किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.
'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.
लेखमाला
- अजब देशात [Wizard of Oz - L. Frank Baum] - भा.रा.भागवत
- भाग १ - फेब्रुवारी १९७८ ... भाग ८ (अंतिम) - ऑक्टोबर १९७८
- अमित शोध [Silvertip's search - Max Brand] - सौ. शुभदा खरे
- भाग १ - मार्च १९८३ ... भाग ७ (अंतिम) - सप्टेंबर १९८३
- असे हे विलक्षण जग - वसंत शिरवाडकर
- भाग १ - नोव्हेंबर १९७१ ...
- चीनचे प्राचीन शोध - सुरेश मथुरे
- रेशीम - जून १९८०
- होकायंत्र- जुलै १९८०
- कागद - ऑगस्ट १९८०
- कुंचला - सप्टेंबर १९८०
- चिनी माती - ऑक्टोबर १९८०
- फटाके - नोव्हेंबर १९८०
- अॅक्युपंक्चर - डिसेंबर १९८०
- घड्याळ- जानेवारी १९८१
- छपाई यंत्र - फेब्रुवारी १९८१
- कागदी नोटा - मार्च १९८१
- रुप्या बुरुज आणि धाडशी चमू [Famous Five - Enid Blyton] - ज्ञानदा नाईक
- भाग १ - जून १९८५ ... भाग ५ (अंतिम) - ऑक्टोबर १९८५
- विज्ञानाचे वाटाडे - सुरेश मथुरे
- हिपॉक्राटेझ - मार्च १९७६ ... (भाग अंतिम) आर्किमिडीझ - ऑक्टोबर १९७६
- सागरकैद [20000 Leagues under the Sea] - प्रकाश प्रभू
- भाग १ - फेब्रुवारी १९७९ ... भाग ८ (अंतिम) - सप्टेंबर १९७९
- सागरराजाच्या राज्यात - रा. वि. रानडे
- भाग १ - ऑगस्ट १९८० ... भाग ६ (अंतिम) - जानेवारी १९८१
- ज्ञानवृक्षाच्या पारंब्या - सुरेश मथुरे
- कणाद - जानेवारी १९७८
- चार्वाक - फेब्रुवारी १९७८
- पाणिनी - मार्च १९७८
- पिंगल - एप्रिल १९७८
- कात्यायन - मे १९७८
- भरतमुनी- जून १९७८
- भृगू - जुलै १९७८
- चाणक्य - ऑगस्ट १९७८
- चरक - सप्टेंबर १९७८
- सुश्रुत - ऑक्टोबर १९७८
- सप्तर्षी- नोव्हेंबर १९७८
- नागार्जुन - डिसेंबर १९७८
- आर्यभट - श्री. रा. टिकेकर - ऑगस्ट १९७५
कथा / लेख
- भा.रा.भागवत
- हावरट हेमा - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७५
- महेश उडाला भुर्रर्र - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७६
- धिटुकली शकू - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७८
- अलकनंदा आणि जादूगार - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९७९
- गड आला आणि सिंहही आला - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८०
- मोगलगिद्दीकरांची रद्दी ( फा फे कथा) - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८१
- काठे-आजोबा - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८२
- पक्याचे पोस्मनकाका - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८३
- पिवळ्या पट्ट्याचा प्रताप - भा.रा.भागवत - नोव्हेंबर १९८५
- विविध लेखक / लेखिका
- बासुन्दी घट्ट होऊ दे ! - हेमा परुळेकर - फेब्रुवारी १९७२
- छुम् छुम् जाणार ... झूम् झूम् येणार - केशव मेश्राम - मार्च १९७२
- मिशीवर कर्ज - विनोद घारपुरे - मार्च १९७२
- श्रीखंडाचे बोट - श्री. दा. पानवलकर - ऑगस्ट १९७५
- बिली आणि ठेंगूजी - सविता जाजोदिया - नोव्हेंबर १९७६
- किटलीचा काटा काढला - सौ. शोभा बोन्द्रे - फेब्रुवारी १९७८
- अज्ञानाची काशीयात्रा - सौ. मंदा बोडस - मार्च १९७८
- कुस्तीगीर देऊ देवल - नीलिमा गोखले - जुलै १९७८
- वस्तुचे मोल - विलास गिते - सप्टेंबर १९७८
- छोटूचा रुसला टॉवेल - सौ. पद्मजा फाटक - ऑक्टोबर १९७८
- छोटा सैनिक - वसंत पोरेडी - नोव्हेंबर १९७८
- अर्थ की निरर्थ - बाबामोहम्मद अत्तार - जानेवारी १९७९
- निळा हत्ती (स्वप्नवासवदत्ता) - कमलाबाई टिळक - जुलै १९७९
- पैज - दि. मा. प्रभुदेसाई - फेब्रुवारी १९८०
- आकाशातील चांदण्या - सौ. मुमताज रहिमतपुरे - जून १९८०
- शकुनाचे वेड - बा. अ. देसाई - ऑक्टोबर १९८०
- इंगा - प्रकाश प्रभू - जानेवारी १९८१
- जितूचा इंटरव्ह्यू- सौ. सुमती इनामदार - जून १९८१
- दोन्ही मागे उभयान्वयी- भगवंत रघुनाथ आगास्कर - जुलै १९८१
- फुलवा - विजया वाड - नोव्हेंबर १९८२
- जौळ - तु.बा.नार्वेकर - नोव्हेंबर १९८२
- बक्षीस समारंभ - दिलीप प्रभावळकर - नोव्हेंबर १९८२
- बाबा जित्तो - मोरेश्वर माधव वाळिंबे - नोव्हेंबर १९८३
लघु लेख
- माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
- अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
- मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
- बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८
नाट्यछटा
- अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१
कविता
- टपटप- शांता शेळके - एप्रिल १९७२
- प्रश्नोतरे - बा.भ.बोरकर - नोव्हेंबर १९७२
नाटुकली / एकांकिका
- अलिबाबाचे खेचर - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७६
- भोपळ्या राक्षस - रत्नाकर मतकरी - नोव्हेंबर १९७८
- मोठं व्हायचं मला ! - सौ. अनुराधा खोत - जून १९८०
चित्रकथा
- बोलके खांब - प्रभाशंकर कवडी - भाग १ नोव्हेंबर १९७१ ... भाग ५ (अंतिम) मार्च १९७२
- दर्यादेशची राजकन्या - भा.रा.भागवत - भाग १ एप्रिल १९७२ ... भाग ७ (अंतिम) ऑक्टोबर १९७२
- घाटातले रहस्य - वसंत सबनीस - नोव्हेंबर १९७९ ... भाग ३ (अंतिम) जानेवारी १९८०
- सुवर्ण घंटा - मधुकर टांकसाळे - नोव्हेंबर १९८२
तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"
धनुडी, हे बघ
धनुडी, हे बघ
अजबदेशात : https://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/1978_02.pdf
अगं मामे सॉलिड आहेस तू! आता
अगं मामे सॉलिड आहेस तू! आता वाचते. जीव शांत झाला. आठवत नाही तोवर किती चुटपूट लागते.
अगं लेखातही पहिलीच गोष्ट "अजब
अगं लेखातही पहिलीच गोष्ट "अजब देशात" दिली आहे वैनिल ह्यांनी.आपण बघितली नाही.
च्यामारी! मी लेखातली भा रा
च्यामारी! मी लेखातली भा रा भागवतान्ची लिस्ट वाचली पण त्यात दिसलं नाही म्हणून नेटवर सर्च दिला तर 1978 सालातला संदर्भ मिळाला मग पहिल्या भागाचा अंक शोधला.
Pages