स्तंभलेखन

नियतकालिकांतील स्तंभलेखक, सदरे इ.

Submitted by गजानन on 10 August, 2018 - 02:54

पूर्वी लोकसत्ताच्या लोकरंग, चतुरंग, चित्ररंग, हास्यरंग, लोकमुद्रा या पुरवण्या भरगच्च असायच्या. (की त्या वेळी आंतरजालीय साहित्याची भरपूर प्रमाणातील सहज उपलब्धी नसल्याने तसे वाटे कोण जाणे!) बालवाचकांसाठी म्हणून रंजक विभाग असायचा. बिरबलाच्या गोष्टी, घरच्या घरी कमी साहित्यात करून बघता येतील असे विज्ञानिक तत्वांवर आधारीत प्रयोग , बुचकळ्यात टाकणारी दैंनंदिन व्यवहारातील लेखी गणितं. वगैरे. प्रत्येक आठवड्यात कृपा कुलकर्णी यांनी भारतातील इतर भाषांमधून मराठीत भाषांतर केलेली एक नवी गोष्ट असे. प्रत्येक वेळी वेगळ्या भाषेतली भाषांतरीत गोष्ट.

Subscribe to RSS - स्तंभलेखन