किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.
'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.
लेखमाला
- अजब देशात [Wizard of Oz - L. Frank Baum] - भा.रा.भागवत
- भाग १ - फेब्रुवारी १९७८ ... भाग ८ (अंतिम) - ऑक्टोबर १९७८
- अमित शोध [Silvertip's search - Max Brand] - सौ. शुभदा खरे
- भाग १ - मार्च १९८३ ... भाग ७ (अंतिम) - सप्टेंबर १९८३
- असे हे विलक्षण जग - वसंत शिरवाडकर
- भाग १ - नोव्हेंबर १९७१ ...
- चीनचे प्राचीन शोध - सुरेश मथुरे
- रेशीम - जून १९८०
- होकायंत्र- जुलै १९८०
- कागद - ऑगस्ट १९८०
- कुंचला - सप्टेंबर १९८०
- चिनी माती - ऑक्टोबर १९८०
- फटाके - नोव्हेंबर १९८०
- अॅक्युपंक्चर - डिसेंबर १९८०
- घड्याळ- जानेवारी १९८१
- छपाई यंत्र - फेब्रुवारी १९८१
- कागदी नोटा - मार्च १९८१
- रुप्या बुरुज आणि धाडशी चमू [Famous Five - Enid Blyton] - ज्ञानदा नाईक
- भाग १ - जून १९८५ ... भाग ५ (अंतिम) - ऑक्टोबर १९८५
- विज्ञानाचे वाटाडे - सुरेश मथुरे
- हिपॉक्राटेझ - मार्च १९७६ ... (भाग अंतिम) आर्किमिडीझ - ऑक्टोबर १९७६
- सागरकैद [20000 Leagues under the Sea] - प्रकाश प्रभू
- भाग १ - फेब्रुवारी १९७९ ... भाग ८ (अंतिम) - सप्टेंबर १९७९
- सागरराजाच्या राज्यात - रा. वि. रानडे
- भाग १ - ऑगस्ट १९८० ... भाग ६ (अंतिम) - जानेवारी १९८१
- ज्ञानवृक्षाच्या पारंब्या - सुरेश मथुरे
- कणाद - जानेवारी १९७८
- चार्वाक - फेब्रुवारी १९७८
- पाणिनी - मार्च १९७८
- पिंगल - एप्रिल १९७८
- कात्यायन - मे १९७८
- भरतमुनी- जून १९७८
- भृगू - जुलै १९७८
- चाणक्य - ऑगस्ट १९७८
- चरक - सप्टेंबर १९७८
- सुश्रुत - ऑक्टोबर १९७८
- सप्तर्षी- नोव्हेंबर १९७८
- नागार्जुन - डिसेंबर १९७८
- आर्यभट - श्री. रा. टिकेकर - ऑगस्ट १९७५
कथा / लेख
- भा.रा.भागवत
- हावरट हेमा - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७५
- महेश उडाला भुर्रर्र - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७६
- धिटुकली शकू - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७८
- अलकनंदा आणि जादूगार - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७९
- गड आला आणि सिंहही आला - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८०
- मोगलगिद्दीकरांची रद्दी ( फा फे कथा) - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८१
- काठे-आजोबा - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८२
- पक्याचे पोस्मनकाका - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८३
- पिवळ्या पट्ट्याचा प्रताप - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८५
- विविध लेखक / लेखिका
- बासुन्दी घट्ट होऊ दे ! - हेमा परुळेकर - फेब्रुवारी १९७२
- छुम् छुम् जाणार ... झूम् झूम् येणार - केशव मेश्राम - मार्च १९७२
- मिशीवर कर्ज - विनोद घारपुरे - मार्च १९७२
- श्रीखंडाचे बोट - श्री. दा. पानवलकर - ऑगस्ट १९७५
