असेल माझा हरी..(१)
“खरं सांगायचं…, तर मला जरा टेंशनच आलंय.. सगळं कसं जमणार…., मला एकटीला.. माहीत नाही..” वसुधा जरा घाबरतच बोलली. तिचा हा खालच्या आवाजात, घाबरत बोलण्याचा टोन. मुलाशी त्याला आवडणार नाही, असं बोलण्याकरता राखीव असायचा.
“त्यात कसलं आलंय टेंशन..? तिथे बसायचं, इथे उतरायचं.. मी असणारच आहे इथे घ्यायला.. तुला काय प्रॉब्लेम आहे..?” श्रेयसच्या बोलण्यातला हा कडक टोन खास आई करताच असायचा.
मला कल्पना आहे की दोन भागांमध्ये बरच अंतर पडत आहे. माझा कथेचा विषय आणि नेमकं काय अन् कसं लिहायचं आहे, ते नक्की आहे पण कथा पुढं घेऊन जाण्यासाठी कथा शब्दांकित करताना मनासारखे समाधानकारक लेखन सुचत नाहीय त्यामुळे दोन भागात अंतर पडत आहे. मी लवकरात लवकर भाग टाकण्याचा प्रयत्न करेन पण मी हे दरवेळी भाग लेट झाल्यावर कारणं दिल्यासारखे होत त्यामुळे एक छोटीशी पोस्ट....
भाग उशिरा येण्याबद्दल मनापासून सॉरी...
लवकर भाग टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन....
Thanks
१.
बराचसा काटकोनी दिसणारा आणि आटोपशीरसा असणारा तो फ्लॅट रंग देऊन तयार झाला होता. " आता आणखी एक वल्ली येणार इथे राहायला! मागच्या त्या कर्कश्श पोरापेक्षा, एखादी शांत मुलगी आली तर कसलं भारी!!" आपली पाने सळसळवत त्या गरम दिवसाच्या शेवटी विचार करीत 'तो' उभारला होता, घट्टपणे!
कथालेखकाची पार्श्वभूमी
मी काही हौशी लेखक वगैरे नाही. शेवटचे लेखन हे कैक वर्षांपूर्वी बारावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये जो निबंध लिहिला तेव्हा झाले होते. सध्या फक्त एखाद्या सरकारी खात्यास माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अर्ज करणे, एखाद्या कंपनीस तक्रार अर्ज पाठविणे इतपतच लेखन मर्यादित झाले आहे! (या कथेतील संवाद मालवणी भाषेत आहेत, माझे स्वतःचे गाव मालवण तालुक्यात असले तरीही मी कधी मालवणीत संवाद साधलेला नाही. मालवणी बोललेली मला समजते परंतु मी बोलत नाही. त्यामुळे यात मालवणी भाषेत काही चुका आढळल्यास क्षमस्व!!!)
एक कोवळी पोर
वारसा हक्काने अंथरलेल्या
मखमली पायघड्यांवर
नाजूक पावले टाकत;
गोंदवून घेते अंगभर
कोडकौतुकाचा गंध वर्षाव,
दुसरी फाटक्या बापाच्या
रापल्या हातांनी वाजवलेल्या
जीर्णविदीर्ण ढोलाच्या तालावर
सांभाळते दोरावर तोल; घेते-
श्वास रोखून धरलेल्या
बघ्यांच्या काळजाचा ठाव
एक स्वाक्षरी संदेशासाठी
सरसावलेल्या वह्यांवर
लफ़्फ़ेदार सराईतपणे
वडीलांचे नाव लावते; दुसरी-
चिरमटल्या देहाची कमान करून
मातीत रोवलेली सुई
डोळ्यांच्या पापणीने अल्लाद उचलते
२५ मार्च २०२०
या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले .
त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली ,
पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके !
अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं ,
एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला
देव पाहिलाय आम्ही
असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय .
त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४
६. ३० , न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड पुणे
काय भयानक उन्हाळा आहे! सगळं वातावरण नुसतं कोरडं शुष्क, जरा ओलावा नाही कुठे! काहिली होतेय अंगाची, वारा आला तरी नुसत्या गरम गरम वाफा... बरं तर बरं, शाळेला सुट्टी आहे आत्ता. पण अमेय मात्र संध्याकाळच्या क्लासला जातो, पुढचं वर्ष दहावीचं आहे ना! सगळीकडे सारखा एकच घोष कानावर येतो 'हे वर्ष महत्वाचं', 'मार्क चांगले मिळायलाच हवेत'.
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
राजहंस
‘वाहत्या गंगेत हात धुतले, तर निदान पापातून मुक्त झाल्याचं मानसिक समाधान तरी मिळत असेल. पण गटारातल्या पाण्याचे शिंतोडे दुसऱ्यांवर उडवून, काय.. मिळतं काय लोकांना..? कसलं आसुरी समाधान शोधतात ही सगळी माणसं..? आणी आज जे पाणी आपण दुसऱ्यांवर उडवतोय, अगदी मजेत.. तेच उद्या आपल्या अंगावर येणार नाही. ह्याची एवढी खात्री असते लोकांना..?’ संतापाने शलाकाच्या कपाळावरची शिर ताडताड उडत होती.
अमेयच्या वर्गात एक नवीन मुलगा आलाय - सचिन. चांगली गट्टी जमल्येय त्याच्याशी. परदेशात कुठेतरी होता म्हणे, नुकतीच त्याच्या बाबांची बदली झाली; आणि ह्या वर्षापासून अमेयच्या शाळेत येतोय. वर्गाबाहेर, आणि क्वचित वर्गात सुद्धा, अखंड गप्पा चालू असतात दोघांच्या. गप्पा म्हणजे, तशा एकतर्फीच - सचिन परदेशातल्या कायकाय गंमतीच्या गोष्टी सांगत असतो, आणि अमेय कान देऊन ऐकत असतो. ऐकतो, आणि विचार करतो. नेहमीसारखाच, खोल खोल. गोलगोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असा.
स्वत:पासून दू ऽऽ र पळून जाण्याचा
फसावा दुबळा प्रयत्न
अन् अडकून पडावे आयुष्यभर
घाटमाथा; आडवळणी दऱ्याखोऱ्यात
तसा तुझा सर्वव्यापी वावर
सरंजामशाही तोऱ्यात
औसे-पुनवेला येतो तुझ्या भेटीला
हिंदकळत... डुचमळत...
अनवट वळणे; खाचखळगे तुडवत
म्हणशील तर हवापालट
चेंज ऑफ टेस्ट
पूर्वजन्माची कार्मिक लेणदेण,
नसते कशाचीच खात्री -
पण पडलेच पदरात पुण्यबिण्य
तर नॉट अ बॅड बार्गेन..!