असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
https://www.maayboli.com/node/84934
असेल माझा हरी..(३)
https://www.maayboli.com/node/84937
असेल माझा हरी..(४)
https://www.maayboli.com/node/84941
असेल माझा हरी..(५)
https://www.maayboli.com/node/84945
असेल माझा हरी..(६) - (अंतीम)
वसुधाला थोडा रागच आला. पण राग आला, तरी तिने बोलून काही प्रतिक्रिया दिली नाही. निदान हरिसमोर काही बोलायला नको.
रविवार असल्यामुळे सगळ्यांनी, संध्याकाळी बाहेर जाऊन टॅकोंज खायचं ठरलं. इथे खूप चांगली मेक्सिकन हॉटेल्स आहेत म्हणे. मेक्सिकन चवी भारतीय लोकांना खूप आवडतात. तिखट खाण्यात तर ते मेक्सिकन आपल्यावर मात करतात.
“सो..? कसा वाटला आजचा पहिला दिवस तुला?” श्रेयस ने आईला विचारलं.
“बाकी सगळं खूपच छान आहे.. पण..”,
‘सांगावं का आताच.. हरी माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणून..? तसंही त्यांनी ते बघितलच आहे.. उद्या पासून तर मला त्याच्याबरोबरच घरात रहायचं आहे.. त्याची मदत लागणारच मला...’ वसुधाला टेंशन आलं.
“पण काय..? काय प्रॉब्लेम आहे..?”
“तसं सगळं छानच आहे.. म्हणजे हरीही खूपच कामसू आहे..” वसुधा अजून चाचरतच होती. ‘आपल्यामुळे काही प्रॉब्लेम नको..’
“मग..?” श्रेयस.
“आई, आपने पुछा नही, सरप्राइज के बारे मे..?” प्रियाने मध्येच विचारलं.
“ह्या हरीच्या नादात विसरूनच गेले मी.. सरप्राइज वगैरे.. म्हणजे तुम्हाला घरकामाला तो मिळाला हे छानच झालं.. पण आता उद्या पासून तुम्ही दोघं दिवसभर घरात नसणार.. मी एकटीच त्याच्या बरोबर असणार घरात.. मी आल्यामुळे, त्याला काही प्रॉब्लेम आहे का..? त्याचं काम वाढलं म्हणून.. मी करत जाईन माझी कामं.. उगाच त्याला अडचण नको..” वसुधा घाईघाईने म्हणाली.
“यही तो आपका सरप्राइज है| हरी!..” प्रिया हसत हसत म्हणाली.
“हरी मेरा सरप्राइज है, की मेरी परीक्षा है? मेरी तो वो बिलकुल सुनता नही| तुम्ही दोघांनी पण बघितलं.. , मैने मराठी, हिंदी इंग्लीश सबकुछ ट्राय किया.. पण नाही.. एकदम मशीन जैसा तुम्हारा काम करता रेहता है|” वसुधाने सांगून टाकलं. बोलतांना तिला शब्द सुचत नव्हते.
“माझी हुश्शार आई ती..!” आता श्रेयस आणी प्रिया दोघेही हसायला लागले.
“आता आज रात्री पासून आपण त्याला तुझी कामं ऐकायला शिकवू हं. आणी तुलाही शिकवू त्याला कामं सांगायला.. मी वाटच पहात होतो, तू केव्हा सांगतेस ते.. ” श्रेयस म्हणाला.
“म्हणजे..?”
“मी म्हटलं होतं नं तुला.. त्याला फक्त ऑब्सर्व कर म्हणून.. छान आहे तुझं ऑब्सर्रवेशन. पण तुला कळलं का.. तो ‘मशीन जैसा’ नाही.. मशिनच आहे.” श्रेयस ने सांगून टाकलं.
“म्हणजे..? तो तर माणूसच दिसतोय.. तुझ्या माझ्या सारखा.. तुमचं काम पण ऐकतो तो .. फक्त माझं.. ” वसुधा गांगरलीच.
“हेच तर तुझं सरप्राइज आहे.. दिसायला फक्त तो आपल्यासारखा आहे.. कालपासून त्याला काही खाता पितांना बघितस तू..? आणी घर भर फिरलीस तेव्हा त्याची एखादी खोली बिली..? अगं, एकदम हाय क्वालिटी रोबो आहे तो. दिसायचं म्हणशील, तर आम्ही आपल्या घराकरता म्हणून, मुद्दामहून इंडियन लूक्स चा रोबो आणलाय. त्याचं हरी हे नाव पण आम्हीच दिलं त्याला. भारी आहे नं नाव?
