पूर्वी लोकसत्ताच्या लोकरंग, चतुरंग, चित्ररंग, हास्यरंग, लोकमुद्रा या पुरवण्या भरगच्च असायच्या. (की त्या वेळी आंतरजालीय साहित्याची भरपूर प्रमाणातील सहज उपलब्धी नसल्याने तसे वाटे कोण जाणे!) बालवाचकांसाठी म्हणून रंजक विभाग असायचा. बिरबलाच्या गोष्टी, घरच्या घरी कमी साहित्यात करून बघता येतील असे विज्ञानिक तत्वांवर आधारीत प्रयोग , बुचकळ्यात टाकणारी दैंनंदिन व्यवहारातील लेखी गणितं. वगैरे. प्रत्येक आठवड्यात कृपा कुलकर्णी यांनी भारतातील इतर भाषांमधून मराठीत भाषांतर केलेली एक नवी गोष्ट असे. प्रत्येक वेळी वेगळ्या भाषेतली भाषांतरीत गोष्ट.
किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
पेट्रोलची किंमत वाढत आहे, पण पेट्रोलवर किती, काय टॅक्स लावतात हे अजिबात माहित नव्हते, मग ते शोधायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणावरून, बघून ही माहिती समजवून घेतली, या किंमती नॉन ब्रँडेड पेट्रोलच्या आहेत, किंमती अगदी ०.४७ अशा स्वरूपात मुद्दामून नमूद केल्या नाहीत, हे टॅक्स बरेच किचकट वाटत होते, ते सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
किती रुपयाला क्रूड (कच्चे) ऑइल मिळते?
१) ३३०० ते ३४०० रुपये पर बॅरल (२३ सप्टेंबर २०१७)
२) एक बॅरल म्हणजे १५९ लिटर्स
३) २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
खूप दिवस रोहिंग्या मुसलमान यांच्या बद्दल टीव्हीवर बघत होतो, पण नेमकी बातमी कळत नव्हती, म्हणून या बातमी बद्दल वाचायला, बघायला सुरुवात केली, माझ्या सारखे अजून कोणीही असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी खालील माहिती उपयोगी असू शकते.
इथे माझे वैयक्तिक मत द्यायचे नसून, बातमी सोप्या शब्दात मांडायची आहे
रोहिंग्या मुसलमान कोण आहेत?
म्यानमार देशातून निर्वासित झालेले मुस्लिम बांधव, त्यांना भारतात आश्रय हवा आहे.
म्यानमार मधून निर्वासित का झाले?
कारण रखाइन बुद्ध लोकांनी रोहिंग्या मुसलमान लोकांवर वारंवार प्राणघातक हल्ले केले.
गेल्या ७० वर्षाम्तला भारताच्या पंतप्रधानांचा पहीला इज्राईल दौरा !!
गेल्या ७० वर्षांत ईज्रायल सारख्या सामर्थ्यवान देशाला ईग्नोर करण्याच महान काम आपल्या सरकारने आता पर्यंत
केलेल आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाईन सारख्या देशाच समर्थन सुद्धा केलेल आहे.
पर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अनुभवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.
शेतीसाठी, शेतकर्यांसाठी, अथक परीश्रम करुन , संशोधन करुन नविन पद्दती निर्माण केलेल्या कृषी महर्षी
श्री सुभाष पाळेकर यांचे अभिनंदन !! संपुर्ण भारत देशात शेतकर्यांत ह्या महर्षींची ख्याती पसरलेली आहे. हरीयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, आंध्रा, तामिळनाडु, कर्नाटक राज्यात झीरो बजेट नॅचरल शेती करणारे ४० लाख शेतकरी आहेत. पण ह्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. ह्या महाराष्ट्र पुत्राला त्याच खुप दुखः आहे. पण आता चित्र बदलत आहे !!
नमस्कार, मी सचिन काळे. एक नवलेखक! वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो! शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर!!!' छाप निबंध लिहिल्याचे तेवढे आठवते. आणि त्या निबंधात मी तोडलेले तारे, शिक्षकांच्या डोळ्यांपुढे चमकल्याचे अजूनही आठवते. तसेच, अजून एकदा एका छोकरीला पत्रलेखन करण्याचा माझा प्रयत्न त्या मुलीच्या बापाने हाणून पाडून माझ्यातल्या लेखकाचा/कवीचा अंत केला होता. ज्याचा दुर्दैवी परिणाम एवढे दिवस आपल्यासारख्या साहित्यरसिकांना माझ्याकडून भविष्यात होऊ शकणाऱ्या साहित्यरचनेपासून दूर ठेवण्यात झाला. असो!
८ ऑक्टोबर. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस. याच दिवशी १९३२ मध्ये अवघ्या ४ वेस्टलँड वापिटी विमाने आणि ५ वैमानिकांसह भारतीय हवाई दलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने विविध संकटांच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर फोर्सचे इंडियन एअर फोर्स झाले.
ऑलिंपिक म्हणजे सळसळता उत्साह. जगातील सर्वांत मोठा सोहळा. ऑलिंपिक म्हणजे जगातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा. वेगवान, उच्च आणि बळकट असे ब्रीड मिरवणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, तसेच ऑलिपिंकचे आयोजक होऊन आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे प्रत्येक देशाचे स्वप्न असते. १८९६ मध्ये सुरू झालेली ऑलिंपिक चळवळ आता चांगली बहरली आहे.