असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
https://www.maayboli.com/node/84934
असेल माझा हरी..(३)
छत्तीस तासांचा प्रवास करून वसुधा हयूस्टनं ला पोहोचली, तेव्हा तिला रिसीव करायला श्रेयस प्रिया दोघंही एयरपोर्ट वर हजर होते. त्या दोघांना मिठीत घेतलं, तेव्हा आपल्याला इथे यायचं नव्हतं हे वसुधा विसरलीच. प्रिया खूपच गोड दिसत होती. शेवटी आपली मुलं ती आपलीच मुलं.
संध्याकाळ झाली होती. प्रवास भर ब्रेड पाव खावा लागलेल्या वसुधाला आत्ता घरी जाऊन, मस्त गरम वरण भात हवासा वाटत होता. पण इथे यायच्या आधीच तिने ठरवलं होतं, ‘जसा देश, तसा वेश....आणी तशाच डीशेश.. ’ आपण समोर दिसेल ते बघायच.. अन् त्यातल्या त्यात झेपेल.. पचेल.. ते खायचं प्यायचं.. उगाच ‘मला हे हवं अन् ते हवं.. अमुक चालत नाही अन् ढमुक आवडत नाही..’ असं म्हणायचं नाही, निदान स्वत:ला सगळं करता येईपर्यंत तरी... आता आपण इथे फक्त प्रियाची काळजी घ्यायची आहे. किचनचं तंत्र एकदा जमलं की आपणच त्यांना काय काय करून खायला घालायचं आहे.
एयरपोर्ट पासून घरचा ड्राइव चांगला दोन तासांचा होता. वसुधा नव्या नवलाईनं सगळं बघत होती. ‘केवढ्या मोकळ्या जागा..! अन् आकाश तरी किती स्वच्छ दिसतंय.. ह्या भागात तरी खूप उंच इमारती दिसतच नाही.. ’
प्रिया उत्साहानं काय काय सांगत होती. श्रेयस आईशी मराठी बोलत होता, ते पण प्रियाला बऱ्यापैकी कळत होतं.
मग मध्येच श्रेयसने रीफ्रेशमेन्ट करता एका गॅस स्टेशन गाडी थांबवली. ‘केवढा स्वच्छ, सुंदर, चकचकीत पेट्रोल पंप!’
पूर्ण टेक्सास मध्ये ‘बकी’ चे औटलेट्स आहेत म्हणे! पेट्रोल पंप आणि प्रशस्त यूटिलिटि स्टोअर! सेल्फ सर्विस कोल्डड्रिंक आणी कॉफी चे टॅपस! वसुधाला हे सगळं नवीनच होत.
‘सगळंच शिस्तीत आणी आकर्षक! वॉशरूम्स च्या भिंती सुद्धा किती आकर्षक पेंटिंगज ने सजलेल्या!! भारतात फिरतांना प्रवासात शक्य तितकं वॉशरूम्स टाळण्याकडे कल असतो आपला..’
“मस्त कॉफी घेऊया. मग घरी जाऊन गरम गरम हलकसं जेवण. तू दमली असशील प्रवासाने.” श्रेयस आईला म्हणाला.
वसुधाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत मान हलवली.
“काळजी करू नकोस. घरी हरी आहे. तो स्वयंपाक तयार ठेवेल.” हसत श्रेयस म्हणाला.
“हरी.. ?”
“भेटेलच घरी गेल्यावर.”
‘मित्र असेल बहुतेक.. पूर्वी कधी त्याचं नाव नव्हतं ऐकलं.. नवीन मित्र दिसतोय.. पण तरी तो स्वयंपाक करून ठेवणार..? खूपच जवळचा दिसतोय. ग्रेट!’ वसुधाच्या मनात आलं.
संध्याकाळच्या सुखद गारव्यात घरापर्यंतचा प्रवास लवकर पार पडला.
गाडी गॅरेज समोर पोचता क्षणीच सामान घ्यायला एक हसरा तरुण बाहेर आला. श्रेयस प्रियाच्या वयाचाच दिसत होता. त्याने हसऱ्या नजरेने संगळ्यांकडे बघितलं.. पण बोलला मात्र काहीच नाही. त्याने भराभर डीकीतलं सामान उचललं आणी तो आत गेला. श्रेयसनेही त्याला सगळं सामान उचलू दिलं. वसुधाला आश्चर्यच वाटलं. काहीच कसा बोलला नाही..?
‘काय हे.. जवळचा मित्र असला म्हणून काय झालं..?’ वसुधाला वाटलं, “अरे त्याने एकट्याने सगळं सामान....?”
“तो हरी. तू नको त्याची काळजी करू. आता कळेलच तुला हळू हळू.. तो काय काय करतो ते.. चल तू. तुझ्या रूम मध्ये जाऊन फ्रेश हो. हरीला टेबल लावायला सांगतो.” श्रेयस म्हणाला.
‘हरी नोकर आहे का..? वाटत नाही पण.. कदाचित हे अमेरिकेतले नोकर.... पण इथे तर कामाला माणसं मिळणं खूप अवघड असतं नं..? सगळं आपलं आपण करावं लागतं.., असं ऐकल होतं.. कळेल सगळं हळू हळू.. ’
घर चांगलं प्रशस्त होतं. ठेवलंही छान होतं. सगळं स्वच्छ आणी नेटकं. वसुधा प्रियाने दाखवलेल्या खोलीत गेली फ्रेश व्हायला. तिचं सगळं सामान व्यवस्थित एका टेबल जवळ ठेवलं होतं...
वसुधा सगळं आवरून बाहेर आली तेव्हा टेबलवर जेवण तयार होतं.. वरण.. भात.. तूप लोणचं.. सुकी भेंडी.. ती आल्याबरोबर हरीने गरम फुलके आणले. वसुधा आश्चर्याने बघत राहिली.
“आपको यही खाना था ना, ट्रॅवल के बाद..लाइट डिनर..? देखो तय्यार है|” प्रिया म्हणाली.
अगदी अपेक्षा नसताना मिळालेलं, घरचं, साधसं गरम गरम जेवण जेउन अगदी तृप्त वाटलं वसुधाला. जेवणानंतर टेबल आवरणं.. ओटा आवरणं.. सगळं हरीच करत होता.. अगदी मुकाट्याने..
“जेवलास का रे..?” वसुधाने त्याला विचारलं.
काहीच उत्तर नाही. ‘बहिरा आहे का..?’
................................................
(क्रमश:..)
असेल माझा हरी..(४)
https://www.maayboli.com/node/84941
ओह हरी ची entry
ओह हरी ची entry
हे expected नव्हतं
हरी यंत्रमानव असणार..
हरी यंत्रमानव असणार..
आर् तिच्या! ष्टोरीमें ट्विस्ट
आर् तिच्या! ष्टोरीमें ट्विस्ट? पुभाप्र
हरी रोबॉट दिसतोय.
हरी रोबॉट दिसतोय.
वसुधा चे माहि त्नाही आम्हाला
वसुधा चे माहि त्नाही आम्हाला सर्प्राईज नक्कीच आहे. आता पुढे जाऊन ह्यूस्टनमधला एखादा कल्पक गुज्जु यंत्रमानव म्हणून आहे असे काही झाले कि सगळेच क्लीन बोल्ड होतील