खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.
बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.
पैसा
आपल्या कुवतीनुसार
जो-तो कमवतो पैसा
चढ-ऊतार करत कधी
माणसांना रमवतो पैसा
पैशामुळं तर कधी कधी
माणूसकीलाही डागणं आहे
जगण्यासाठी हा पैसा की
पैशासाठी हे जगणं आहे,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
काम
पहा म्हणायच्या आधी
ऊत्सुकतेत राहतात
चांगले काम निश्चितच
लोक हौसेनं पाहतात
व्यक्तीच्या कार्यातुन
राहिले जाते नाम
जीवनामध्ये सदैवच
चांगले करावे काम
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
रविवार
संण्डे टू संण्डे करत करत
आठ दिवस हाकला जातो
आठवड्याचा बोजाही
रविवारवर टाकला जातो
गमती-जमतीचा रविवारवर
परिवार रूपी हमला होतो
आठवडी चेंजस घडवणारा
रविवार हॅप्पी मानला जातो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सेल्फी काढताना
मोह आवरला नाही तरीही
मोहपुर्ती करताना भान असावे
काढायचे म्हणून कसेही नको
सेल्फी काढण्याचे ज्ञान असावे
आजुबाजुचा विचार करूनच
प्रत्येक सेल्फी घेतला पाहिजे
अन् काढण्यात येणारा सेल्फी
जीवावरती ना बेतला पाहिजे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमच्या अपेक्षा
शिक्षकच तर असतात
विद्यार्थ्यांचा आदर्श
शिक्षकांच्या सवयींचा
विद्यार्थ्यांना परामर्श
शिक्षकांकडून अपेक्षीत
आहेत बदलाचे ते क्षण
स्वत:सह इतरांच्याही
दुर्वेसनास द्यावी वेसन
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमच्या अपेक्षा
शिक्षकच तर असतात
विद्यार्थ्यांचा आदर्श
शिक्षकांच्या सवयींचा
विद्यार्थ्यांना परामर्श
शिक्षकांकडून अपेक्षीत
आहेत बदलाचे ते क्षण
स्वत:सह इतरांच्याही
दुर्वेसनास द्यावी वेसन
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
बैल दौड
समाजात वागत असताना
माणूसकीचा झाला खुर्दा
माणसांत करता करताना
प्राण्यांतही लावतात स्पर्धा
जिथे-जिथे जुंपले जाईल तिथे
इमानदारीतच दौडावं लागतं
माणसांना आनंद घेण्यासाठी
बैलानाही सुख मोडावं लागतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
रंग भास
सहज ओळखता येते
कोणता रंग कोणाचा
रंग वापरताना हल्ली
थरकाप उडतो मनाचा
कित्तेकांनी टाकलेले
रंगांवरती फास आहेत
वेग-वेगळ्या रंगांना
जाती-धर्माचे भास आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शाळा
कुणाला वाचवायचा
कुणाला नाचवायचा
कुणाला नटवायचा
कुणाला पटवायचा
असतात ठेऊनच
या बाबींवर डोळा
असते चालु याचसाठी
मना-मनात शाळा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३