घरकामाचे सगळे प्रोग्रामस त्याच्या डोक्यात.., म्हणजे डोक्यातल्या चिप मध्ये फिट केलेले आहेत. अगदी बारीक सारिक गोष्टी पण.” श्रेयस ने सांगितलं.
“पण म्हणजे मग तुम्ही सांगता ती काम..?”
“त्याला प्रोग्राम एक्सिक्युशन म्हणतात. ती कामं आम्ही दोघांनी सांगितली, तर.. आणी तरच.. तो करतो. कारण आमचे आवाज त्याच्या मेंदूत स्टोअर करून ठेवलेत, ते तो ओळखतो. आणी आम्ही आमच्या फोनशी पण त्याला कनेक्ट केलंय. म्हणजे आपण टीव्ही चं फोन शी पेअरिंग करतो तसं. म्हणजे मी आता त्याला येथून काही कामाचा मेसेज पाठवला, तर तिकडे तो ते काम करून टाकेल. तुझं तो ऐकत नाही, कारण तुझा आवाज तो ओळखत नाही.”
“अच्छा!!! असं आहे का? मग आता..?” वसुधाच्या मनात आलं, ‘मी कुठे टीव्ही चं फोन शी पेअरिंग करते..? ते तुम्ही करता. ’ पण तिची उत्सुकता वाढली.
“आता आपण घरी गेलो, की तुझा आवाज पण आपण त्याला फीड करू. शिवाय तुझा फोन पण त्याच्याशी कनेक्ट करू.. मग तो तू दिलेल्या सूचना ऐकेल.” श्रेयस ने सांगितलं.
“पण मला जमेल ते..? म्हणजे त्याला सूचना देणं..? मी चुकून काही चुकीची सूचना दिली तर..? काही बिघडलं तर..?” वसुधाने काळजीने विचारलं.
“असं काही बिघडत नसतं. तुला सुरवातीला होईल थोडा त्रास.. पण त्याला काही नाही समजलं, तर तो काहीच नाही करणार, पण चुकीचं काही करणार नाही. मग तू मला नाही तर प्रियाला फोन कर.. आम्ही सांगू त्याला. काही सूचना मी तुला लिहून देतो.. नमूना म्हणून.. तू कर ट्राय.. ”
“काही नुकसान तर नाही होणार नं.. माझ्याकडून? त्याचं.. नाही तर घराचं..? वस्तूंचं..?” वसुधाला टेंशन आलं.
“घबराईये नही आई. वो किसीको नुकसान नही कर सकता. उसको तैय्यार ही ऐसे किया है.. अगर समझो, गॅस पे आपसे कुछ जल रहा है.. तो वो खुद आके गॅस बंद करेगा, बिना किसिने बताए| घर का कुछ नुकसान नही होने देगा| और किसीको चोट भी नही पहुचने देगा..|” प्रियाने धीर दिला.
“तो नवीन कुणाला घरात सुद्धा नाही येऊ देणार..” श्रेयस ने सांगितलं.
“मग मला कसं..” वसुधाला शंका आली.
“कारण तुझी इंट्रोडकशन त्याला आम्ही आधीच दिली होती. तुझे फोटो त्याच्या मेमरीत टाकून.” श्रेयस ने स्पष्टीकरण दिलं.
“अरे व्वा! हे तर छानच झालं. मला एकदा जमलं, की मग मी त्याला कितीही काम सांगू शकेन.. तो चिडण्याची नाही तर काम सोडून जाण्याची भीती नाही.. आता बाळ येणार म्हंटल्यावर कामं वाढणारच नं..” वसुधाला खूपच बरं वाटलं. काय काय शोध लागतात नं हल्ली..
“हो. तुझी ती काळजी मिटेल. आता फक्त शिक.. , त्याच्याशी कसं बोलायचं ते..”
“श्रेयू, का रे.. मलाही नेता येईल का, असा एखादा हरी.. इथून पुण्याला.. आपल्या घरी..?” वसुधाने विचारलं.
“अगं, ते सध्या तरी शक्य नाही.. एकतर त्याच्या करता ह्युज कस्टम ड्यूटी लागेल.. शिवाय तिथे त्याचे स्पेअर पार्ट्स.. सर्विसिंग काहीच नाहीय अजून.. त्याच्यात काहीही सेटिंग करायचं किंवा बदलायचं म्हंटलं, तर ते जमणार नाही तिथे.. कदाचित काही वर्षांनी होईल ते शक्य. ” श्रेयस ने सांगीतलं.
“असू दे.. पण इथे मात्र माझी मज्जा आहे.. कसली भीती वाटत होती नं मला.. सगळं जमेल की नाही ह्याची..”
“और वैसे भी आई, आपका ग्रीन कार्ड होने बाद तो आप यही पे जादा राहोगी.. जब कभी बीच बीच मे मर्जी हो, तब चली जाना वहा.. कुछ दिनों के लीये..” प्रिया म्हणाली.
