किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची

Submitted by वैनिल on 27 November, 2017 - 21:56

किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.

किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्‍यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. Happy किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.

'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.

लेखमाला

कथा / लेख

लघु लेख

  • माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
  • अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अ‍ॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
  • मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
  • बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८

नाट्यछटा

  • अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१

कविता

नाटुकली / एकांकिका

चित्रकथा

तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान आणि उपयोगी धागा. वर सूचीत लेखकाचेही नाव दिले तर बरे होईल कारण बर्‍याचदा लेखक आठवत असतो पण लेखनाचे नाव लक्षात नसते,

हा विभागही सुरू करा
नाटुकली/एकांकिका
अलिबाबाचे खेचर - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७६

हो. मी कालच हि हे पहिले. लहानपणी पाहिलेले सगळे अंक जसेच्या तसे. हरवून गेलो अक्षरशः. काही कव्हर्स पण अजून जशीच्या तशी आठवतात. आणि आतील ती प्रभाशंकर कावडी यांची विशेष स्टाईलची रेखाटने. हा हा हा. पुन्हा सगळे बालपण आठवले.

लहानपणी एक कथा वाचत होतो. अर्धी झाली आणि तो अंक हरवला. ती नंतर पूर्ण वाचायला कधीच मिळाली नाही ती आजतागायत. तो अंक खूप खूप शोधूनही मिळाला नाही. त्याची हुरहूर लहानपणी खूप लागून राहिली होती. त्याच अंकात एक दुसरी कथा होती. ती थोडीफार आठवते. एक शेतकरी असतो त्याला सावकाराचा जाच असतो. कर्जाने कि अन्य काही कारण आता आठवत नाही. पण शेवट खूप दुर्दैवी आहे. शेतकऱ्याचे धान्य पिकून शेतात मळणी सुरु असते. तर सावकाराचे लोक येतात आणि ते धान्य घेऊन जाऊ लागतात. वर्षभराचे कष्ट असे वाया जाताना शेतकऱ्याला सहन होत नाही. त्याच धान्याच्या राशीवर तो आपले प्राण देतो. असे काहीसे. या कथेशी संबंधित ते चित्र पण त्या अंकावर होते.

पण हा अंक मिळालाच नाही इथे सुद्धा. त्यामुळे तो अंक "किशोर"च होता का असेही आता वाटू कागले आहे. वर्ष साधारणपणे ऐशीच्या मागेपुढे असेल. कुणाला हि कथा आठवायची शक्यता फार फार फार दुर्मिळ. पण जर कोणाला आठवलीच तर मला शब्दच नसतील आभार मानायला. Happy

गड आला आणि सिंहही आला ही कथा आहे. बदल कराल का ?

भा. रा. भागवतांच्या काही कथा :
नोव्हेंबर ७५ - हावरट हेमा
नोव्हेंबर ७८ - धिटुकली शकू
नोव्हेंबर ७९ - अलकनंदा आणि जादूगार जिम
नोव्हेंबर ८० - गड आला आणि सिंहही आला
नोव्हेंबर ८१ - मोगलगिद्दीकरांची रद्दी ( फा फे कथा )
नोव्हेंबर ८३ - पक्याचे पोस्मनकाका

फेब्रुवारी ७८ - अजब देशात ( भा. रा. भागवत - विझर्ड ऑफ ऑझचं रुपांतर ) मालिका सुरु होतेय.

@atuldpatil, I'm happy to help ... असे क्षण आपसांत वाटायला खरंच खूप बरं वाटतं. Happy

माझीही शोधमोहिम अशीच चालू आहे. बर्‍याच कथा शोधायच्या आहेत अजून.
उदा., 'कूच' - पहाटेच्या अंधारात निघालेल्या बैलगाडीच्या ताफ्याची,
वाढदिवसाला आणलेला cake एकटीनेच संपवणार्‍या मुलीची आणि तिला स्वतःच्या वाट्याची खीर देणार्‍या कुटुंबाची,
गावाला जाऊन रुसलेल्या मुलीची आणि तीला घाबरवणार्‍या पाळीव म्हैस आणि माकडाची (लेखिका डॉ. सरोजिनी बाबर),
एक नाट्यछटा - अंघोळ करून आलेल्या मुलाची त्याच्या आवडत्या ('महाराजा'चं चित्र असणार्‍या) towel बरोबरची ... It's a big list and I'm enjoying the search Happy

अर्रे बाSSSSपरें!!
वैनिलजी....कुठे आहेत तुमचे चरणकमळ...दाखवा बरें! शिर साष्टांग दंडवत घ्या पाहू!!
आणी हा खजिना उघडणार्‍या प्रत्येक व्यक्तिंचे चरणस्पर्श!!
सप्टेंबर '७८ चा अंक उघडला आणी 'वस्तुचे मोल' हि कथा सापडली! अत्यानंद झाला! लहानपणी वाचलेली आणी माझी प्रेरणा असलेली ही गोष्ट!
......आता चांदोबा, चंपक, मधु-मुस्कान, लोटपोट, अमर चित्र-कथा इत्यादी जर असे कुठे सापडले तर मग मी सुखाने ........!! असो!!
१२१, ०००,०५१,०००, १०१,०००,२०१,१०८, ०२१, ०११, ९११, १११,०००,०००,००० एवढे धन्यवाद अँडव्हांस म्हणून दिले तर क्रुपया स्विकार कराल का?