- बिली आणि ठेंगूजी - सविता जाजोदिया - नोव्हेंबर १९७६
- किटलीचा काटा काढला - सौ. शोभा बोन्द्रे - फेब्रुवारी १९७८
- अज्ञानाची काशीयात्रा - सौ. मंदा बोडस - मार्च १९७८
- कुस्तीगीर देऊ देवल - नीलिमा गोखले - जुलै १९७८
- वस्तुचे मोल - विलास गिते - सप्टेंबर १९७८
- छोटूचा रुसला टॉवेल - सौ. पद्मजा फाटक - ऑक्टोबर १९७८
- छोटा सैनिक - वसंत पोरेडी - नोव्हेंबर १९७८
- अर्थ की निरर्थ - बाबामोहम्मद अत्तार - जानेवारी १९७९
- निळा हत्ती (स्वप्नवासवदत्ता) - कमलाबाई टिळक - जुलै १९७९
- पैज - दि. मा. प्रभुदेसाई - फेब्रुवारी १९८०
- आकाशातील चांदण्या - सौ. मुमताज रहिमतपुरे - जून १९८०
- शकुनाचे वेड - बा. अ. देसाई - ऑक्टोबर १९८०
- इंगा - प्रकाश प्रभू - जानेवारी १९८१
- जितूचा इंटरव्ह्यू- सौ. सुमती इनामदार - जून १९८१
- दोन्ही मागे उभयान्वयी- भगवंत रघुनाथ आगास्कर - जुलै १९८१
- फुलवा - विजया वाड - नोव्हेंबर १९८२
- जौळ - तु.बा.नार्वेकर - नोव्हेंबर १९८२
- बक्षीस समारंभ - दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२
- बाबा जित्तो - मोरेश्वर माधव वाळिंबे - नोव्हेंबर १९८३
लघु लेख
- माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
- अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
- मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
- बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८
नाट्यछटा
- अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१
कविता
- टपटप- शांता शेळके - एप्रिल १९७२
- प्रश्नोतरे - बा.भ.बोरकर - नोव्हेंबर १९७२
नाटुकली / एकांकिका
- अलिबाबाचे खेचर - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७६
- भोपळ्या राक्षस - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७८
- मोठं व्हायचं मला ! - सौ. अनुराधा खोत - जून १९८०
चित्रकथा
- बोलके खांब - प्रभाशंकर कवडी - भाग १ नोव्हेंबर १९७१ ... भाग ५ (अंतिम) मार्च १९७२
- दर्यादेशची राजकन्या - भा.रा.भागवत - भाग १ एप्रिल १९७२ ... भाग ७ (अंतिम) ऑक्टोबर १९७२
- घाटातले रहस्य - वसंत सबनीस - नोव्हेंबर १९७९ ... भाग ३ (अंतिम) जानेवारी १९८०
- सुवर्ण घंटा - मधुकर टांकसाळे - नोव्हेंबर १९८२
तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"
खूप छान आणि उपयोगी धागा.
खूप छान आणि उपयोगी धागा. वर सूचीत लेखकाचेही नाव दिले तर बरे होईल कारण बर्याचदा लेखक आठवत असतो पण लेखनाचे नाव लक्षात नसते,
हा विभागही सुरू करा
नाटुकली/एकांकिका
अलिबाबाचे खेचर - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७६
छान सूचना. धन्यवाद अजय.
छान सूचना. धन्यवाद अजय.
हो. मी कालच हि हे पहिले.
हो. मी कालच हि हे पहिले. लहानपणी पाहिलेले सगळे अंक जसेच्या तसे. हरवून गेलो अक्षरशः. काही कव्हर्स पण अजून जशीच्या तशी आठवतात. आणि आतील ती प्रभाशंकर कावडी यांची विशेष स्टाईलची रेखाटने. हा हा हा. पुन्हा सगळे बालपण आठवले.
