असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
https://www.maayboli.com/node/84934
असेल माझा हरी..(३)
छत्तीस तासांचा प्रवास करून वसुधा हयूस्टनं ला पोहोचली, तेव्हा तिला रिसीव करायला श्रेयस प्रिया दोघंही एयरपोर्ट वर हजर होते. त्या दोघांना मिठीत घेतलं, तेव्हा आपल्याला इथे यायचं नव्हतं हे वसुधा विसरलीच. प्रिया खूपच गोड दिसत होती. शेवटी आपली मुलं ती आपलीच मुलं.
असेल माझा हरी..(१)
“खरं सांगायचं…, तर मला जरा टेंशनच आलंय.. सगळं कसं जमणार…., मला एकटीला.. माहीत नाही..” वसुधा जरा घाबरतच बोलली. तिचा हा खालच्या आवाजात, घाबरत बोलण्याचा टोन. मुलाशी त्याला आवडणार नाही, असं बोलण्याकरता राखीव असायचा.
“त्यात कसलं आलंय टेंशन..? तिथे बसायचं, इथे उतरायचं.. मी असणारच आहे इथे घ्यायला.. तुला काय प्रॉब्लेम आहे..?” श्रेयसच्या बोलण्यातला हा कडक टोन खास आई करताच असायचा.