नियतकालीक

तडका - हूंडाग्रस्त

Submitted by vishal maske on 6 January, 2016 - 21:33

हूंडाग्रस्त

छळतो हूंडा,जाळतो हूंडा
देणारालाच कळतो हूंडा
कित्तेकींचे बळी घेऊनही
समाजातुन ना टळतो हूंडा

अस्वस्थ झाले,उध्वस्त झाले
लोक हूंड्याने त्रस्त झाले
मुलींचे लग्न करता-करता
माय-बाप हूंडाग्रस्त झाले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - खरा धोका

Submitted by vishal maske on 6 January, 2016 - 08:07

खरा धोका

कधी बाहेरचे येऊन करतात
कधी कधी आतलेच करतात
प्रत्येक दहशती हल्ल्यांमध्ये
माणसं तर आपलेच मरतात

कोण कधी कुठे काय करतो
पक्क आमच्या डोक्यात आहे
बाहेरच्यांसह आतल्यांकडून
हल्ली देश हा धोक्यात आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आमच्या धावा

Submitted by vishal maske on 5 January, 2016 - 20:13

आमच्या धावा

शतकावरती शतकं झाली
हजारंही झाले असतील
धावता-धावता आयुष्यातील
कित्तेक पैलु गेले असतील

धावुन धावुन ना थकून जातोय
शेतकरी राजा अन् राणी
धावा मोजण्या सवड नाही
पण धावत राहतोय अनवाणी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दहशतवादी दोस्तांनो

Submitted by vishal maske on 5 January, 2016 - 10:21

दहशतवादी दोस्तांनो

स्वत:च्या विचार सरणीत
शेण-माती कालवतात,.?
आमच्याच घरात घुसुन
दहशतवाद फैलावतात,..!

बस्स झाली ही फालतुगीरी
आता वर नाही पहायचे
आम्ही तुमच्या घरात घुसल्यास
तुमचे 'घर' नाही रहायचे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - धंदा अपना अपना

Submitted by vishal maske on 4 January, 2016 - 21:48

धंदा अपना अपना

प्रत्येकाच्या स्वभावाचे
वेग-वेगळे पैलु असतात
कुणाचे वागणे चकचकीत
तर कुणाचे मैलु असतात

इमानदारीचा धंदा इथे
बेइमानी मध्ये घोळतो
मात्र बेईमानीची धंदा
इमानदारीत चालतो,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - तीचा संसार

Submitted by vishal maske on 4 January, 2016 - 08:50

तीचा संसार

त्याच्या विना तीची हौस
फिटता फिटणार नाही
त्याच्या सहकार्याविना
तीचा संसार थाटणार नाही

आता या गोष्टीचीही
येऊ लागलीय साक्ष
ती आहे केबल टि.व्ही.
तो आहे सेट-टॉप-बॉक्स

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सामाजिक प्रेशर

Submitted by vishal maske on 3 January, 2016 - 20:49

सामाजिक प्रेशर

स्वत:चं काम करणंही
मुद्दाम टाळतात लोक
कर्तव्यापासुन दूर-दूर
मुद्दाम पळतात लोक

कधी कोणते काम करावे
ज्याचे-त्याचे नेचर असते
पण कर्तव्याचा विसर पडणे
हे सामाजिक प्रेशर असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - चोर मचाए शोर

Submitted by vishal maske on 3 January, 2016 - 09:59

चोर मचाए शोर

कुणाच्या तोंडून काय निघावे
याचा कुठेच आराखडा नाही
वादग्रस्तांनाही पोसतात लोक
ही साधी-सुधी पीडा नाही

आपली चोरी लपवण्याला
आयडीया वापरतात नव्या
चोरी करून चोरणारालाच
मुद्दाम घालतात शिव्या,..!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - प्रादूर्भाव सत्कार्याचा

Submitted by vishal maske on 2 January, 2016 - 21:09

प्रादूर्भाव सत्कार्याचा

शिक्षण घेतलं,प्रगत झाल्या
विचारांनीही जागृत झाल्या
समाजातील महिला आता
भरभराटीचा पर्वत झाल्या

आज घडतोय इतिहास
स्री शौर्याचा अन् धैर्याचा
हा प्रादूर्भाव आहे सारा
सावित्रीच्या सत्कार्याचा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दहशतवादी हल्यांत

Submitted by vishal maske on 2 January, 2016 - 09:54

दहशतवादी हल्यांत

कळेना माणसांना
भावना आसवांची
माणसांत पसरलीय
दहशत माणसांची

मनातील सुड भावाने
माणूस मारला जातोय
या दहशतवादी हल्यांत
माणूस हरला जातोय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - नियतकालीक