लहानपणी एक कथा वाचत होतो. अर्धी झाली आणि तो अंक हरवला. ती नंतर पूर्ण वाचायला कधीच मिळाली नाही ती आजतागायत. तो अंक खूप खूप शोधूनही मिळाला नाही. त्याची हुरहूर लहानपणी खूप लागून राहिली होती. त्याच अंकात एक दुसरी कथा होती. ती थोडीफार आठवते. एक शेतकरी असतो त्याला सावकाराचा जाच असतो. कर्जाने कि अन्य काही कारण आता आठवत नाही. पण शेवट खूप दुर्दैवी आहे. शेतकऱ्याचे धान्य पिकून शेतात मळणी सुरु असते. तर सावकाराचे लोक येतात आणि ते धान्य घेऊन जाऊ लागतात. वर्षभराचे कष्ट असे वाया जाताना शेतकऱ्याला सहन होत नाही. त्याच धान्याच्या राशीवर तो आपले प्राण देतो. असे काहीसे. या कथेशी संबंधित ते चित्र पण त्या अंकावर होते.
पण हा अंक मिळालाच नाही इथे सुद्धा. त्यामुळे तो अंक "किशोर"च होता का असेही आता वाटू कागले आहे. वर्ष साधारणपणे ऐशीच्या मागेपुढे असेल. कुणाला हि कथा आठवायची शक्यता फार फार फार दुर्मिळ. पण जर कोणाला आठवलीच तर मला शब्दच नसतील आभार मानायला.
गड आला आणि सिंहही आला ही कथा
गड आला आणि सिंहही आला ही कथा आहे. बदल कराल का ?
भा. रा. भागवतांच्या काही कथा :
नोव्हेंबर ७५ - हावरट हेमा
नोव्हेंबर ७८ - धिटुकली शकू
नोव्हेंबर ७९ - अलकनंदा आणि जादूगार जिम
नोव्हेंबर ८० - गड आला आणि सिंहही आला
नोव्हेंबर ८१ - मोगलगिद्दीकरांची रद्दी ( फा फे कथा )
नोव्हेंबर ८३ - पक्याचे पोस्मनकाका
फेब्रुवारी ७८ - अजब देशात ( भा. रा. भागवत - विझर्ड ऑफ ऑझचं रुपांतर ) मालिका सुरु होतेय.
@atuldpatil , तुम्ही म्हणताय
@atuldpatil , तुम्ही म्हणताय ती कथा 'बाबा जित्तो' ही आहे का? सप्टेंबर १९८० च्या अंकात पहिलीच कथा आहे ही.
धन्स अगो. सूची वाढवलीये.
धन्स अगो. सूची वाढवलीये.
@वैनिल कमाल !!! हीच कथा. काल
@वैनिल कमाल !!! हीच कथा. काल सगळे अंक चाळले तरी मिळाली नाही हा हा हा हा हा Simply Great Help !!! Many many many thanks....!
मस्त!! किशोर चे अंक पाहून
मस्त!! किशोर चे अंक पाहून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद !!!
@atuldpatil, I'm happy to
@atuldpatil, I'm happy to help ... असे क्षण आपसांत वाटायला खरंच खूप बरं वाटतं.
माझीही शोधमोहिम अशीच चालू आहे. बर्याच कथा शोधायच्या आहेत अजून.
उदा., 'कूच' - पहाटेच्या अंधारात निघालेल्या बैलगाडीच्या ताफ्याची,
वाढदिवसाला आणलेला cake एकटीनेच संपवणार्या मुलीची आणि तिला स्वतःच्या वाट्याची खीर देणार्या कुटुंबाची,
गावाला जाऊन रुसलेल्या मुलीची आणि तीला घाबरवणार्या पाळीव म्हैस आणि माकडाची (लेखिका डॉ. सरोजिनी बाबर),
एक नाट्यछटा - अंघोळ करून आलेल्या मुलाची त्याच्या आवडत्या ('महाराजा'चं चित्र असणार्या) towel बरोबरची ... It's a big list and I'm enjoying the search
रुप्या बुरुज आणि धाडशी चमू |
रुप्या बुरुज आणि धाडशी चमू | मूळ लेखिका: एनिड ब्लायटन | अनुवादः ज्ञानदा नाईक
http://kishor.ebalbharati.in/archive/include/pdf/1985_06.pdf
मस्त धागा.