अजून अंक पाहिले नाहीत.
गड आला आणि सिंहही आला आठवतेय (सिंहगडावर ट्रेझर हंट)
बन्सी नावाची एक कथा होती- बन्सी नदीला आलेल्या पुरातून लहान मुलाला की मुलीला वाचवतो.
एक नाटिका होती- भाऊ बहीण दुपारचे एकटेच घरी असतात आणि गोंधळ घालतात. मला त्यातला एक भाग आठवतोय तो म्हणजे पोस्टमन कुण्या रवीचा पत्ता विचारतो, तर त्या भागात तीन तीन रवी असतात. त्यातलं रवी भिरंगी हे नाव मी तेव्हा पहिलं आणि शेवटचं ऐकलंय.

सूचीबद्द्ल धन्यवाद!

स्वप्नवासवदत्ता या नाटकाची गोष्ट होती एका अंकात. ती शोधायचा प्रयत्न केला पण अजून मिळत नाहिये. कोणाला तो अंक माहिती असल्यास कळवा. बहुतेक १९९९ च्या आधीचा असावा.

पिवळ्या पट्ट्याचा प्रताप ही भा रा भागवतांची कथा कोणत्या अंकात आहे? The speckled band चे भाषांतर आहे. होम्सची अनेक भाषांतरे प्रथम किशोरमधेच आली होती.

तसंच एक कथा आठवते आहे. एका मुलाला बक्षीस मिळतं, चुकून पाहुण्या अध्यक्षासाठी आणलेलं सेंट त्याला दिलं जातं, मग शेवटी त्याला ते परत करावं लागतं. पण तो आणि त्याच्या मित्रांनी ते आधीच वापरलं असतं मग ते त्याच्यात तेल का काहितरी भरून सील करून परत करायला जातात आणि धमाल उडते. सेंटची बाटली असं नाव होतं बहुतेक त्या कथेचं. तीही कोणाला सापडल्यास कळवा प्लीज!

मस्तच! हा खजिना उघडण्यासाठी हातभार लावणार्‍या सर्वांचे मनापासून आभार!
धन्यवाद वैनिल आणि इथे सूचीत भर घालणारे माबोकर!

ज्ञानवृक्षाच्या पारंब्या
कणाद : जानेवारी १९७८
चार्वाक : फेब्रूवारी १९७८
...
नागार्जुन - डिसेंबर १९७८ (अंतिम)

या लेखमालेबाहेरचा पण त्या सारखा लेख
आर्यभट - श्री. रा. टिकेकर - ऑगस्ट १९७५

कथा:
श्रीखंडाचे बोट - श्री. दा. पानवलकर - ऑगस्ट १९७५

लेखमालिका
विज्ञानाचे वाटाडे : सुरेश मथुरे
हिपॉक्राटेझ - मार्च १९७६ (सुरुवात)
आर्किमिडीझः ऑक्टोबर १९७६

तसंच एक कथा आठवते आहे. एका मुलाला बक्षीस मिळतं, चुकून पाहुण्या अध्यक्षासाठी आणलेलं सेंट त्याला दिलं जातं, मग शेवटी त्याला ते परत करावं लागतं. >>>'बक्षीस समारंभ' कथा, लेखक दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२ Happy

स्वप्नवासवदत्त - कथेचे नाव 'निळा हत्ती' - लेखिका कमलाबाई टिळक - जुलै १९७९

लहानपणी पाहिलेले सगळे अंक जसेच्या तसे. हरवून गेलो अक्षरशः. > मी पण !
मस्तच! हा खजिना उघडण्यासाठी हातभार लावणार्‍या सर्वांचे मनापासून आभार! > अगदी अगदी !!

एक नाट्यछटा - अंघोळ करून आलेल्या मुलाची त्याच्या आवडत्या ('महाराजा'चं चित्र असणार्‍या) towel बरोबरची ... >> छोटूचा रुसला टॉवेल अशीही एक गोष्ट आठ्वते आहे.

तसंच एक कथा आठवते आहे. एका मुलाला बक्षीस मिळतं, चुकून पाहुण्या अध्यक्षासाठी आणलेलं सेंट त्याला दिलं जातं, मग शेवटी त्याला ते परत करावं लागतं. >>>'बक्षीस समारंभ' कथा, लेखक दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२ Happy

स्वप्नवासवदत्त - कथेचे नाव 'निळा हत्ती' - लेखिका कमलाबाई टिळक - जुलै १९७९
>> धन्यवाद!!

Pages

Back to top