत असते. अगदी कोर्टातही गुन्हा प्रत्यक्ष बघणार्याची साक्ष अधिक महत्त्वाची असते. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या डोळ्यांना जे दिसते ते आपले जग हिमनगाचे एक छोटेसे टोक आहे. आपले डोळे प्रकाशाच्या विशिष्ट तरंगलांबींनाच प्रतिसाद देतात. असे का असावे? तर आपली ज्ञानेंद्रिये यांना प्रतिसाद देत नाहीत हे उत्क्रांतीमधून आपल्याला मिळालेले एक प्रकारचे संरक्षण आहे. कल्पना करा. या क्षणाला तुमच्या भोवती काय काय आहे?
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तत्सम शाखांमधे होत असलेल्या संशोधनाविषयीच्या बातम्या, माहिती आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्याची इच्छा असलेल्या मायबोलीकरांसाठी हा धागा उघडल्या जातो आहे.
उदा: 'दोन तोंडांचं आणि सव्वा पाच पायांचं वासरू जन्माला आलं' वर्तमानपत्रातल्या अशा बातम्यांपेक्षा असं वासरू जन्माला येण्यामागचं शास्त्रीय कारण सांगणारा लेख असेल तर त्याचा दुवा दिलेला जास्त योग्य. 
http://www.plos.org/oa/index.php हा एक दुवा. इथे open access तत्त्वावर (फुकटात) peer reviewed journal papers वाचायला मिळतील.