मस्त धागा.
धन्स आदूबाळ, जागूतै.
धन्स आदूबाळ, जागूतै.
अर्रे बाSSSSपरें!!
अर्रे बाSSSSपरें!!
वैनिलजी....कुठे आहेत तुमचे चरणकमळ...दाखवा बरें! शिर साष्टांग दंडवत घ्या पाहू!!
आणी हा खजिना उघडणार्या प्रत्येक व्यक्तिंचे चरणस्पर्श!!
सप्टेंबर '७८ चा अंक उघडला आणी 'वस्तुचे मोल' हि कथा सापडली! अत्यानंद झाला! लहानपणी वाचलेली आणी माझी प्रेरणा असलेली ही गोष्ट!
......आता चांदोबा, चंपक, मधु-मुस्कान, लोटपोट, अमर चित्र-कथा इत्यादी जर असे कुठे सापडले तर मग मी सुखाने ........!! असो!!
१२१, ०००,०५१,०००, १०१,०००,२०१,१०८, ०२१, ०११, ९११, १११,०००,०००,००० एवढे धन्यवाद अँडव्हांस म्हणून दिले तर क्रुपया स्विकार कराल का?
अजून अंक पाहिले नाहीत.
अजून अंक पाहिले नाहीत.
गड आला आणि सिंहही आला आठवतेय (सिंहगडावर ट्रेझर हंट)
बन्सी नावाची एक कथा होती- बन्सी नदीला आलेल्या पुरातून लहान मुलाला की मुलीला वाचवतो.
एक नाटिका होती- भाऊ बहीण दुपारचे एकटेच घरी असतात आणि गोंधळ घालतात. मला त्यातला एक भाग आठवतोय तो म्हणजे पोस्टमन कुण्या रवीचा पत्ता विचारतो, तर त्या भागात तीन तीन रवी असतात. त्यातलं रवी भिरंगी हे नाव मी तेव्हा पहिलं आणि शेवटचं ऐकलंय.
सूचीबद्द्ल धन्यवाद!
सूचीबद्द्ल धन्यवाद!
स्वप्नवासवदत्ता या नाटकाची गोष्ट होती एका अंकात. ती शोधायचा प्रयत्न केला पण अजून मिळत नाहिये. कोणाला तो अंक माहिती असल्यास कळवा. बहुतेक १९९९ च्या आधीचा असावा.
पिवळ्या पट्ट्याचा प्रताप ही भा रा भागवतांची कथा कोणत्या अंकात आहे? The speckled band चे भाषांतर आहे. होम्सची अनेक भाषांतरे प्रथम किशोरमधेच आली होती.
तसंच एक कथा आठवते आहे. एका मुलाला बक्षीस मिळतं, चुकून पाहुण्या अध्यक्षासाठी आणलेलं सेंट त्याला दिलं जातं, मग शेवटी त्याला ते परत करावं लागतं. पण तो आणि त्याच्या मित्रांनी ते आधीच वापरलं असतं मग ते त्याच्यात तेल का काहितरी भरून सील करून परत करायला जातात आणि धमाल उडते. सेंटची बाटली असं नाव होतं बहुतेक त्या कथेचं. तीही कोणाला सापडल्यास कळवा प्लीज!
पिवळ्या पट्ट्याचा प्रताप ही
पिवळ्या पट्ट्याचा प्रताप ही भा रा भागवतांची कथा कोणत्या अंकात आहे? >> नोव्हेंबर १९८५
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्तच! हा खजिना उघडण्यासाठी
मस्तच! हा खजिना उघडण्यासाठी हातभार लावणार्या सर्वांचे मनापासून आभार!
