ह्या धाग्यान्वये एक गंमतीशीर अनुभवकथन व त्याबाबत थोडे मतप्रदर्शन करण्याची संधी घेत आहे. काही प्रमाणात ह्या धाग्यातील विषयाचा संबंध माझ्या 'मराठीचा अभिमान' आणि 'यू आर रिजेक्टेड' ह्या दोन धाग्यांमधील विषयाशी आहे, पण ह्या धाग्यात वेगळ्याच कोनातून अनुभवकथन करत आहे.
==============
आभाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं.
मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्या मराठीतून पुस्तके लिहिणार्या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण आता अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्या आशा रेवणकर.
खरं तर हे कुठे लिहावे हे कळले नाही. फेसबुकवरुन आलेली ही माहिती इथे शेअर करतोय.
धन्यवाद.

प्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.
पण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.
मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.
"सुटलं का तुमचं पीएचडी?" सासुबाईंच्या मैत्रीणीनं विचारलं अन मी जेलमधुन बाहेर पडलो की काय असं मला वाटुन गेलं.
एका अर्थाने तेही काही चुकीचं नव्हतं. पीएचडी केलेल्या अन करणार्या प्रत्येकाला असच वाटत असावं. पण पीएचडी म्हणजे नेमकं काय, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत.
"आता तू पीएचडी करणार म्हणजे तुला नोबेल मिळणार का?" मला अॅडमिशन झाली तेव्हा माझ्या भाचीनं विचारलं होतं. तिला लहानपणापासुन नोबेल लॉरेटच्या गोष्टी सांगण्याचा परिणाम असावा.
"भाऊ मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, पीएचडी म्हणजे एकदम धासू काम असेल ना"
"हां. मी लेजरवर काम करणार आहे."
"पण त्याचा तर खूप वास येत असेल ना"
"मे आय कम इन सर"
"हा ये ये.. बस..."
तो मात्र तसाच उभा...
"अरे बस"
"नाही सर ... मी ठिक आहे.."
"अरे बस... बराच वेळ लागेल..." तो अवघडत बसला. खरं तर इतर कोणी असता तरी त्याच्यासमोर तो अवघडला नसताच. पण डीनसर.... त्यांच्याविषयी त्याला आणि सगळ्या कॉलेजलाच आदरयुक्त भिती होती. तो खाली मान घालुन बसला होता.
"काय घेणार चहा की कॉफी?"
"न.. नाही सर नको..." तो अधिकच अवघडला.
"हा ऑप्शन नाही तुला.... चहा की कॉफी..."
"च ... चहा चालेल..सर."
"बरं... " सरांनी बेल वाजवुन 'स्पेशल चहा' सांगीतला.