“तू आता फक्त इथे रहाणं, आणी नंतर बाळाशी खेळणं एंजॉय कर.. आता गेलं नं तुझं, इथल्या कामाचं टेंशन..? काळजी..?” श्रेयस ने विचारलं.
“आता कसलं टेंशन..आणी काळजी.. आता मस्त मजा!” वसुधाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं,
‘असेल माझा हरी.. तर मला कसली वरी......’.
************
(समाप्त)
मस्त कथा..!
मस्त कथा..!
वसुधाच्या अमेरिकवारीत धमाल आली असेल.
' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.." म्हण एकदम चपखल बसली आहे कथेत..!
मस्तच....वसुधा ..हरीला सूचना
मस्तच....वसुधा ..हरीला सूचना देताना घडलेल्या गमती जमती वाचायला आवडतील ....
छान लिहिली आहे.. सरळ सोपी
छान लिहिली आहे.. सरळ सोपी प्रेडिक्टेबल असूनही आवडणे हे विशेष असते
मस्त झाली गोष्ट!
मस्त झाली गोष्ट!
मस्त आहे गोष्ट.. आवडली.
मस्त आहे गोष्ट.. आवडली.
कथाबीज लहान असले तरी ते उत्तम फुलवले आहे, शेवटाचा अंदाज आला तरी वाचताना कंटाळा येत नाही. कथा फुलवण्याचे तुमचे कसब खरेच उत्तम आहे.
वरील सगळ्यांना अनुमोदन.
वरील सगळ्यांना अनुमोदन.
आई आपल्याजवळ रहावीशी वाटणारे हे दोघे बघूनही छान वाटलं. (विशेषतः काही गोष्टींमध्ये वाचलेलं कि तिथे मदतनीस महाग व प्रोफेशनल मिळतात; त्यामुळे इथून आई/सासू मंडळींना तेवढ्यापुरतं बोलावलं जातं.)
धन्यवाद रुपाली, लावण्या
धन्यवाद रुपाली, लावण्या, ऋन्मेष, वावे, साधना, प्राचीन.
खूप छान मलाही हवाय तो हरी
खूप छान
मलाही हवाय तो हरी
भारी
भारी
असा एखादा रोबोट मिळावा भारतात असे वाटून गेलं
कथाबीज लहान असले तरी ते उत्तम
कथाबीज लहान असले तरी ते उत्तम फुलवले आहे, शेवटाचा अंदाज आला तरी वाचताना कंटाळा येत नाही. >>> +10
छान फुलवली आहे कथा... मस्त!
छान फुलवली आहे कथा... मस्त!
>>कथाबीज लहान असले तरी ते
>>कथाबीज लहान असले तरी ते उत्तम फुलवले आहे, शेवटाचा अंदाज आला तरी वाचताना कंटाळा येत नाही. >>> +१
(No subject)
छान!!!! @किल्ली +१००
छान!!!!
@किल्ली +१००
एकदम बरोब्बर
एकदम बरोब्बर
गोष्ट छान लिहीली आहे. आवडली.
गोष्ट छान लिहीली आहे. आवडली.
विषय जरी नेहमीचा, ओळखीचा असला तरी तुम्ही दिलेला ट्विस्ट गमतीदार आहे. अशाच सहज, सोप्या आणि मजेशीर गोष्टी लिहीत जा.
छान फुलवली आहे कथा... मस्त!
छान फुलवली आहे कथा... मस्त!
धन्यवाद किल्ली, झकासराव,
धन्यवाद किल्ली, झकासराव, अबूवा, स्वाती, आबा, संजय पाटील, धनवन्ती, अनया, सामी.
@किल्ली +१००
@किल्ली +१००
सुंदरच लिहिलीय कथा! आवडली.
सुंदरच लिहिलीय कथा! आवडली.
तरीपण मला असला हरी नकोच.
म्हणजे निदान या कामांसाठी तरी नको
धन्यवाद अंजली-कूल.
धन्यवाद अंजली-कूल.
छानच झाली आहे कथा, आवडली.
छानच झाली आहे कथा, आवडली.
सध्याचे युग हे 'हरी अनंत हरी
सध्याचे युग हे 'हरी अनंत हरी कथा अनंता' चे आहे. सिफ्रा आवडली होती, हरी पण आवडलाच. सुरेख कथा.
_/\_
_/\_
मजेशीर वळणे घेत घेत झालेला हा
मजेशीर वळणे घेत घेत झालेला हा प्रवास खूप रंजक झाला..!! कथा आवडली.
धन्यवाद पॅडी.
धन्यवाद पॅडी.