धन्यवाद वैनिल आणि इथे सूचीत भर घालणारे माबोकर!
हावरट हेमा किती गोड गोष्ट आहे
हावरट हेमा किती गोड गोष्ट आहे
ज्ञानवृक्षाच्या पारंब्या
ज्ञानवृक्षाच्या पारंब्या
कणाद : जानेवारी १९७८
चार्वाक : फेब्रूवारी १९७८
...
नागार्जुन - डिसेंबर १९७८ (अंतिम)
या लेखमालेबाहेरचा पण त्या सारखा लेख
आर्यभट - श्री. रा. टिकेकर - ऑगस्ट १९७५
कथा:
श्रीखंडाचे बोट - श्री. दा. पानवलकर - ऑगस्ट १९७५
लेखमालिका
विज्ञानाचे वाटाडे : सुरेश मथुरे
हिपॉक्राटेझ - मार्च १९७६ (सुरुवात)
आर्किमिडीझः ऑक्टोबर १९७६
भारी खजिना आहे आणि लिस्ट
भारी खजिना आहे आणि लिस्ट केल्याबद्दल तर खूपच आभार सर्वांचे
तसंच एक कथा आठवते आहे. एका
तसंच एक कथा आठवते आहे. एका मुलाला बक्षीस मिळतं, चुकून पाहुण्या अध्यक्षासाठी आणलेलं सेंट त्याला दिलं जातं, मग शेवटी त्याला ते परत करावं लागतं. >>>'बक्षीस समारंभ' कथा, लेखक दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२
स्वप्नवासवदत्त - कथेचे नाव 'निळा हत्ती' - लेखिका कमलाबाई टिळक - जुलै १९७९
लहानपणी पाहिलेले सगळे अंक
लहानपणी पाहिलेले सगळे अंक जसेच्या तसे. हरवून गेलो अक्षरशः. > मी पण !
मस्तच! हा खजिना उघडण्यासाठी हातभार लावणार्या सर्वांचे मनापासून आभार! > अगदी अगदी !!
एक नाट्यछटा - अंघोळ करून आलेल्या मुलाची त्याच्या आवडत्या ('महाराजा'चं चित्र असणार्या) towel बरोबरची ... >> छोटूचा रुसला टॉवेल अशीही एक गोष्ट आठ्वते आहे.
हे फार भारी आहे! मनापासून
हे फार भारी आहे! मनापासून आभार ह्या धाग्यासाठी!
कुणाला नारायण धारपांच्या कथा
कुणाला नारायण धारपांच्या कथा किशोर मध्ये आल्याचं आठवत आहे का? असेल तर plz अंक कुठला होता तेही सांगा...
मला का दिसत नाहीये....
मला का दिसत नाहीये.... काहीतरी भलतीच लिपी दिसतेय.... असं का?
अरे व्वा, मस्तंच! निवडक
अरे व्वा, मस्तंच! निवडक लेखांच्या सूचीची आय्डिया पण सॉलिड्ड!
मस्त धागा. आभार
मस्त धागा. आभार
तसंच एक कथा आठवते आहे. एका
तसंच एक कथा आठवते आहे. एका मुलाला बक्षीस मिळतं, चुकून पाहुण्या अध्यक्षासाठी आणलेलं सेंट त्याला दिलं जातं, मग शेवटी त्याला ते परत करावं लागतं. >>>'बक्षीस समारंभ' कथा, लेखक दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२ Happy
स्वप्नवासवदत्त - कथेचे नाव 'निळा हत्ती' - लेखिका कमलाबाई टिळक - जुलै १९७९
>> धन्यवाद!!
फुलवाची गोष्ट आठवते का कोणाला
फुलवाची गोष्ट आठवते का कोणाला ? कुठल्या अंकात आहे ?
Pages